schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
Claim
हा व्हिडिओ मणिपूरमधील कुकी ख्रिश्चन मुलीवर झालेल्या हल्ल्याचा आहे.
Fact
हा दावा खोटा आहे. हा व्हिडिओ म्यानमारचा असून जवळपास एक वर्ष जुना आहे.
मणिपूरमध्ये कुकी ख्रिश्चन मुलीशी क्रूरपणे वागल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गणवेशधारी जवान एका मुलीला बेदम मारहाण करताना दिसत आहेत.
१८ जून रोजी सुनीता जाधव नावाच्या ट्विटर युजरने हा व्हिडिओ शेअर केला होता. मात्र, नंतर त्यांनी आपले ट्विट डिलीट केले, मात्र तोपर्यंत या ट्विटला १८०० हून अधिक रिट्विट्स मिळाले होते.
मणिपूरमध्ये गेल्या महिनाभरापासून हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, या काळात मणिपूरमध्ये १०० हून अधिक लोक मारले गेले आहेत, तर ५०,००० हून अधिक लोकांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. अहवालानुसार, ३ मे रोजी राज्याच्या इतर आदिवासी समुदायांसह मैतेई समुदायाने आदिवासी दर्जाच्या मागणीसाठी निषेध करण्यासाठी रॅली काढली तेव्हा हिंसाचार सुरू झाला. या रॅलीला नंतर हिंसक वळण लागले. मैतेई बहुल भागात राहणाऱ्या कुकी समाजाची घरे जाळण्यात आली. दरम्यान, राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनीही मणिपूरला भेट दिली आहे.
दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी, आम्ही इनव्हिड टूलच्या मदतीने व्हायरल व्हिडिओचे काही मुख्य फ्रेम्स कॅप्चर केले. यानंतर, Yandex वर एक कीफ्रेम रिव्हर्स सर्च केली. आम्हाला डिसेंबर २०२२ मध्ये ‘Clickforpdf‘ नावाच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेला रिपोर्ट सापडला. त्यात व्हायरल व्हिडिओचा स्क्रीनग्राब आहे. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ही घटना म्यानमारच्या तामू शहरातील आहे. तेथील सरकारने सांगितले की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तामूच्या सागिंग भागात एका महिलेला गोळ्या घालून ठार मारण्यात आले आहे. हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असून दोषींना कठोर शिक्षा केली जाईल.
याव्यतिरिक्त, आम्हाला बर्मी भाषेत ८ डिसेंबर २०२२ रोजीचे ट्विट आढळले. त्यात दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओमध्ये दिसणार्या मुलीचे नाव Aye Ma Tun आहे. ट्विटमध्ये म्यानमारच्या ‘Mizzima’ या न्यूज वेबसाइटच्या पोस्टची लिंक देखील आहे. पोस्टनुसार, “व्हिडिओमधील महिला २४ वर्षीय Aye Ma Tun आहे आणि ती तामू शहरात राहत होती. तेथील स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार ही महिला मिलिटरी कौन्सिलची हेर होती. पीपल्स डिफेन्स फोर्सेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना जून २०२२ मध्ये घडली होती.”
याव्यतिरिक्त, आम्हाला म्यानमार-आधारित मीडिया वेबसाइट Democratic Voice of Burma वर ८ डिसेंबर रोजी प्रकाशित केलेला रिपोर्ट सापडला. त्यात असे म्हटले आहे की हा व्हिडिओ कथितपणे जून 2021 मध्ये बनविला गेला होता, परंतु 3 डिसेंबर रोजी फेसबुकवर शेअर करण्यात आला होता. त्यानुसार, पीडित २४ वर्षीय Aye Ma Tun असून तिची तामू-आशिया महामार्गावर हत्या करण्यात आली. सीडीएममध्ये काम करण्यास नकार दिल्यानंतर पीपल्स डिफेन्स फोर्सने या महिलेची हत्या केली. CDM हा नागरी सेवकांचा एक गट आहे ज्यांनी लष्करी राजवटीत सेवा करण्यास नकार दिला आहे.
तपासादरम्यान, आम्हाला डिसेंबर २०२२ मध्ये काही युजर्सनी केलेले ट्विट आढळले, ज्यामध्ये व्हायरल व्हिडिओचे व्हिज्युअल आणि स्क्रीनग्राब आहेत. हा व्हिडिओ म्यानमारचा असल्याचे सांगण्यात येत आहे. तुम्ही हे ट्विट इथे, इथे आणि इथे पाहू शकता.
अशाप्रकारे, आमच्या तपासातून हे स्पष्ट झाले आहे की म्यानमारमधील एका वर्षाहून जुना व्हिडिओ मणिपूरमधील अलीकडील हिंसाचाराशी जोडून शेअर केला जात आहे.
Our Sources
Report Published at Click for Pdf on December 8, 2022
Report Published at Democratic Voice of Bangladesh on December 8, 2022
Tweet by a user Mr Win on December 4, 2022
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in
Tanujit Das
April 29, 2024
Arjun Deodia
May 5, 2023
Prasad Prabhu
July 24, 2023
|