About: http://data.cimple.eu/claim-review/5806b74e8bde539fa130b83867f2e2c17b107beabc0ee1b2e29ddc33     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Authors Claim विचित्र रेल्वे अपघात. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ही सर्कस आहे की रेल्वेस्टेशन. Fact व्हायरल व्हिडीओ २०१५ मध्ये मुंबई लोकल ट्रेनच्या झालेल्या अपघाताचा आहे. रेल्वेस्थानकावर बोगी प्लॅटफॉर्मवर चढून झालेला अपघात सध्याचा असल्याचा भास निर्माण करून एक व्हिडीओ मोठ्याप्रमाणात शेअर केला जात आहे. विद्यमान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पॉईंट आउट करीत हे रेल्वेस्थानक आहे की सर्कस असा सवाल करणारा हा दावा सध्याचाच रेल्वेअपघात असल्याचा समज करून घेऊन अनेक सोशल मीडिया युजर्स पुढे पाठवत आहेत. भारतात गेल्या काही महिन्यात अनेक दुर्दैवी रेल्वेअपघात घडले आहेत. यामुळे रेल्वे प्रवासाच्या बाबतीतील सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. जून २०२४ मध्ये पश्चिम बंगालमध्ये कांचनजंगा एक्सप्रेसला मालवाहू रेल्वेची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू आणि शेकडो जखमी झाले. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना यामुळे टीकेचा सामना करावा लागला. याच क्रमाने सध्या हा व्हिडीओ शेअर केला जात असून रेल्वेमंत्र्यांवर टीका केली जात आहे. Fact Check/ Verification Newschecker ने दाव्याचा तपास करण्यासाठी व्हायरल व्हिडीओचे किफ्रेम्स काढून Google वर रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला ९ वर्षांपूर्वी २९ जून २०१५ रोजी NDTV च्या अधिकृत युट्युब चॅनेलने हाच व्हिडीओ अपलोड केलेला असल्याचे पाहायला मिळाले. “Watch CCTV footage of Churchgate accident in which train crashed into platform” असे त्याचे शीर्षक आहे. त्याचा मराठी अनुवाद “चर्चगेट अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पहा ज्यात ट्रेन प्लॅटफॉर्मवर आदळली” असा होतो. यावरून आम्हाला व्हायरल फुटेजमध्ये झालेला अपघात २०१५ मध्ये मुंबईच्या चर्चगेट रेल्वेस्टेशन येथे झाला असल्याची माहिती मिळाली. आणखी तपास करताना आम्हाला BBC News युट्युब चॅनेलने २५ जून २०१५ रोजीच अपलोड केलेली व्हिडीओ न्यूज मिळाली. यामध्येही व्हायरल व्हिडीओ पाहायला मिळतो. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये “फुटेजमध्ये मुंबईच्या चर्चगेट स्थानकावर एक प्रवासी ट्रेन प्लॅटफॉर्म ओव्हरशूट करताना आणि अनेक लोक जखमी झाल्याचे दाखवले आहे. चर्चगेट स्थानकावरील अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध केले होते जेव्हा ट्रेनने बफरला धडक दिली आणि अर्धवट प्लॅटफॉर्मवर चढली. रविवारी झालेल्या अपघातानंतर पाच प्रवासी जखमी झाले असून रेल्वे सेवा काही काळ विस्कळीत झाली होती. या घटनेसाठी रेल्वे अधिकाऱ्यांनी ‘मानवी चुक’ जबाबदार असल्याचे म्हटले आहे.” असे लिहिण्यात आले आहे. यावरून व्हायरल फुटेज २०१५ मधीलच असल्याचे स्पष्ट झाले. अधिक तपासात आम्हाला हिंदुस्थान टाइम्सने २८ जून २०१५ रोजी प्रसिद्ध केलेली याच घटनेची माहिती देणारी बातमी सापडली. “मुंबईतील चर्चगेट स्थानकावर रविवारी लोकल ट्रेनचा अपघात झाला, यात पाच प्रवासी जखमी झाले आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली.” असे या बातमीत म्हटले आहे. पुढील तपासात आम्हाला PIB Fact Check या सरकारी फॅक्टचेक एजन्सीने या दाव्याचे खंडन करण्यासाठी २३ जुलै २०२४ रोजी केलेले ट्विट सापडले. जुन्या रेल्वे अपघाताच्या व्हिडिओचा आधार घेऊन सध्याचाच अपघात असल्याचे दाखवण्याचा खोटा प्रकार सुरु असल्याचे त्यामध्ये लिहिण्यात आले आहे. ते खाली पाहता येईल. महत्वाचे म्हणजे अपघात झाला तेंव्हा भारताचे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू होते. १० ऑक्टोबर २०१४ ते २ सप्टेंबर २०१७ हा त्यांचा कार्यकाळ होता. त्यानंतर पियुष गोयल केंद्रीय रेल्वे मंत्री होते. सध्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सर्वप्रथम ८ जून २०२१ रोजी यापदाची सूत्रे स्वीकारली असून जुने सरकार जाऊन नवे सरकार आले तरी आजवर ते या पदावर कार्यरत आहेत. भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर ही माहिती पाहता येईल. Conclusion अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात मुंबईच्या चर्चगेट रेल्वेस्थानकावर २०१५ मध्ये झालेल्या लोकल ट्रेनच्या अपघाताचा व्हिडीओ चुकीच्या संदर्भाने खोटा दावा करून व्हायरल केला जात असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे. Result: False Our Sources Video published by NDTV on June 29, 2015 Video published by BBC News on June 29, 2015 News published by Hindustan Times on June 28, 2015 Tweet made by PIB Factcheck on July 23, 2024 Information on Indian Railways Website कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • Hindi
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.115 as of Oct 09 2023


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data] Valid XHTML + RDFa
OpenLink Virtuoso version 07.20.3238 as of Jul 16 2024, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 2 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2025 OpenLink Software