Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
मागील दोन आठवड्यापासून ओडिशातील सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पाला भीषण आग लागली आहे. या भीषण आगीत प्रकल्पाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी सांगितले की, ओडिशातील सिमलीपाल नॅशनल पार्कमध्ये एका आठवड्यापेक्षा जास्त काळ सुरु असलेल्या आगीवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यासाठी आणि प्रदेशातील अशा घटना रोखण्यासाठी राज्य सरकारला मदत करण्यासाठी तज्ञांना बोलावले आहे. समिती पाठविली जात आहे.ट्विटरवर याची घोषणा करताना जावडेकर म्हणाले की, त्यांनी जंगलात लागलेल्या आगीच्या संदर्भात केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्यातील इतर खासदारांशीही भेट घेतली आहे. प्रचंड आग लागली आहे. याच दरम्यान सोशल मीडियात या आगीचे फोटो देखील व्हायरल होत आहे. आम्हाला हे फोटो सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म फेसबुक आणि व्हाट्सअॅपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे आढळून आले.
सोशल मीडियात व्हायरल होत असलेले फोटो सिमलीपाल व्याघ्रप्रकल्पातील आगीचे आहेत का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. यासाठी व्हायरल होत असलेले फोटो गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोधले असता आम्हाला हे फोटो सिमलीपाल राष्ट्रीय अभयारण्यातील नसल्याचे आढळून आले.
फोटो क्र 1 –
हा फोटो ओडिशामध्ये सध्या लागलेल्या आगीमुळे भाजलेल्या वाघांचा नाही. ओडिशामध्ये आढळणाऱ्या ‘ब्लॅक टायगर’ नावाने ओळखल्या जाणा-या वाघांचा आहे. माजी वनाधिकारी संदीप त्रिपाठी यांनी गेल्या वर्षी जुन 2020 मध्ये हो फोटो शेअर केला होता. या वाघांना मेलानिस्टिक टायगर्स असेही म्हणतात.
फोटो क्र 2
आगीवर पाणी टाकणाऱ्या हेलिकॉप्टरचे फोटो ओडिशातील सिमलीपालच्या आगीचे नाहीत तर अमेरिकेतील आहेत. 2017 साली लॉस एंजल्स शहर प्रशासनाने वणव्याला रोखण्यासाठी लॉकहिड मार्टिन सायकॉर्स्की कंपनीचे दोन हेलिकॉप्टर खरेदी केले होते. हे त्या हेलिकॉप्टरचे फोटो आहेत.
फोटो क्र 3
हा फोटो ओडिशात पेटलेल्या वणव्याचा नाही. Simplex Aerospace कंपनीच्या वेबसाईटवर या हेलिकॉप्टरचे अनेक फोटो उपलब्ध आहेl. त्यांच्या कॅटलॉगचा हा एक भाग आहे.
आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, ओडिशातील सिमलीपाल मध्ये भीषण आग लागून मोठी हानी झाली आहे मात्र व्हायरल फोटो हे या आगी दरम्यानचे नाहीत सोशल मीडियात ते चुकीच्या दाव्याने व्हायरल झाले आहेत.
fireapparatusmagazine- https://www.fireapparatusmagazine.com/fire-apparatus/petrillo-la-county-helicopters/
Simplex Aerospace- http://s412751056.initial-website.com/video-photos/
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.