schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
Claim
लोकसभेतील भाजप खासदार आणि अभिनेता सनी देओल मद्यधुंद अवस्थेत रस्त्यांवर फिरताना दिसला.
Fact
सनी देओल त्याच्या आगामी ‘सफर’ चित्रपटासाठी शूटिंग करत होता. व्हिडिओ संदर्भ बदलून शेअर करण्यात आला आहे.
सनी देओल मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर फिरत असल्याचा दावा केला जात आहे. बॉलीवूड अभिनेता आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) लोकसभा खासदार सनी देओल एका रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत दिसत असलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फुटेजमध्ये अभिनेता ऑटो-रिक्षाकडे चालत जात असताना नशेत हलत आणि डुलत असल्याचे दाखवले आहे. त्यानंतर तो चालकाने आधार दिल्यानंतर रिक्षात चढताना दिसतो.
“भाजपच्या अशा नेत्यांंकडून जनतेने काय अपेक्षा कराव्यात..?” असा सवाल हा दावा करणाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
काही युजर्सनी इतर भाषेतही हाच दावा केल्याचे आमच्या निदर्शनास आले. सनी देओल धुंद अवस्थेत रस्त्यावर नाच करीत आहे. अशा कॅप्शनखाली हा दावा पाहायला मिळाला.
Newschecker ने कीवर्ड शोध घेऊन व्हिडिओची तथ्ये शोधण्यास सुरुवात केली, ज्यामुळे आम्हाला अनेक रिपोर्ट मिळाले. ज्यात व्हायरल व्हिडिओवर अभिनेत्याने स्पष्टीकरण दिले आहे. Network 18 च्या रिपोर्ट मधून समोर आले आहे की, झूमशी बोलताना देओल म्हणाले, “हे शूटचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, वास्तविक व्हिडिओ नाही.”
“आपण सगळे सहजतेने घेऊ. जर मी मद्यपान करायचे ठरवले, तर मी ते रस्त्यावर आणि ऑटो-रिक्षामध्ये का करू? वास्तविकता अशी आहे की मी पीत नाही आणि तो व्हिडिओ खरा नाही; हे खरं तर चित्रपटाच्या शूटिंगमधील आहे.”, तो पुढे म्हणाला.
पंजाबमधील गुरुदासपूर मतदारसंघातून भाजपचे खासदार असलेले देओल नुकतेच आपल्या गदर 2 या हिंदी चित्रपटात दिसले होते.
आम्हाला त्याच्या आगामी चित्रपट, सफरच्या निर्मात्याचा हवाला देणारे आणखी रिपोर्ट देखील आढळले, “हा आमच्या आगामी चित्रपट ‘सफर’ चा व्हिडीओ आहे, ज्यासाठी सनी पाजी रात्रीच्या शेड्युलमध्ये शूटिंग करत होते. मी आमच्या सर्व चाहत्यांना विनंती करतो की, सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओबद्दल चुकीची माहिती पसरवू नये.”
सनी देओलने 6 डिसेंबर 2023 रोजी त्याच्या X खात्यावर त्याच शूटचा एक पडद्यामागील व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे, “Afwahon ka ‘Safar’ bas yahin tak. #Shooting #BTS.” अशी कॅप्शन त्याने दिली आहे. वेगळ्या अँगलने घेतलेल्या या फुटेजमध्ये त्याला अनेक कॅमेऱ्यांसह अनेक क्रू मेंबर्सनी वेढलेले दिसत आहे, त्यापैकी एकजण शूटसाठीच्या सूचना देत असताना ऐकायला मिळतो.
मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर फिरत असलेला सनी देओलचा व्हायरल व्हिडिओ प्रत्यक्षात चित्रपटाच्या शूटचा आहे आणि तो संदर्भा बदलून शेअर करण्यात येत आहे.
Our Sources
Report published by News18, dated December 6, 2023
X post by Sunny Deol, dated December 6, 2023
(हे आर्टिकल न्यूजचेकर इंग्रजीसाठी सर्वप्रथम रंगमन दास यांनी केले आहे. ते येथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad Prabhu
December 16, 2023
Prasad Prabhu
May 18, 2023
Prasad Prabhu
January 31, 2023
|