schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
व्हाट्सअप आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक संदेश मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे, ज्यात दावा केला आहे की तामिळनाडूमधील न्यायालयीन सुनावणीदरम्यान, मुस्लिम गटांनी कबूल केले की ‘हलाल’ची प्रक्रिया केवळ अन्नपदार्थांवर थुंकले तरच पूर्ण होते. मेसेजमध्ये तमिळनाडूच्या इंदू मक्कल काची यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये केलेले ट्विट देखील आहे आणि त्यांनी हलाल रेस्टॉरंटमध्ये खाण्याविरुद्ध सावधानतेचा इशारा दिला आहे. न्यूजचेकरला हे दावे असत्य असल्याचे आढळले.
हाच संदेश फेसबुकवरही शेयर करण्यात येत आहे.
Newschecker ला Facebook वर समान मथळ्यांसह समान दावे आढळले.
आम्ही Google वर “हलाल”,“थुंकणे”,“तमिळनाडूतील न्यायालयीन केस” या शब्दांसह कीवर्ड शोध घेऊन आमचा तपास सुरू केला आणि तमिळनाडूमध्ये घडलेल्या अशा कोणत्याही घटनेचा अहवाल आढळला नाही.
अधिक तपास केल्यावर, आम्हाला एक प्रकरण आढळले ज्यामध्ये याचिकाकर्त्याने अन्नात थुंकल्याशिवाय ‘हलाल’ पूर्ण होत नाही असा दावा केला होता. सबरीमाला कृती समितीचे महासंयोजक एसजेआर कुमार यांनी केरळ उच्च न्यायालयात केस दाखल केली होती, ज्यांनी शबरीमाला मंदिराची देखरेख करणार्या त्रावणकोर देवस्वोम बोर्ड (TDB) वर आक्षेप घेतला होता, या बोर्डाने नैवेद्य आणि प्रसादम तयार करण्यासाठी हलाल-प्रमाणित गुळाचा वापर केला होता.
हलाल-प्रमाणित उत्पादनांच्या वापराविरूद्ध याचिकाकर्त्याने लावलेल्या अनेक आरोपांपैकी एक आरोप असे सांगतो कि “मुस्लिम समुदायाचे धार्मिक विद्वान सार्वजनिकरित्या घोषित करत आहेत की अन्न सामग्री तयार करताना हलाल प्रमाणित करण्यासाठी लाळ आवश्यक घटक आहे. धार्मिक विद्वानांनी पवित्र ग्रंथ आणि त्याचे वैध विवेचन करून वरील मत घेतले. तथापि, धार्मिक नेत्यांच्या इतर गटांनी देखील भिन्न मते व्यक्त केली.”
न्यूजचेकरला आढळले की व्हायरल संदेशात नमूद केलेला दावा याचिकाकर्त्याने त्यांच्या युक्तिवादाचा भाग म्हणून केला होता आणि कोणत्याही मुस्लिम गटाने नाही.
आम्हाला पुढे आढळून आले की केरळ उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला सुनावणीदरम्यान “हलाल” या शब्दाच्या समजण्याबद्दल प्रश्न विचारला. “हलाल फक्त असे सांगते की काही गोष्टी निषिद्ध आहेत आणि इतर सर्व गोष्टींना परवानगी आहे.हे प्रमाणन फक्त असे सांगते की उत्पादनामध्ये काही निषिद्ध घटक नसतात, “कोर्टाने LiveLaw अहवालानुसार म्हटले आहे.
न्यूजचेकरला न्यूज मिनिटचा एक अहवाल देखील सापडला ज्याचे शीर्षक आहे ‘तुम्हाला हलालचा अर्थ माहित आहे का? केरळ हायकोर्टाने याचिकाकर्त्याला 25 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांच्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या सबरीमाला गुळाच्या प्रकरणाबद्दल माहिती दिली. अहवालात असे म्हटले आहे की न्यायमूर्ती अनिल के. नरेंद्रन आणि पीजी अजितकुमार यांच्या खंडपीठाने कुमार यांना हलालचा अर्थ पूर्णपणे समजून घेण्याचा सल्ला दिला.
“18 नोव्हेंबर रोजी,सबरीमाला येथील भगवान अय्यप्पा मंदिराचे व्यवस्थापन करणार्या त्रावणकोर देवस्वोम बोर्डाने (टीडीबी) न्यायालयाला सांगितले की, त्यांना मिळालेल्या गुळाच्या पॅकेजिंगवर ‘हलाल’ असा उल्लेख आहे कारण ते गूळ कंपनी अरब देशांमध्येही निर्यात अर्थात पुरवठा करत आहे,” मात्र,या प्रकरणी कोणताही निकाल देण्यापूर्वी अधिक तपशीलवार सुनावणी आवश्यक असल्याचे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.
न्यूजचेकरला या प्रकरणाशी संबंधित कोणतेही अलीकडील अहवाल सापडले नाहीत.
तामिळनाडूतील कायदेशीर सुनावणीदरम्यान मुस्लिम गटांनी थुंकणे हा ‘हलाल’चा अविभाज्य भाग असल्याचे मान्य केले, असा दावा करणारे व्हायरल व्हाट्सअप फॉरवर्ड खोटे आहे. न्यूजचेकरला असे आढळले की वास्तविक न्यायालयीन केस केरळ उच्च न्यायालयात SJR कुमार नावाच्या याचिकाकर्त्याने दाखल केली होती आणि दावा याचिकाकर्त्याने याचिकेत केलेल्या अनेक आरोपांपैकी एक होता.
Our Sources
Petition filed by SJR Kumar in Kerala on Verdictum on 17th November, 2021
Report by Live Law on 24th November, 2021
Report by News Minute on 25th November, 2021
तुम्हाला एकाद्या क्लेमची फॅक्ट-तपासणी करायची असेल, फीडबॅक द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर 9999499044 वर व्हॉट्सअप करा किंवा checkthis@newschecker.in वर ईमेल करा.
Prasad Prabhu
August 7, 2024
Ishwarachandra B G
June 27, 2024
Prasad Prabhu
June 21, 2024
|