About: http://data.cimple.eu/claim-review/b98c8708ce68c054e47aac3193bd6d6fc509caa3509b5fdfe80a550e     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • PM India Narendra Modi writes a congratulatory letter to the Chief Justice & his bench for upholding & contributing the Hindu Rashtra. मराठी अनुवाद- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश आणि त्यांच्या पीठाला हिंदुूराष्ट्राचे समर्थन व योगदान दिल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र लिहिले. Verification– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या निकालानंतर सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीय आणि त्यांच्या पीठाचे अभिनंदन लिहिलेले पत्र सोशल मिडियात व्हायरल झाले आहे. या पत्रात पंतप्रधानांनी सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश आणि त्यांच्या पीठाचे हिंदुूराष्ट्राचे समर्थन व योगदान दिल्याबद्दल अभिनंदन केले आहे. आम्ही या संदर्भात पडळताळणी सुरू केली असता ट्विटर वर असेच एक ट्विट आढळून आले. यात मोदींचे व्हायरल पत्र शेअर करण्यात आले आहे. याशिवाय बांग्लादेश गर्वनर सेक्रेटरी जमील उस्मान यांच्या फेसबुक पेजवर देखील हे पत्र शेअर करण्यात आले आहे. हे पत्र काश्मिरमधील Kashmir Media Service वेबसाईटवर ही प्रकाशित करण्यात आले आहे. वेबसाईटवरील लेखात म्हटले आहे की या पत्रामुळs ‘भारतीय न्यायव्यवस्थेचा जातीय चेहरा उघड झाला आहे. पत्रात काय म्हटले आहे ? मोदींनी पत्रात लिहिले की, “प्रिय सरन्यायाधीश रंजन गोगोई, मी तुमचा आणि तुमच्या खंडपीठाचे जस्टिस एस.ए.बोबडे, न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस अब्दुल नझीर यांनी हिंदु राष्ट्रात केलेल्या आपल्या योगदानाबद्दल आभारी आहे. हिंदु राष्ट्रासाठी नवा इतिहास घडवणार्या तुमच्या प्रशंसनीय आणि संस्मरणीय निर्णयाबद्दल हिंदू नेहमीच तुमचे आणि तुमच्या टीमचे आभारी असतील. मी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला तुमच्या भावी प्रयत्नांसाठी शुभेच्छा देतो आणि या उल्लेखनीय निर्णयाबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन करतो. या महत्त्वपूर्ण वेळी अद्भुत पाठिंब्याबद्दल धन्यवाद. ” या पत्राबद्दल आम्हाला शंका वाटत होती कारण मोदींनी पत्र लिहिलाची बातमी कोठेही आढळून आली नाही त्यामुळे व्हायल होत असलेल्या पत्राची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही व्हायरल पत्रावरील सहीची तुलना केली आणि ती मोदींच्या सही पेक्षा वेगळी असल्याचे आढळले. आम्ही व्हायरल चिठ्ठीची तुलना पंतप्रधानांकडे केलेल्या अधिकृत जबाबांशी केली ज्या नागरिकांना त्यांनी पत्र लिहिली होती त्यानुसार ते विरोधाभासी आढळले. यापूर्वी मोदींनी हरियाणाच्या 11 वर्षाच्या विद्यार्थिनीला आणि गुजरातमधील एका जोडप्याला उत्तर दिले होते. आम्ही दोन्ही उत्तरांशी व्हायरल पत्राची तुलना केली. यावरुन मोदींची खोटी सही असलेले पत्र व्हायरल झाल्याचे उघड होते. पंतप्रधानींची ओरिजनल सही आपण खाली पाहू शकता याशिवाय आम्हाला अयोध्या निकालानंतर पंतप्रधानांनी केेलेले ट्विटही आढळून आले. यात पंतप्रधानांनी म्हटले आहे की, अयोध्या प्रकरणावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. हा निकाल कोणाचाही विजय किंवा पराभव म्हणून पाहिला जाऊ नये.राम भक्ती असो वा रहीम भक्ती असो, आपण राष्ट्रभक्तीची भावना दृढ करणे अत्यावश्यक आहे.शांती आणि सौहार्द कायम राहील! तसेच परराष्ट्र खात्याचे प्रवक्ता रविश कुमार यांनी देखील खोट्या बातम्या पसरवणा-यांचा जाहिर निषेध केला आहे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुद्दाम अशा बनावट आणि दुर्भावनायुक्त बातम्यांचा प्रसार करण्यासाठी, समाजात फूट पाडण्यासाठी, वैराग्य निर्माण करण्यासाठी आणि भारत आणि बांगलादेशातील लोकांमधील मैत्री बिघडवण्यासाठी जबाबदार असणा-्यांचा आम्ही निषेध करतो. यावरुन स्पष्ट होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्य न्यायाधीशांना अभिनंदन करणारे पत्र लिहिलेले नाही. सोशल मिडियात खोटे पत्र व्हायरल झाले आहे. Tools Used - Google Keywords Search - Twitter Advanced Search - Facebook Search Result- False
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • Hindi
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.115 as of Oct 09 2023


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data] Valid XHTML + RDFa
OpenLink Virtuoso version 07.20.3238 as of Jul 16 2024, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 2 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2025 OpenLink Software