Fact Check
महाराष्ट्रात 1 मार्च पासून लाॅकडाऊन केला जाणार नाही, बातमीचा खोटा स्क्रीनशाॅट व्हायरल
कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या पाहता महाराष्ट्रात एक मार्च पासून लाॅकडाऊन केला जाणार असल्याच्या बातमीचा स्क्रीनशाॅट सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आमच्या अनेक वाचकांनी आम्हाला बातमीचा हा व्हायरल स्क्रीनशाॅट पाठवून याबाबत पडताळणी करण्यास सांगितले आहे. टिव्ही 9 मराठीच्या बातमीचा हा स्क्रीनशाॅट असून यात एका बाजूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो असून बाजूला 1 मार्च 2021 पासून संपूर्ण राज्यात 15 दिवसांचा कडक लाॅकडाऊन असा मजकूर लिहिण्यात आला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म शेअरचॅटवर देखील हा स्क्रीनशाॅट मोठ्या प्रमाणात शेअर होत असल्याचे आम्हाला आढळून आले.
Fact Check / Verification
महाराष्ट्रात खरंच 1 मार्चपासून लाॅकडाऊन लागू केला जाणार आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र राज्यात लाॅकडाऊन केला जाणार असल्याची बातमी आम्हाला माध्यमांत आढळून आली नाही. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येबाबत जनतेशी संवाद साधल्याचा व्हिडिओ आम्हाला युट्यूबवर आढळून आला. यात त्यांनी म्हटले आहे की, ज्यांना लाॅकडाऊन नको असेल ते नियम पाळतील व ज्यांना हवा असेले ते नियमांचे पालन करतील आता तुम्हीच ठरवा तुम्हाला लाॅकडाऊन हवा की नको, मात्र या व्हिडिओत मुख्यमंत्र्यांनी कुठेही 1 मार्चपासून संपूर्ण राज्यात 15 दिवसांचा लाॅकडाऊन केला जाणार असल्याचे घोषित केलेले नाही.
यानंतर आम्ही मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलला भेट दिली व राज्यात लाॅकडाऊन संदर्भात काही माहिती मिळते का ते तपासले असता आम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी 21 फेब्रुवारी 2021 रोजी संवाद साधल्याचा व्हिडिओ आढळून आला हा व्हिडिओ बारकाईने पाहिला मात्र 1 मार्चपासून लाॅकडाऊन केला जाणार असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला नसल्याचे आढळून आले.
अधिक तपास केला असता आम्हाला टिव्ही 9 मराठीच्या बातमीचा व्हिडिओ आढळून आला ज्यात म्हटले आहे की, टिव्ही 9 मराठीने 1 मार्चपासून लाॅकडाऊन केला जाणार असल्याचे वृत्त दिलेले नाही. टीव्ही 9 मराठी च्या नावाने खोटी बातमी व्हायरल केली जात आहे, फॉन्टमध्ये छेडछाड करुन, मॉर्फ इमेज पसरवली जात आहे. शिवाय जुना व्हिडीओही व्हायरल केला जात आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, अशी माहिती यात देण्यात आलेली आहे.
Conclusion
यावरुन हे स्पष्ट होते की, राज्यात 1 मार्च पासून लाॅकडाऊन केला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली नाही, टिव्ही 9 मराठीच्या नावाने खोटा स्क्रीनशाॅट व्हायरल केला जात आहे.
Result- Misleading
Our Sources
CMO- https://twitter.com/CMOMaharashtra/status/1363481220504424450
Tv9 Marathi- https://www.youtube.com/watch?v=z5S5Ks2nyd4
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.