Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
मुंबई पोलिसांनी वसतिगृहातील मुलींना कपडे काढून नाचायला लावल्याचा दावा व्हायरल होत आहे. ट्विटरवर 45 सेकंदाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक युवती मोठमोठ्याने ओरडत कपडे काढताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी युवती लिफ्टमध्ये उभी राहून सुरक्षा रक्षकाशी भांडत असल्याचे दिसत तर लिफ्टच्या बाहेर सुरक्षा रक्षक पोलिस आणि काही लोक थांबल्याचे दिसते आहे. ट्विटमध्ये दावा करण्यात आला आहे की, मुंबई पोलिसांनी वसतिगृहातील मुलींना कपडे काढून नाचायला लावले. उद्धव ठाकरे महाराष्ट्राला नरक बनवित आहेत. ते मनमोहन सिंगांसारखे कर्णबधिर आणि मुके आहेत.
युवतीने लिफ्टमध्ये कपडे काढून घातलेल्या गोंधळाच्या घटनेचे नेमके काय सत्य आहे याची पडताळणी आम्ही सुरु केली. Google Image Search च्या मदतीने तसेच InVID च्या साहाय्याने या व्हिडिओतील किफ्रेम्स शोधल्या असता आम्हाला rvcj.com आणि India Today ने प्रसिद्ध केलेले तीन वर्षांपुर्वीचे मीडिया रिपोर्ट्स आढळून आले.रिपोर्टनुसार मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये मॉडेल मेघा शर्माने रात्री तीन वाजता गोंधळ घातला होता. मॉडेलने इमारतीच्या सुरक्षारक्षकाला सिगारेट आणण्यास सांगितले. त्याने नकार दिल्याने दिल्यास माॅडेलने त्याला चापट मारली आणि यानंतर वाद वाढला. पोलिसांना बोलवताच तिने त्यांच्यासमोरच कपडे काढायला सुरुवात केली.
वेगवेगळ्या कीवर्डच्या मदतीने गुगलवर शोध घेत आम्हाला टाइम्स ऑफ इंडियाचा व्हिडिओ आढळून आला. हा व्हिडिओ 29 आॅक्टोबर 2018 रोजी TOI च्या अधिकृत चॅनेलवर व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर आम्हाला आढळले की मॉडेल मेघा शर्मा लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये रात्री तीन वाजता मद्यधुंद होऊन गोंधळ घालत होती. पोलिस तिला पोलिस ठाण्यात घेऊन जात होते. पण मॉडेलने सांगितले की ती रात्री तीन वाजता पोलिस स्टेशनला जाणार नाही. यानंतर हा वाद आणखी वाढला आणि मेघाने पोलिसांसमोरच कपडे काढले.
अधिक शोध घेताना, आम्हाला 29 ऑक्टोबर 2018 रोजी प्रिंट आणि लोकसत्ता लाइव्हच्या अधिकृत चॅनेलवर अपलोड केलेले व्हिडिओ आढळले. या व्हिडिओंमधून मिळालेल्या माहितीनुसार मॉडेल मेघा शर्माने चौकीदाराला मध्यरात्री सिगारेट आणण्यास सांगितले. पण त्याने सिगारेट आणण्यास नकार दिला. त्यानंतर मेघा शर्मा ने इमारतीत गोंधळ केला.
यावरुन हे स्पष्ट झाले की व्हायरल व्हिडिओ वसतिगृहातील युवतीचा नाही. अधिक तपास केला असता आम्हाला 03 मार्च 2021 रोजीची महाराष्ट्र टाईम्सची बातमी आढळून आली ज्यात म्हटले आहे की, जळगावमधील सरकारी महिला वसतिगृहात काही पोलिस आणि बाहेरील पुरषांनी महिलांना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडले. अशी तक्रार तेथील महिलांनी केली आहे. यात वसतिगृहातील कर्मचारी देखील सामील आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला आढळले की मॉडेल मेघा शर्माचा तीन वर्षाचा व्हिडिओ महाराष्ट्रातील नुकत्याच घडलेल्या घटनेशी जोडला जात आहे. व्हायरल व्हिडिओचा उद्धव ठाकरे सरकारशी काही संबंध नाही. ही घटना सन 2018 मध्ये घडली होती आणि त्या काळात महाराष्ट्रात भाजपाचे सरकार होते.
India Today https://www.indiatoday.in/india/story/mumbai-woman-strips-policemen-andheri-lokhandwala-oshiwara-videos-1377694-2018-10-29
RVCJ.com https://www.rvcj.com/remember-the-girl-who-removed-clothes-in-front-of-cops-this-cctv-footage-shows-she-hit-guard-first/
Times of India https://timesofindia.indiatimes.com/videos/city/mumbai/watch-woman-strips-in-elevator-when-asked-to-come-to-police-station-with-cops/videoshow/66411498.cms
YouTube https://www.youtube.com/watch?v=VeEHBqyKoSM
Maharashtra Times– https://maharashtratimes.com/crime-news/jalgaon-girls-forced-to-dance-by-police-at-government-hostel/articleshow/81311124.cms
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Prasad Prabhu
January 29, 2025
Prasad Prabhu
December 23, 2024
Komal Singh
December 20, 2024