schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
मणिपूरमधील महिलांनी ईव्हीएम फोडले. कारण त्यांना कोणतेही बटण दाबल्यावर कमळाचेच चित्र छापलेले पाहायला मिळाले. (संग्रहण लिंक)
व्हायरल व्हिडिओच्या कीफ्रेमच्या रिव्हर्स इमेज शोधामुळे आम्हाला NDTV ने त्यांच्या YouTube चॅनेलवर 19 एप्रिल 2024 रोजी अपलोड केलेल्या व्हिडिओकडे नेले. व्हिडिओचे शीर्षक आहे ‘EVMs vandalized over “Proxy Voting” मणिपूरमध्ये “प्रॉक्सी व्होटिंग” झाल्याचा आरोप. प्रॉक्सी अर्थात बनावट मतदान म्हणजे एखाद्याच्या वतीने मतदान करण्याचा अधिकार दुसऱ्या व्यक्तीला बेकायदेशीरपणे देण्याची पद्धत आहे.
इंडियन एक्सप्रेसने देखील या घटनेची माहिती दिली असून 19 एप्रिल 2024 रोजी त्यांच्या YouTube वर तोच व्हिडिओ पोस्ट केला आहे. रिपोर्टमध्ये प्रॉक्सी मतदानाच्या घटनेबद्दल उल्लेख आढळतो मात्र EVM आणि VVPAT प्रणालींबाबत कोणतीही तक्रार ऐकली गेली नाही.
निवडणूक आयोगानेही हा दावा खोटा ठरवला आहे. सीईओ मणिपूर यांनी आपल्या एक्स हँडलवर याबद्दल पोस्ट करीत म्हटले आहे की, “The video seen here is a case of mob violence in a Polling Station (3/21 Khurai Assembly Segment) in Imphal East and Re-poll has already been done in the said Polling Station on 22 April, 2024. No case of mismatch on the button pressed in the Ballot Unit and Paper Slip generated through VVPAT has been alleged by anyone or found. Legal action is being taken up for spreading FAKE NEWS.“
महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विटला हे उत्तर देण्यात आले आहे.
आमच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की, हा दावा दिशाभूल करणारा आहे. प्रॉक्सी मतदान सामोरे आल्यामुळे मणिपूरमधील मतदान केंद्रात ईव्हीएम मशीनची तोडफोड करण्यात आली आहे.
Source
Report by NDTV on April 19,2024
Report by Indian Express on April 19,2024
(हे आर्टिकल न्यूजचेकर इंग्रजीसाठी सर्वप्रथम तनूजीत दास यांनी केले असून, ते येथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad Prabhu
February 12, 2025
Runjay Kumar
February 11, 2025
Ishwarachandra B G
February 8, 2025
|