About: http://data.cimple.eu/claim-review/7d37dee5c43358f23ff5e09b17b7e6ff0a27e6dc293abe14c4a157de     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Authors Claim कोठूनतरी एक पक्षी येतो आणि ध्वजस्थंभावर अडकलेला ध्वज फडकावून जातो असे दर्शविणारा एक व्हिडीओ केरळच्या गावात राष्ट्रध्वज फडकवणारा पक्षी असे सांगून व्हायरल करण्यात आला आहे. अशाप्रकारच्या पोस्टच्या संग्रहित आवृत्ती येथे, येथे आणि येथे पाहता येतील. न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे. Fact हा व्हिडीओ केरळमधील असल्याचा दावा होत असल्याने आम्ही मल्याळम कीवर्ड वापरून कीवर्ड शोधत घेतला, आम्हाला त्याच घटनेचा दुसऱ्या अँगलमधून चित्रित केलेला व्हिडिओ 17 ऑगस्ट, 2024 रोजी प्रभाकरन कुट्टोथ या युजरने शेअर केलेला असल्याचे आढळले. व्हिडिओत एक कावळा ध्वज स्थंभाच्या मागे असलेल्या नारळाच्या झाडाकडे उडत येऊन बसताना स्पष्टपणे दिसतो. ध्वज फडकवल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट ऐकून कावळा उडून जात असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. आम्हाला 18 ऑगस्ट 2024 रोजी 24 News ने YouTube वर शेअर केलेला आणखी एक व्हिडिओ सापडला आहे जो नारळाच्या झाडावर बसलेला कावळा दाखवत आहे. या व्हिडिओने स्पष्ट केले आहे की ऑप्टिकल इल्युजनचा प्रकार येथे घडला असून ज्यामुळे अनेक युजर्सना कावळ्यानेच ध्वज फडकावला यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडले. आम्ही पुढे मामपद पंचायतीचे प्रभाग क्रमांक 7 चे सदस्य शिहाब यांच्याशी संपर्क साधला, ते व्हिडिओमध्ये ध्वज फडकावताना दिसत आहेत. “हे कट्टुमुंडा, मारमंगलम येथील एका अंगणवाडीत घडले,” असे ते म्हणाले, “व्हायरल व्हिडिओ ज्या विचित्र अँगलमध्ये चित्रित करण्यात आला होता, त्यामुळे असे दिसते की कावळ्याने ध्वज फडकवण्यास मदत केली होती.” अशी माहिती त्यांनी दिली. Result: False Sources Facebook post by Prabhakaran Kuttoth on August 17, 2024 YouTube video by 24 News on August 18, 2024 Telephone Conversation with Shihab, Member Mambad Grama Panchayat कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • Hindi
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.115 as of Oct 09 2023


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data] Valid XHTML + RDFa
OpenLink Virtuoso version 07.20.3238 as of Jul 16 2024, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 11 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2025 OpenLink Software