About: http://data.cimple.eu/claim-review/b283de8e4224e60c8241be613a2d0dfa3e279495d68f1e549d63a852     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Authors केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्यसभेचे माजी खासदार गुलाम नबी आझाद यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुलाम नबी आझाद यांनी पक्ष सोडण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याचा दावा करत हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या चित्रात सामंत कुमार देखील उपस्थित असल्याची माहिती आहे. सामंत कुमार गोयल हे भारताची गुप्तचर संस्था रॉचे सचिव आहेत. गुजरात प्रदेश काँग्रेस सेवा दलाने आपल्या ट्विटर हँडलवरून व्हायरल पोस्ट रिट्विट केली आहे. खरंतर याआधी राज्यसभेचे माजी खासदार गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, त्यांनी 11 सप्टेंबर रोजी काश्मीरच्या बारामुल्ला येथे एक निवेदन केले होते, ज्यात म्हटले होते की, त्यांच्या राजकीय अजेंड्यावर काश्मीरमध्ये कलम 370 परत आणण्याची कोणतीही योजना नाही. मात्र यावर पलटवार करीत काश्मीरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सैफुद्दीन सोझ म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील अनेक लोक गुलाम नबी आझाद यांचा अजेंडा भाजपपेक्षा वेगळा नाही, असे मत व्यक्त करत आहेत. दरम्यान, गुलाम नबी आझाद यांनी पक्ष सोडण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याचा दावा करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. Fact Check/Verification दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही गुगल लेन्सच्या मदतीने व्हायरल फोटो सर्च करायला सुरुवात केली. आम्हाला सप्टेंबर २०२१ मध्ये टाइम्स ऑफ इंडियाने प्रकाशित केलेले वृत्त प्राप्त झाले. या वृत्तानुसार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गोवा सरकारचे मंत्री मायकल लोबो यांनी अमित शहा यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. या रिपोर्टमध्ये असलेले चित्र व्हायरल फोटोसारखेच काहीसे दिसत होते. या अहवालातील फोटोही देवेंद्र फडणवीस यांनी ३० सप्टेंबर २०२१ रोजी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केल्याचे आम्हाला गुगलवरील एका सर्चवरून समजले. ते चित्र नीट पाहिल्यावर कळलं की एडिटिंग सॉफ्टवेअरच्या मदतीने आधी मूळ चित्र Horizontally फ्लिप करण्यात आलं आणि मग देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी सामंत कुमार यांच्या चित्राची भर पडली आहे. याशिवाय गुलाम नबी आझाद यांच्या चित्राची जागा मायकल लोबो यांच्या चित्राने घेतली आहे. तपासादरम्यान आम्ही गुगल लेन्सवरील व्हायरल फोटोमध्ये उपस्थित असलेल्या गुलाम नबी आझाद यांचा फोटो सर्च केला. आम्हाला प्रोकेराला वेबसाइटचा जानेवारी २०१४ चा अहवाल मिळाला. त्यानुसार गुलाम नबी आझाद यांनी द्रमुकचे नेते एम. करुणानिधी यांची भेट घेतली होती. रिपोर्टमधील फोटोतून गुलाम नबी आझाद यांचा भाग उचलून व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अॅड करण्यात आला आहे. Conclusion अशा प्रकारे अमित शहा आणि गुलाम नबी यांना एकत्र दाखविणारे हे चित्र बनावट असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट होते. वेगवेगळ्या चित्रांची जोड देऊन ती पोस्ट बनवण्यात आली आहे. Result: Altered Photo Our Sources Report Published in Times of India on September 2021 Tweet by Devendra Fadnavis on September 2021 Report Published on Prokrela on January 2014 कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • Hindi
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.115 as of Oct 09 2023


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data] Valid XHTML + RDFa
OpenLink Virtuoso version 07.20.3238 as of Jul 16 2024, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 11 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2025 OpenLink Software