schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
Claim
डॉ. भीमराव आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील भंडारा येथील करुणा यादववर बलात्कार केला होता.
Fact
या दाव्याला पुष्टी देणारी अधिकृत माहिती उपलब्ध नाही. डॉ. आंबेडकर यांच्यावरील अभ्यासकांनी हा दावा फेटाळला आहे. तसेच उपलब्ध पुराव्यानुसार दाव्यात निर्देशित केलेल्या तारखेला बाबासाहेब भंडारा येथे गेले नव्हते हेच सिद्ध झाले आहे.
डॉ. भीमराव आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील भंडारा येथील करुणा यादववर बलात्कार केला होता. असा एक दावा सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक युजर्स हा दावा करत आहेत. आम्हाला ट्विटरवर हा दावा पाहायला मिळाला.
या दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
“स्वतंत्र भारतातील पहिले बलात्कारी भीमराव आंबेडकर होते. हे मी नाही गुगल सांगते आहे. करुणा यादव, जी महाराष्ट्रातील भंडारा शहरात राहणारी एक सामान्य यादव परिवारातील कन्या होती. रेकॉर्ड अनुसार करुणा यादव चा जन्म २७ सप्टेंबर १९३७ ला झाला होता. करुणा यादव च्या परिवारात तिचे वडील विवेक यादव, आई शकुंतला यादव आणि एक छोटा भाऊ पुष्कर यादव होता. करुणा यादव या परिवाराची एकुलती मुलगी होती. २० जानेवारी १९५४ मध्ये भीमराव आंबेडकर यांच्याकडून बलात्काराची शिकार बनली होती.” असे हा दावा सांगतो. यानंतर तिच्या परिवाराचे गायब केले जाणे, त्यांची हत्या व इतर बाबींचा समावेश या दाव्यात वाचायला मिळतो.
Newschecker ने या दाव्यातील “२० जानेवारी १९५४ रोजी भंडारा शहरातील करुणा यादव या मुलीवर डॉ. भीमराव तथा बाबासाहेब आंबेडकर यांनी बलात्कार केला.” या प्रमुख भागावर फॅक्ट चेक करण्याचा निर्णय घेतला.
आम्ही यासंदर्भात Google वर काही कीवर्ड शोधले. या प्रक्रियेदरम्यान, आम्हाला विश्वसनीय स्त्रोतांकडून दाव्यासंदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. कोणतेही जुने मीडिया रिपोर्ट्स किंवा जुन्या बातम्यांची कात्रणेही मिळाली नाहीत.
शोध घेत असताना आम्हाला नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर प्रतिष्ठान तर्फे प्रकाशित डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण वांङमय खंड ४० या पुस्तकाची पीडीएफ सापडली.
१९४६ ते १९५६ दरम्यान त्यांनी दिलेल्या भेटी, केलेली भाषणे आणि इतर महत्वपूर्ण बाबींची माहिती त्यात आढळली. आम्ही करुणा यादव वर बलात्कार केल्याच्या तारखेनुसार या पुस्तकात शोध सुरु केला. यामध्ये त्यांनी २० जानेवारी १९५४ रोजी भंडारा येथे भेट दिल्याचा कोणताही संदर्भ आढळला नाही. दरम्यान पृष्ठ क्र. ३२४ वर आम्हाला वाचायला मिळाले की, “त्यांनी २४ जानेवारी १९५४ रोजी मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजच्या मैदानावर धर्मादाय विषयावर जाहीर सभेत भाषण केले होते.”
आम्ही या पुस्तकात आणखी शोधले. आम्हाला पृष्ठ ३३१ वर २१ एप्रिल १९५४ रोजी पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी नागपूरहून भंडारा येथे ते गेल्याचे सांगणारा मजकूर तेथे वाचायला मिळाला.
दरम्यान डॉ. आंबेडकर २० जानेवारी १९५४ रोजी नव्हे तर २१ एप्रिल १९५४ रोजी भंडारा येथे गेल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले.
आम्ही करुणा यादव या मुलीचा आणि डॉ. आंबेडकर यांचा राजकीय, सामाजिक किंवा वैयक्तिक संबंध होता का? याविषयावर शोधले मात्र आम्हाला तशी कोणतीच माहिती मिळाली नाही.
दरम्यान आम्ही राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासकेंद्राचे माजी संचालक आणि मराठी विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत वाघमारे यांच्याशी संपर्क साधला, “हा प्रकार बदनामी करणारा असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर असे आरोप करताना किमान इतिहासाची पाने चाळून बघायला हवी होती. हा आरोप धादांत खोटा आहे.” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान अशाप्रकारची घटना घडल्याचे अधिकृतपणे सांगणारे कोणतेही मीडिया रिपोर्ट्स उपलब्ध नसल्याने काल्पनिक प्रसंग रंगवून जातीय द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.
अशाप्रकारे आमच्या तपासात या दाव्याला पुष्टी देणारी अधिकृत माहिती उपलब्ध नाही. डॉ. आंबेडकर यांच्यावरील अभ्यासकांनी हा दावा फेटाळला आहे. तसेच उपलब्ध पुराव्यानुसार दाव्यात निर्देशित केलेल्या तारखेला बाबासाहेब भंडारा येथे गेले नव्हते हेच सिद्ध झाले आहे.
Our Sources
Google Search
Dr. Babasaheb Ambedkar Complete Vangamay Volume 40
Conversation with Dr. Chandrakant Waghmare
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in
फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
|