schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
तेलंगणातील काॅंग्रेसते अल्पसंख्यक नेते फिरोझ खान यांनी भाजपात प्रवेश केला असल्याच्या बातम्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. यात म्हटले आहे की असुद्दीन ओवैसी यांच्याविरोधात निवडणुक लढविलेलेल काॅंग्रेस नेते फिरोज खान यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. यासंदर्भातील अनेक पोस्ट सोशल मीडियात पाहायला मिळत आहेत.
एका ट्विटमध्ये देखील म्हटले आहे की तेलंगणातील काॅंग्रेसचे अल्पसंख्यक नेते फिरोज खान यांनी भाजपात प्रवेश केला आहे. या काॅंग्रेसवाल्यांनी भाजपात प्रवेश करण्याचा ठेका घेतला आहे का? असा प्रश्न देखील या ट्विटमध्ये विचारण्यात आलेला आहे.
आणखी एका ट्विटमध्ये फिरोज खान यांनी भाजपाचे प्रभारी भाजपा प्रभारी तरुण चूग आणि प्रदेशाध्यक्ष बंडी संजय कुमार यांच्या उपस्थितीत दिल्लीत भाजपामध्ये प्रवेश केल्याचा दावा करण्यात आला आहे.
याशिवाय आम्हाला siasat.com नावाच्या वेबसाईटवर देखील ही बातमी आढळून आली. ज्यात डेक्कन क्राॅनिकल या वेबसाईटच्या बातमीचा हवाला देण्यात आला.
यात म्हटले आहे की, डेक्कन क्रॉनिकलच्या वृत्तानुसार ते बुधवारी तेलंगणा भाजपचे अध्यक्ष बांदी संजय यांच्या उपस्थितीत दिल्लीत भगवा पक्षात दाखल झाले.काही महिन्यांपूर्वी नेता भगवा पक्षात सामील होणार असल्याची अफवा होती. तथापि, त्यावेळी त्यांनी या अफवांना नकार दिला होता आणि कॉंग्रेस पक्षातच राहून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी संघर्ष करणार असल्याचा पुनरुच्चार केला होता.
मागील वेळी जुने सचिवालय संकुलातील जमीनदोस्त करताना पाडलेल्या दोन मशिदी तातडीने पुन्हा उभारण्याच्या मागणीसाठी ‘चलो सेक्रेटेरिएट’ कार्यक्रमाची आखणी केली असता या नेत्याने मुख्य बातमी पकडली होती.
कॉंग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, त्यांच्याकडून अधिकृत माहिती दिली गेलेली नाही. “इथल्या राजकारणातील एकमेव हेतू एमआयएमला पराभूत करणे आहे, म्हणूनच कदाचित त्यांनी कॉंग्रेस सोडली आहे. ते भाजपच्या माध्यमातून त्यांचे उद्दिष्ट पूर्ण करु शकतात असा त्यांचा विचार असावा, ”अशी माहिती कॉंग्रेस नेत्याने दिली.
तेलंगणातील काॅंग्रेस नेते फिरोज खान यांन खरंच भाजपात प्रवेश केला आहे का याची पडताळणी आम्ही केली असता आम्हाला 23 फेब्रुवारी 2021 रोजीची टाईम्स आॅफ इंडियाची बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की तेलंगणातील अनेक काॅंग्रेस नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. तसेच आणखी नेते भाजपात प्रवेश करणार असल्याचे समजते यात फिरोज खान यांचाही समावेश आहे.
मागील महिन्यात देखील ही फिरोज खान भाजपात दाखल होणार असल्याची बातमी माध्यमांत प्रसिद्ध झाली होती मात्र ते भाजपात दाखल झाले नाहीत महिनाभरातनंर आता पुन्हा बातम्या व्हायरल होत असल्याचे आढलून आले. अधिक तपास केला असता आम्हाला नामापल्ली काॅंग्रेसच्या अधिकृत फेसबुक पेजवर फिरोज खान यांच्या मुलाखतीचा 25/ 03/ 2021 रोजीचा व्हिडिओ आढळून आला. यात फिरोज खान यांनी म्हटले आहे की भारतीय जनता पक्षांच्या नेत्याना भेटल्याचा फोटो तीन महिन्यांपुर्वीचा आहे. त्यावेळी मी त्यांच्याकडे असुद्दीन ओवैसींच्या विरोधात तिकिट देण्याची मागणी केली होती, तसेच आधार आणि मतदान ओळखपत्र लिंक करण्याची तसेच मुस्लिमांच्या हितासाठी भारतीय अल्पसंख्यक चेअरमन पद देण्याची मागणी केली. मात्र त्यांनी आधी भाजपात प्रवेश करण्यास सांगितले मी मात्र नकार दिला असे या मुलाखतीत म्हटले आहे.
आमच्या पडताळणीतून हे स्पष्ट झाले की, तेलंगणातील कांग्रेसचे नेते फिरोज खान यांनी भारतीय जनाता पार्टीत प्रवेश केलेला नाही. माध्यमांत चुकीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
Namapally congress- https://www.facebook.com/Nampally-Congress-Official-108833371250588
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Ishwarachandra B G
February 8, 2025
Vasudha Beri
January 3, 2025
Prasad Prabhu
December 24, 2024
|