schema:text
| - Fact Check: बांगलादेशातील बाबरी मशिदीवरील डॉक्युमेंटरी संबंधित दिशाभूल करणारा व्हायरल व्हिडिओ महाराष्ट्रातील आहे
6 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील मुंब्रा येथे सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया तर्फे बाबरी मशिदीवर आधारित तयार केलेली डॉक्युमेंटरी दाखविण्यात आली होती, ज्यात बांगलादेशातील हिंदूंच्या विरोधात मुस्लिमांना भडकावणारी डॉक्युमेंटरी दाखवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.
- By: Abhishek Parashar
- Published: Dec 18, 2024 at 05:28 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज). बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराशी जोडून व्हायरल केल्या जात असलेल्या एका व्हिडिओतून दावा करण्यात येत आहे की, तिथे सार्वजनिक ठिकाणी स्क्रीन लावून बाबरी ढाचा पाडण्याच्या घटनेवर आधारित डॉक्युमेंटरी दाखवून मुस्लिमांना हिंदूंविरोधी हिंसाचार करण्यास प्रवृत्त केले जात आहे.
विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळून आले. व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा, भारतीय राजकीय पक्ष, सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) चा आहे, ज्यात महाराष्ट्रातील मुंब्रा येथे 6 डिसेंबर रोजी, बांगलादेशच्या नावाने शेअर केला जाणारी, बाबरी मशिदीवर एक डॉक्युमेंटरी दाखवली जात आहे. ही डॉक्युमेंटरी विनापरवाना सार्वजनिकरित्या दाखवल्याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
काय होत आहे व्हायरल?
सोशल मीडिया वापरकर्ता, ‘Sanju Raghav’ ने व्हायरल व्हिडिओ (संग्रहित लिंक) शेअर करत लिहिले आहे की, “अशा प्रकारे बांगलादेशात, मोठे मोठे स्क्रीन लावून बाबरी ढाच्याची कारसेवा दाखवण्यात येत आहे, जेणेकरून उरलेल्या 1.30 कोटी हिंदूंची हत्या करून बांगलादेशला दारुल इस्लाम बनवता येईल. मी देशभरातील हिंदू संघटनांना आवाहन करतो की, त्यांनी सुद्धा भारतात डायरेक्ट ॲक्शन डे, काश्मीरमधील हिंदूंचा नरसंहार, नोआखली दंगली, मोपला नरसंहार हे मोठे स्क्रीन लावून प्रदर्शित करावेत, जेणेकरून ते झोपलेल्या हिंदू समाजाला पाहता येतील.”
याच दाव्यासह हा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे.
तपास
व्हायरल झालेला हा व्हिडिओ चार मिनिटांचा आहे आणि तो एका डॉक्युमेंटरीचा भाग असून त्याखाली चालणाऱ्या टायटलमध्ये ‘Social Democratic Party Of India’ असे लिहिलेले दिसून येत आहे आणि चित्रपटाच्या स्क्रीनच्या मागे काही झेंडेही दिसत आहेत. या आधारे शोध घेतला असता, व्हायरल व्हिडिओशी जुळणारा ‘SDPI Mumbra Kalwa’ या हँडलवरून पोस्ट केलेला व्हिडिओ सापडला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा (मुंबई) येथे दाखवण्यात आलेला बाबरी मशिदीच्या टाइमलाइनवर आधारित ही डॉक्युमेंटरी आहे. आम्हाला ‘SDPI Kalwa Mumbra’ च्या युट्युब चॅनलवर 6 डिसेंबर 2024 रोजी अपलोड करण्यात आलेली ही संपूर्ण डॉक्युमेंटरी सापडली.
तसेच व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारा जो झेंडा दिसून येत आहे, तो सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा (SDPI) चा झेंडा आहे.
निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) हा भारतातील नोंदणीकृत पक्ष असून, मोइद्दीनकुट्टी हे या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि या पक्षाने 2024 ची लोकसभा निवडणूकही लढवली होती.
लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा की, अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्याच्या 32 व्या वर्धापनदिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी मुंब्रा येथे एसडीपीआयने ही डॉक्युमेंटरी दाखवली होती.
व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात, आम्ही मुंब्रा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, “कोणतीही परवानगी न घेता हा चित्रपट दाखवला जात होता आणि पोलिसांनी याप्रकरणी गुन्हाही दाखल केला आहे.” या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्क्रीनिंग थांबवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणात, भारतीय नागरीक संरक्षण संहिता 2023 चे कलम 223, 126 (2), महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(3) आणि 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण नऊ जणांची नावे नोंदवली आहेत.
विश्वास न्यूजकडे या प्रकरणात दाखल केलेल्या एफआयआरची प्रत देखील आहे, जी आपण येथे पाहू शकता.
बातम्यांनुसार, परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी बांगलादेशला भेट दिली आणि त्यांच्या भेटीदरम्यान त्यांनी बांगलादेशचे परराष्ट्र सचिव, तौहीद हुसेन यांची भेट घेतली आणि बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत भारताच्या चिंता व्यक्त केल्या. मिसरी यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांचीही भेट घेतली आणि अल्पसंख्याक समुदायाच्या सुरक्षेबाबत भारताच्या चिंता त्यांच्याकडेही व्यक्त केल्या.
लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे, बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर हिंदूंवरील हिंसाचाराच्या अनेक घटना पुढे आल्या आहेत. या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, भारत सरकारने हिंसाचाराच्या या घटना गांभीर्याने घेतल्या आहेत आणि बांगलादेश सरकारकडे आपली चिंता व्यक्त केली आहे.
बनावट दाव्यासह व्हायरल व्हिडिओ शेअर करणाऱ्या वापरकर्त्याचे फेसबुकवर सुमारे पाच हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. बांगलादेशशी संबंधित इतर व्हायरल दाव्यांचे फॅक्ट चेक रिपोर्ट येथे वाचता येतील.
निष्कर्ष: 6 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील मुंब्रा येथे सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया तर्फे बाबरी मशिदीवर आधारित तयार केलेली डॉक्युमेंटरी दाखविण्यात आली होती, ज्यात बांगलादेशातील हिंदूंच्या विरोधात मुस्लिमांना भडकावणारी डॉक्युमेंटरी दाखवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.
- Claim Review : बांगलादेशात मुस्लिमांना हिंदूंविरोधात भडकवण्यासाठी दाखवली जात असलेली बाबरी मशिदीवरील डॉक्युमेंटरी.
- Claimed By : FB User-Sanju Raghav
- Fact Check : Misleading
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.
|