schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
सोशल मीडियात सध्या बीडमध्ये लाॅकडाऊनचा विरोध करत जनता रस्त्यावर उतरल्याच्या दाव्याने एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांत लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. लोकांकडून याबाबत समिंश्र प्रतिक्रिया येत आहेत अशातच बीडमध्ये लाॅकडाऊनचा विरोध करत रस्त्यावर उतरली असल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर होत आहे.
व्हिडिओत मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरलेले दिसत असून ते एका पोलिसाचा पाठलाग करत आहेत. जमावाने पोलिसाला बेदम मारहाण केल्यानंतर पोलिसांची गाडी देखील फोडल्याचे दिसत आहे. दावा करण्यात येत आहे की हा व्हिडिओ बीडमधील आहे. महाराष्ट्रातील जनता आता लाॅकडाऊन विरोधात रस्त्यावर उतरली आहे असेही व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे.
आमच्या एका वाचकाने हा व्हिडिओ पडताळणीसाठी आमच्याकडे पाठवला व याची सत्यता तपासण्याची विनंती केली.आम्ही याबाबत शोध घेतला असता आम्हाला हा व्हिडिओ फेसबुकवर तसेच इतर सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर देखील व्हायरल होत असल्याचे आढळून आले.
crowdtangle या टूलवर सापडलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत हा व्हिडिओ व्हायरल दाव्यांसह इतर अनेक लोक फेसबुकवर शेअर करत आहेत, त्या आकडेवारीनुसार या पोस्टवर एकूण 18 जणांचे इन्ट्रेक्शन झाले आहे.
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्यातील काही जिल्ह्यातं लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात देखील 10 दिवसांचा लाॅकडाऊन करण्यात आला आहे मात्र लाॅकडाऊनचा विरोध करत जनता रस्त्यावर उतरल्याची बातमी आढळून आली नाही. मात्र महाराष्ट्र टाईम्सची बातमी आढळून आली ज्यात म्हटले आहे की, राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक शहरात कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळं बीड जिल्ह्यातही १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. २६ मार्चपासून ते ४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे.
राज्यात करोनानं डोकं पुन्हा वर काढल आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात 20 हजारांच्या वर रुग्ण आढळत आहेत. त्यामुळं प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. मुंबई, पुणे नागपुरसह अनेक जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळं बीडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला आहे.
मटाच्या किंवा इतर माध्यमांतील बातम्यात कुठेही बीडमध्ये जनता रस्त्यावर उतरल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ नेमका कुठला आहे आणि कधीचा आहे याचे सत्य जाणून घेण्यासाठी अधिक शोध घेतला. या शोधा दरम्यान आम्हाला नवभारत या हिंदी दैनिकाची बातमी आढळून आली. ज्यात म्हटले आहे की,मिळालेल्या माहितीनुसार ही घटना कर्नाटकातील म्हैसूरची आहे. जमावाने येथे ट्रॅफिक पोलिसांना मारहाण केली. नुकतेच एका 47 वर्षीय अभियंत्याचा ट्रॅफिक पोलिसांच्या कारवाईपासूनन वाचण्यासाठी केलेल्या प्रयत्नात अपघातात होऊन मृत्यू झाला. त्याविरोधात लोक आंदोलन करत होते. अभियंत्याच्या मृत्यूला पोलिस जबाबदार आहेत असे लोक सांगत होते. लोकांनी रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध करण्यास सुरुवात केली.
गर्दीला पांगवण्यासाठी वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पण, मात्र जमावाने त्या पोलिस कर्मचा-यावर राग काढला. लोकांनी पोलिस कर्मचा-यांना मारहाण केली तसेच त्यांच्या गाड्यावर देखील दगडफेक केली हा हायव्होल्टेज ड्रामा बराच वेळ चालला पोलिस कर्मचारी तेथून कसेतरी निसटले. त्याचवेळी जमाव पांगवण्यासाठी पोलिस उपायुक्त प्रकाश गौडा स्वत: घटनास्थळी पोहोचले आणि कसे तरी प्रकरण शांत केले.
यानंतर आम्ही काही किवर्डसच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला युट्यूबवर ही याच सदंर्भातील अनेक व्हिडिओ आढळून आले. India Ahead News या युट्यूब चॅनलवर आम्हाला या संपूर्ण घटनाक्रमाच्या बातमीचा 23 मार्च 2021 रोजी अपलोड केलेला व्हिडिओ आढळून आला.
याशिवाय Sarvajanikara Gamanakke या कन्नड भाषेतील युट्यूब चॅनलवर देखील संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडिओ अपलोड केल्याचे आढळून आले. या म्हटले आहे की, मैसुरुतील हिंकल रिंग रोड येथे हा सगळा प्रकार घडला आहे.
tv9hindi या वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर देखील ही बातमी प्रसिद्ध झाली आहे. यात देखील हाच उल्लेख करण्यात आलेला आहे.
आमच्या पडताळणीतून स्पष्ट झाले की, व्हायरल व्हिडिओ बीडमध्ये लाॅकडाऊनविरोधात जमाव रस्त्यावर उतरल्याचा नाही तर कर्नाटकातील मैसुरुमध्ये अभियंत्याच्या अपघाती मृत्युमुळे रस्त्यावर उतरलेल्या संतप्त जमावाचा आहे.
Navbharat- https://www.enavabharat.com/other-states-news-hindi/viral-video-angry-people-traffic-police-injured-engineers-death-mysore-296112/
India Ahead News– https://www.youtube.com/watch?v=0xiMiGgZSSI
Tv9 Hindi- https://www.tv9hindi.com/trending/mob-thrashes-traffic-cop-in-mysuru-video-goes-to-viral-on-social-media-591280.html
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Prasad Prabhu
January 29, 2025
Komal Singh
January 10, 2025
Prasad Prabhu
December 23, 2024
|