schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
ब्रिटनमधील राजकीय आणि आर्थिक गोंधळाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनी राजीनामा दिलाय.सुएला यांनी सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगितलं जात आहे. गेल्या आठवडाभरात पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या मंत्रिमंडळातून आणखी एका मंत्र्याने राजीनामा दिला आहे.दरम्यान त्यांच्या राजीनाम्याचा संदर्भ घेऊन अनेक दावे भारतात विशेषतः महाराष्ट्रात होत आहेत.सुएला ब्रेव्हरमन यांना भारता विरोधातील वक्तव्य भारी पडलं आणि त्यामुळेच त्यांना राजीनामा द्यावा लागला असा दावा प्रामुख्याने केला जात आहे.
या दाव्याचे आर्काइव्ह आपण येथे पाहू शकता.
भारतीय वंशाच्या ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनी मुक्त व्यापार कराराला विरोध करत म्हटले होते की,यामुळे ब्रिटनमध्ये भारतीय स्थलांतरितांचा ओघ वाढेल.अनेक भारतीय प्रवासी व्हिसाची मुदत संपल्यानंतरही यूकेमध्येच राहतात.त्या म्हणाल्या होत्या की ब्रिटीश लोकांनी ब्रेक्झिटमधून माघार घेण्यास मत दिले नाही.यावरून आता अनेक दावे केले जात आहेत.
सुएला ब्रेव्हरमन यांनी नेमका राजीनामा का दिला आणि त्यांना भारता विरोधात केलेले वक्तव्य महागात पडले का? हे तपासून पाहण्याचा प्रयत्न आम्ही केला.सर्वप्रथम सुएला ब्रेव्हरमन राजीनामा असे किवर्ड तपासले असता आम्हाला त्यांनी दिलेले राजीनामापत्र सापडले.ब्रिटनच्या पंतप्रधान यांना देऊन त्यांनी आपल्या राजीनाम्याची प्रत स्वतः ट्विट केली आहे.
त्यात माझ्याकडून चूक झाली आहे,असे त्यांनी लिहिले आहे.”आम्ही आमच्या मतदारांना दिलेली महत्त्वाची आश्वासनेच मोडली नाहीत,तर स्थलांतरितांची संख्या कमी करणे आणि बेकायदेशीर स्थलांतर थांबवणे यासह जाहीरनाम्यातील आश्वासने पूर्ण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेबद्दल मला गंभीर चिंता आहे”असेही त्या त्यात म्हणाल्या आहेत.
इतक्या मोठ्या पदावरील महिलेला राजीनामा का द्यावा लागला याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करताना आम्हाला दी गार्डियन ने प्रसिद्ध केलेली ही बातमी सापडली.स्थलांतर याविषयावर ब्रिटन सरकारतर्फे बनविल्या जात असलेल्या गोपनीय कागदपत्रांची माहिती एका राजकीय व्यक्तीला पाठविल्याचे आरोप सिद्ध झाल्यामुळे त्यांना सक्तीने आपल्या पदाचा राजीनामा द्यायला लावला आहे,असे या बातमीत नमूद आहे.
अनेक भारतीय माध्यमांनीही यावर आपले रिपोर्ट प्रसिद्ध केले आहेत.
सुएला ब्रेव्हरमन यांनी भारत आणि युके मधील फ्री ट्रेड करारावर केलेली विधाने आणि त्यासंदर्भातील माहिती आपण येथे पाहू शकता.त्यांनी भारत संदर्भातील वक्तव्य केल्यानंतर टेलिग्राफ च्या यु ट्यूब चॅनेल ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.आपल्याला ब्रिटिश साम्राज्याचा अभिमान आहे.असे त्या म्हणाल्या आहेत.
आमच्या तथ्य तपासणीत ब्रिटीश गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांच्या राजीनाम्याची कारणे वेगळीच आढळली आहेत.निवडणूक लढविताना दिलेली आश्वासने आणि त्यानंतर ती पूर्ण करता आली नसल्याने असलेली नाराजी तसेच गोपनीयतेचे उल्लंघन आदी कारणांमुळे त्यांच्यावर ही राजीनामा देण्याची वेळ आली असल्याचे स्पष्ट होते.
Our Sources
Tweet shared by Suella Braverman on 19 October,2022
News published by The Guardian on 19 October,2022
Interview published by The Telegraph on 4 October,2022
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्तीसाठी किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in
Komal Singh
October 7, 2024
Runjay Kumar
September 24, 2024
Prasad Prabhu
September 14, 2024
|