Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
पूजा चव्हाण या युवतीच्या मृत्यू वादात अडकलेले महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री संजय राठोड आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचा फोटो व्हायरल होत आहे. यावर सोशल मीडियातून चित्रा वाघ यांना आता आम्ही काय समजायचं असा प्रश्न विचारला जात आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील हडपसर भागात मूळची बीड जिल्ह्यातील परळीच्या पूजा चव्हाण नामक 22 वर्षीय युवतीचा गॅलरीतून खाली पडून मृत्यू झाला. ती हत्या होती का आत्महत्या होती याबाबत माहिती मिळालेली नाही. मात्र पूजाच्या मृत्यूनंतर 12 आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्या. यानंतर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी या प्रकरणाच्या मुळाशी वनमंत्री संजय राठोड हेच असल्याचे आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी केली. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी देखील पुण्यात पूजा राहत असलेल्या सोसायटीला भेट दिली आणि यानंतर पत्रकार परिषद घेत पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शिवाय तपास अधिका-याला देखील फैलावर घेत या प्रकरणात संजय राठोड यांचाच हात असल्याचे ठामपणे सांगितले.
मात्र चित्रा वाघ यांच्या पत्रकार परिषदेनंतर दुस-या दिवशी संजय राठोड आणि चित्रा वाघ यांचा हातात हात घेतलेला एक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे आणि यात चित्रा वाघ यांना आता आम्ही काय समजायचं असा प्रश्न देखील विचारण्यात आला आहे. आमच्या एका वाचकाने आम्हाला या व्हायरल फोटो सत्य काय आहे याची पडताळणी करण्याची विनंती केली आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ आणि पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी आरोप होत असलेले मंत्री संजय राठोड यांचा फोटो खरा आहे की माॅर्फ केलेला आहे याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. यासाठी गूगलमध्ये काही किवर्डसच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला टिव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर बातमी आढळून आली.
या बातमी म्हटले आहे की, पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ सातत्याने आवाज उठवत आहेत. संजय राठोड यांचं नाव घेत त्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचेच मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडालीय. त्या फोटोमध्ये चित्रा वाघ आणि संजय राठोड एकदम जवळ उभे असून, एकत्र दिसत आहेत. चित्रा वाघ यांनी आता या प्रकरणात मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी केलीय. तसेच चित्रा वाघ यांनी त्या फोटोंसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनाही यासंदर्भात चित्रा वाघ यांनी कल्पना दिलेली आहे.
चित्रा वाघ यांचा फोटो माॅर्फ असल्याचे स्पष्ट होताच आम्ही मूळ फोटो शोधण्याचा प्रयत्न केला. याकरिता आम्ही माॅर्फ फोटो Google Reverse Image च्या साहाय्याने शोधला असता आम्हाला चित्रा वाघ यांची 16 एप्रिल 2020 रोजी फेसबुक पोस्ट आढळून आली. ज्यात त्यांनी आपले पती किशोर वाघ यांच्यासोबतच्या आठवणी तसेच काही फोटो शेअर केले आहेत. त्यात माॅर्फ फोटोचा मूळ फोटो देखील आहे.
यावरुन हे स्पष्ट झाले की, चित्रा वाघ यांचे पति किशोर वाघ यांचा फोटो माॅर्फ करुन त्यांच्या जागी संजय राठोड यांचा चेहरा लावण्यात आला आहे. चित्रा वाघ यांनी माहिती प्रसाररण मंत्री रविशंकर प्रसाद यांना असा खोडसाळपणा करणा-याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहेत.
यावरुन हे स्पष्ट होते की, चित्रा वाघ यांचा पती किशोर वाघ यांच्यासोबतचा फोटो माॅर्फ करुन त्या जागी संजय राठोड यांचा चेहरा लावण्यात आला आहे.
Facebook- https://www.facebook.com/281871402277463/posts/874958722968725/
TV9 Marathi- https://www.tv9marathi.com/politics/chitra-wagh-morph-photo-with-sanjay-rathod-complaint-to-cm-and-home-minister-over-offensive-photo-408698.html
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.