schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
Claim
शर्माच्या जागी अलीकडेच मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून निवड झालेल्या हार्दिक पांड्यासमोर चाहत्यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.
Fact
अशी घटना घडलेली नाही. व्हिडिओ संपादित केल्याचे आढळले.
अनेक सोशल मीडिया युजर्स एक व्हिडिओ प्रसारित करत आहेत, ज्यामध्ये भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या चाहत्यांनी विमानतळावर विरोध करीत त्याच्यासमोर घोषणाबाजी केल्याचा दावा केला आहे. “लोक हार्दिक पांड्यासमोर ‘मुंबई चा राजा रोहित शर्मा’ असे ओरडत आहेत. हार्दिक पांड्याच्या समोर रोहित शर्माच्या चाहत्यांनी घोषणाबाजी केल्याचा दावा अनेक प्लॅटफॉर्म्सवर अनेक भाषांमध्ये व्हायरल झाला आहे.
आम्हाला हा दावा इंस्टाग्रामवरही आढळला.
गुजरात टायटन्सचा आयपीएल-विजेता स्किपर पांड्या नोव्हेंबर 2023 मध्ये त्याच्या जुन्या फ्रेंचायझी, मुंबई इंडियन्समध्ये परतला आणि डिसेंबरमध्ये, शर्माला बदलून त्याला एमआयचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले, 10 वर्षे फ्रेंचायझीचे नेतृत्व करणाऱ्या शर्माची जागा घेण्यावरून शर्माच्या चाहत्यांकडून विशेषतः सोशल मीडियावर पांड्यावर टीका आणि संताप व्यक्त झाला होता. याच पार्श्वभूमीवर हा दावा इतर भाषांमध्येही पाहायला मिळाला.
Newschecker ने प्रथम “हार्दिक पांड्या समोर रोहित शर्माच्या चाहत्यांची घोषणाबाजी” साठी कीवर्ड शोध घेतला, मात्र आम्हाला कोणत्याही विश्वासार्ह बातम्या मिळाल्या नाहीत. यामुळे आमची शंका वाढली.
त्यानंतर आम्ही व्हिडिओच्या कीफ्रेमची रिव्हर्स इमेज सर्च केली. ज्यामुळे आम्हाला 30 एप्रिल 2020 रोजी “हार्दिक पांड्या विमानतळावर जात आहे” असे शीर्षक असलेल्या या Youtube व्हिडिओकडे नेले. असाच एक व्हिडिओ आणि बातम्यांचा रिपोर्ट येथे आणि येथे पाहिला जाऊ शकतो. मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून नियुक्ती होण्याआधीचा हा व्हिडीओ घेण्यात आल्याची पुष्टी यातून होते.
त्यानंतर शोध घेताना आम्हाला एक व्हिडीओ सापडला, जो रोहित शर्माचा समावेश असलेल्या सामन्यादरम्यान घेतलेला होता, जिथे तुम्हाला व्हायरल व्हिडिओतील घोषणाबाजी प्रमाणेच गर्दीचा एक भाग “मुंबई चा राजा रोहित शर्मा” असा नारा देताना ऐकू येतो. हा व्हिडिओ 18 जानेवारी 2020 रोजी कर्णधारपदाच्या हस्तांतरणापूर्वी अपलोड करण्यात आला होता. समान व्हिडिओ येथे आणि येथे पाहिले जाऊ शकतात. यावरून व्हायरल व्हिडिओमध्ये जुन्या व्हिडिओतील साउंड ट्रॅक चा वापर करण्यात आल्याचे स्पष्ट होते.
हार्दिक पांड्यासमोर रोहित शर्माच्या चाहत्यांनी घोषणाबाजी केल्याच्या नावाखाली व्हायरल करण्यात आलेला व्हिडीओ एडिटेड असल्याचे आमच्या निदर्शनास आले.
Sources
Youtube video, April 30, 2020
Youtube video, January 18, 2020
(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर इंग्रजीसाठी सर्वप्रथम कुशल एच. एम. यांनी केले असून येथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad Prabhu
February 12, 2025
Runjay Kumar
February 11, 2025
Ishwarachandra B G
February 8, 2025
|