About: http://data.cimple.eu/claim-review/640783d39852e94a88f72aa43a74fef56d73801bdbd45385e7e726cb     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check Contact Us: checkthis@newschecker.in Fact checks doneFOLLOW US Fact Check Claim भारतीय चलनामध्ये ₹350 ची नवीन नोट आणि ₹75 व ₹60 ची नाणी आलेत. Fact भारतीय रिझर्व्ह बँकेने अशा कोणत्याही नवीन नोटा आणि नाणी चलनात आणली नसून हा दावा खोटा आहे. RBI ने भारतीय चलनातून ₹2000 च्या नोटा मागे घेतल्यानंतर सोशल मीडियावर अनेक नवीन नोटा आणि नाणी दाखल झाल्याचे दावे पाहायला मिळत आहेत. सध्या भारतीय चलनामध्ये ₹350 ची नवीन नोट आणि ₹75 व ₹60 ची नाणी आलेत असा एक दावा व्हाट्सअप च्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. आमच्या व्हाट्सअप टिपलाइनवर (9999499044) समान दावा उपलब्ध झाला असून सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे. ₹2000 च्या नोटा मागे घेतल्यानंतर ₹350 ची नवीन नोट आणि ₹75 व ₹60 ची नाणी भारतीय चलनात आणण्यात आली आहेत का? याचा शोध न्यूजचेकरने घेतला. आम्हाला नाणी आणि नोटा चलनात आणणाऱ्या RBI भारतीय रिझर्व्ह बँकेने अशाप्रकारची कोणतीही घोषणा केल्याचे निदर्शनास आले नाही. रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर आम्ही शोध घेतला. गुगल वर कीवर्ड सर्च च्या माध्यमातून आम्ही शोधून पाहिले, मात्र आम्हाला अशी कोणतीच माहिती आढळली नाही. आम्ही रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर याचा शोध घेण्याचे ठरविले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर 1947 ते 2011 पर्यंतच्या भारतीय नाण्यांच्या प्रतिमा सापडल्या. एक आणे, 25 पैसे, 50, 5 पैशांच्या नाण्याची चित्रे तसेच वर्तमान 2, 5 आणि 10 रुपयांच्या नाण्यांसोबत चित्रे मिळाली. येथे 75 किंवा 60 रुपयांच्या नाण्यांची चित्रे आम्हाला पाहायला मिळाली नाहीत. दुसरीकडे, 1949 ते 2016 या काळात 10, 20, 50, 100, 500 आणि 2000 रुपयांच्या नवीन नोटांची छायाचित्रे आहेत. 2016 मध्ये नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा एका रात्रीत बंद करण्यात आल्या होत्या. त्याऐवजी RBI ने 500 आणि 2000 रुपयांच्या नवीन नोटा बाजारात आणल्या. आरबीआयच्या वेबसाईटवर आम्हाला या नवीन नोटांची छायाचित्रे मिळतात, परंतु 350 रुपयांच्या नोटांचे चित्र दिसून आले नाही. न्यूजचेकरने यापूर्वी केलेल्या फॅक्टचेक नुसार ₹350 ची नोट हा एडिटेड प्रकार असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर फॅक्टचेक 14 सप्टेंबर 2019 रोजी करण्यात आलेले असल्याने ₹350 च्या नोटेचा फोटो 2019 पासूनच व्हायरल झालेला असल्याचे आमच्यासमोर स्पष्ट झाले आहे. कोणत्याही नोटेवर नोटेची किंमत सहसा ठळक अक्षरात लिहिली जाते, परंतु येथे फॉन्ट भिन्न आहे आणि ठळक नाही. जरी ही इतर कोणत्याही चलनी नोटची सुधारित आवृत्ती नसली तरी, ही प्रतिमा पूर्णपणे विपरीत बनविली गेली आहे, हे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे. ₹75 च्या नाण्यासंदर्भात शोध घेताना आम्हाला महाराष्ट्र टाइम्स ने प्रसिद्ध केलेली बातमी मिळाली. या बातमीत “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, 28 मे रोजी देशाच्या नवीन संसद भवनाच्या उद्घाटनानिमित्त 75 रुपयांचे विशेष स्मारक नाणे जारी केले. अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत