About: http://data.cimple.eu/claim-review/83f437d5d5339441e08cb448de46247452815fa15d996fc5c55aeb86     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check Contact Us: checkthis@newschecker.in Fact checks doneFOLLOW US Fact Check (हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर इंग्रजीसाठी वसुधा बेरी यांनी केले आहे.) विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ ने मार्च 2022 मध्ये रिलीज झाल्यानंतर ऑनलाइन वर पुरेशी खळबळ उडवून दिली होती. आता अग्निहोत्रीच्या ट्विटनंतर “@TheAcademy च्या पहिल्या यादीत #Oscars2023 साठी शॉर्टलिस्ट” करण्यात आल्याचा दावा करून हा चित्रपट पुन्हा सोशल मीडियाच्या चर्चेत आला आहे. हे ट्विट आणि त्याबद्दलच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. 1990 मध्ये काश्मिरी पंडित समुदायाच्या स्थलांतरणावर आधारित चित्रपटाबद्दल त्या ट्विट चा आधार घेऊन बातम्या देण्यासाठी अनेक वृत्तवाहिन्या पुढे सरसावल्या आहेत. न्यूजचेकरला हा दावा दिशाभूल करणारा वाटला कारण 95 व्या अकादमी पुरस्कारासाठी फक्त चार भारतीय चित्रपट निवडले गेले आहेत आणि काश्मीर फाइल्स त्यामध्ये नाही. 10 जानेवारी 2023 रोजी केलेल्या ट्विटमध्ये अग्निहोत्री म्हणाले, “BIG ANNOUNCEMENT: #TheKashmirFiles has been shortlisted for #Oscars2023 in the first list of @TheAcademy. It’s one of the 5 films from India. I wish all of them very best. A great year for Indian cinema. (sic)” अग्निहोत्रीच्या “Big announcement” नंतर लगेचच, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स काश्मीर फाइल्स टीमसाठी अभिनंदन संदेशांनी भरून गेले. भाजप बंगालचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सुकांता मजुमदार यांच्यासह काही युजर्सनी एक पाऊल पुढे टाकले आणि ऑस्करसाठी “नामांकन” मिळाल्याबद्दल चित्रपटाचे कौतुक केले. अशा ट्विटच्या संग्रहित आवृत्त्या येथे, येथे, येथे आणि येथे पाहिल्या जाऊ शकतात. “द काश्मीर फाईल्स,” आणि “ऑस्कर 2023” साठी गुगल सर्च केल्याने आम्हाला NDTV द्वारे प्रसिद्ध केलेल्या 10 जानेवारी 2023 रोजीच्या रिपोर्टकडे नेले, ज्याचे शीर्षक ‘ऑस्कर 2023: RRR, कांतारा आणि काश्मीर फाइल्स ऑन रिमाइंडर लिस्ट‘ असे आहे, “अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने ऑस्करसाठी पात्र असलेल्या 301 फीचर फिल्म्सची यादी जाहीर केली आहे आणि त्यात एसएस राजामौलीचा आरआरआर, संजय लीला भन्साळीचा गंगूबाई काठियावाडी, विवेक अग्निहोत्रीचा द काश्मीर फाइल्स आणि ऋषभ शेट्टीचा कांतारा…” यांचा समावेश आहे. रिपोर्टमध्ये पुढे म्हटले आहे की, “FYI, या यादीमध्ये अशा चित्रपटांचा समावेश आहे जे अधिकृतपणे विविध श्रेणींमध्ये स्पर्धा करू शकतात परंतु केवळ यादीत दाखवल्याने चित्रपट 24 जानेवारी रोजी जाहीर होणार्या अकादमी पुरस्कारांच्या अंतिम नामांकनात पुढे जाईल याची हमी देत नाही.” ऑस्करसाठी चित्रपट शॉर्टलिस्ट झाल्याचा उल्लेख पाहायला मिळाला नाही. आम्ही पुढे ऑस्करची अधिकृत वेबसाइट स्कॅन केली आणि पुरस्कारांसाठी निवडलेल्या किंवा नामांकित चित्रपटांची कोणतीही अलीकडील सूचना/घोषणा शोधली. तथापि, वेबसाइटवर उपलब्ध शॉर्टलिस्ट केलेल्या चित्रपटांची नावे असलेले सर्वात अलीकडील रिलीज 21 डिसेंबर 2022 रोजी केले असल्याचे आम्हाला पाहावयास मिळाले. त्यात म्हटले आहे, “द अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने आज 95व्या अकादमी पुरस्कारांसाठी 10 श्रेणींमध्ये शॉर्टलिस्ट जाहीर केली: डॉक्युमेंटरी फीचर फिल्म, डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म, इंटरनॅशनल फीचर फिल्म, मेकअप आणि हेअरस्टाइल, संगीत (मूळ स्कोअर), संगीत (मूळ) गाणे), अनिमेटेड शॉर्ट फिल्म, लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म, साउंड आणि व्हिज्युअल इफेक्ट्स.” रिलीझचे स्कॅनिंग केल्यावर आम्हाला चार भारतीय चित्रपटांची नावे आढळली- द एलिफंट व्हिस्परर्स, लास्ट फिल्म शो, आरआरआर आणि ऑल दॅट ब्रेथ्स. पण आम्हाला ‘द काश्मीर फाइल्स’ सापडले नाही. वेबपेजवर अग्निहोत्रीच्या चित्रपटासाठी कीवर्ड शोध केला मात्र तशी कोणतीच माहिती हाती आली नाही. रिलीझमध्ये असे म्हटले आहे की, “नामांकनांचे मतदान गुरुवार, 12 जानेवारी, 2023 रोजी सुरू होईल आणि मंगळवार, 17 जानेवारी, 2023 रोजी संपेल. 95 व्या अकादमी पुरस्कारांसाठी नामांकनांची घोषणा मंगळवार, 24 जानेवारी, 2023 रोजी केली जाईल.” यामुळे आम्हाला असा निष्कर्ष काढण्यात मदत झाली की ऑस्कर 2023 साठीची नामांकन यादी अद्याप जाहीर केली गेली नाही आणि म्हणूनच काश्मीर फाइल्स अकादमी पुरस्कारांसाठी “नामांकन” झाल्याचा व्हायरल दावा खरा नाही. आम्ही आमचा तपास चालू ठेवला आणि 9 जानेवारी 2023 रोजी ’95 व्या अकादमी पुरस्कारांसाठी 301 वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट’ या नावाने वेबसाईटवर प्रकाशित झालेले प्रकाशन आढळून आले, “95 व्या अकादमी पुरस्कारांसाठी पात्र प्रॉडक्शनची स्मरणपत्र सूची’ http://www.oscars.org/oscars/rules-eligibility येथे उपलब्ध आहे. रिमाइंडर लिस्टमध्ये अभिनय श्रेणींमध्ये विचारात घेण्यासाठी पात्र कलाकारांचा देखील समावेश आहे. लिंकची तपासणी केल्यावर, आम्हाला पीडीएफ यादीत चित्रपटाची शीर्षके आणि अभिनेते/अभिनेत्री यांच्या नावांवर निर्देशित करण्यात आले होते, जे 95 व्या अकादमी पुरस्कारांसाठी पात्र आहेत. (ऑस्कर 2023). विशेष म्हणजे, या यादीमध्ये द काश्मीर फाइल्स, इराविन निझाल, विक्रांत रोना, ऑल दॅट ब्रीदस, कंतारा आणि गंगूबाई काठियावाडी यासह इतर (5 हून अधिक) भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. रिमाइंडर लिस्ट असलेल्या रिलीझनुसार, “95 व्या अकादमी पुरस्कार वर्षासाठी लागू केलेल्या नियमांनुसार विचारासाठी पात्र होण्यासाठी, फीचर फिल्म्स 1 जानेवारी, 2022 च्या दरम्यान यूएसच्या सहापैकी किमान एक महानगरीय भागात व्यावसायिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाले पाहिजेत. आणि डिसेंबर 31, 2022 दरम्यान त्याच ठिकाणी सलग सात दिवस किमान पात्रता फेरी पूर्ण करीत प्रदर्शन झाले पाहिजे. फीचर फिल्म्सचा कालावधी किमान 40 मिनिटांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. ऑस्करसाठी सर्वसमावेशक नियमपुस्तक येथे पाहिले जाऊ शकते. नाही, स्मरणपत्र सूचीमधील प्रवेश सूचित करते की चित्रपट विविध श्रेणींमध्ये स्पर्धा करण्यास पात्र आहे आणि ऑस्कर नामांकन किंवा शॉर्टलिस्टिंगची हमी देत नाही. आतापर्यंत 95 व्या अकादमी पुरस्कारांसाठी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये चार भारतीय चित्रपट निवडले गेले आहेत. रिमाइंडर लिस्टमधील उल्लेखाचा अर्थ असा नाही की चित्रपट ऑस्करसाठी “शॉर्टलिस्ट” किंवा “नामांकित” आहे. अनेक वृत्तवाहिन्यांनी याबाबत खुलासा केला आहे. असे अहवाल येथे, येथे आणि येथे पाहिले जाऊ शकतात. अशा प्रकारे आम्ही असा निष्कर्ष काढू शकतो की काश्मीर फाइल्स, आणखी 300 चित्रपटांप्रमाणेच, ऑस्करच्या शर्यतीत प्रवेश करण्यास पात्र आहे. हा चित्रपट आतापर्यंत अकादमी पुरस्कारांसाठी निवडलेला नाही किंवा नामांकनही झालेले नाही. काश्मीर फाइल्स ऑस्कर 2023 साठी “शॉर्टलिस्ट” किंवा “नामांकित” केल्या गेल्याचे व्हायरल दावे खरे नाहीत. चित्रपटाने नुकतेच स्मरणपत्र यादीत प्रवेश केला आहे, याचा अर्थ तो अकादमी पुरस्कारांसाठी स्पर्धा करण्यास पात्र आहे. ऑस्करच्या “शॉर्टलिस्ट” मध्ये स्थान मिळविणारे “पाच” भारतीय चित्रपटांपैकी एक असल्याचा विवेक अग्निहोत्रीचा दावा देखील वस्तुस्थितीनुसार चुकीचा आहे. रिमाइंडर लिस्टमध्ये 5 पेक्षा जास्त भारतीय चित्रपट आणि मालिका आहेत. 95 व्या अकादमी पुरस्कारासाठी आतापर्यंत फक्त चार भारतीय चित्रपट निवडले गेले आहेत. कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in Prasad Prabhu February 22, 2023 Sandesh Thorve March 26, 2022 Sandesh Thorve April 1, 2022
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • Hindi
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.115 as of Oct 09 2023


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data] Valid XHTML + RDFa
OpenLink Virtuoso version 07.20.3238 as of Jul 16 2024, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 11 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2025 OpenLink Software