आर्थिक व्यवहार विभागाच्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार, या नाण्याचे वजन सुमारे 34.65 ते 35.35 ग्रॅम आहे. हे नाणे कोणीही खरेदी करू शकतो. हे अधिकृत वेबसाइट www.indiagovtmint.in वरून डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे खरेदी केले जाऊ शकते. स्मारक नाणी रोखीने किंवा चेकने घेता येत नाहीत. तसेच तुम्हाला 10 पेक्षा जास्त नाणी खरेदी करायची असतील तर त्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड दाखवावे लागेल. या एका नाण्याची किंमत साधारणपणे ₹1300 पर्यंत होऊ शकेल.” अशी माहिती वाचायला मिळाली. अर्थात हे नाणे चलनात आलेले नसून नवीन संसद भवनाच्या उदघाटनाचे स्मरण राखण्याचा एक प्रयत्न असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले. ₹60 च्या नाण्यासंदर्भातही आम्ही शोध घेतला. आम्हाला 30 मार्च 2023 रोजी करण्यात आलेले एक ट्विट सापडले. केंद्रीय अर्थमंत्रालयाने काढलेल्या अध्यादेशानुसार सीबीआय च्या हीरक महोत्सवाच्या निमित्ताने ₹60 ची दोनशे नाणी काढण्यात आली आहेत. अशी माहिती आम्हाला मिळाली. यासंदर्भातील माहिती देणारा युट्युब व्हिडिओही आम्हाला @numismatist प्राप्त झाला. याचबरोबरीने ₹60 चे नाणे मार्च 2012 मध्ये भारत सरकार मिंट, कोलकाता च्या 60 वर्षांचा उत्सव साजरा करण्यासाठी जारी केले होते अशी माहितीही आम्हाला @numismatist या युट्युब चॅनेलवर प्राप्त व्हिडिओमध्ये मिळाली. व्हिडिओच्या माहितीमध्ये “अलीपूर टांकसाळ, कोलकाता हे भारत सरकारचे तत्कालीन अर्थमंत्री श्री सी. डी. देशमुख यांनी १९ मार्च १९५२ रोजी उघडले होते. या तारखेपासून अलिपूर टांकसाळमध्ये नाणे काढणे आणि पदके, सजावट आणि बॅज तयार करण्याचे संपूर्ण कामकाज सुरू झाले. याशिवाय, देशांतर्गत वापरासाठीच्या नाण्यांच्या उत्पादनातून इतर राष्ट्रांसाठीही नाणी तयार होतात. 60 रुपयांचे नाणे चतुर्थांश मिश्रधातूपासून बनविलेले आहे, म्हणजे 50% चांदी, 40% तांबे, 5% निकेल आणि 5% जस्त 35 ग्रॅम वजनाचे, 44 मिमी व्यासाचे आणि काठावर 200 सीरेशन्ससह आहे. नाण्याच्या मागील बाजूस अशोक स्तंभ, खाली रुपयाचे चिन्ह “₹” असे आणि भारत सत्यमेव जयते असे चित्र आहे.” अशी माहिती मिळाली. भारतीय रिझर्व्ह बँकेने अशा कोणत्याही नवीन नोटा आणि नाणी चलनात आणली नसून हा दावा खोटा असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे. Our Sources Twitter handle of RBI Official Website of RBI News published by Maharasthra Times Tweet made by @arvindgunasekar on March 30, 2023 Video published by @numismatist on April 3, 2023 Video published by @numismatist on May 2, 2023 कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in Prasad Prabhu January 18, 2025 Kushel HM January 17, 2025 Saurabh Pandey December 29, 2023
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • Hindi
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.115 as of Oct 09 2023


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data] Valid XHTML + RDFa
OpenLink Virtuoso version 07.20.3238 as of Jul 16 2024, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 5 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2025 OpenLink Software