About: http://data.cimple.eu/claim-review/bd4ec6f6d5e8e9137138f713776700284e53954ff200c58694ccccba     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Authors Claim बलुचिस्तानच्या मुख्यमंत्र्यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली. Fact हा दावा दिशाभूल करणारा आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी महिला ही बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यलढ्यातील नेत्या नायला कादरी बलोच आहेत, ज्यांनी बलुचिस्तानच्या निर्वासित पंतप्रधान असल्याचा दावा केला आहे, मात्र भारतासह इतर कोणत्याही देशाने त्यांना पंतप्रधान म्हणून मान्यता दिली नाही. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, बलुचिस्तानच्या मुख्यमंत्र्यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे. बलुचिस्तानमधील अनेक सामाजिक कार्यकर्ते पाकिस्तानवर मानवी हक्कांचे उल्लंघन आणि भेदभाव केल्याचा आरोप करत आहेत. पाकिस्तानी प्रांतातील अनेक नेतेही प्रांताच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहेत. युनायटेड नेशन्सद्वारे मान्यताप्राप्त NGO UN Watch ने आपल्या एका रिपोर्टमध्ये बलुचिस्तानमधील लोकशाही आणि मूलभूत स्वातंत्र्य, महिला आणि मुलांवरील अत्याचार, मीडियाचे स्वातंत्र्य, लोकांचे बेपत्ता अशा अनेक गंभीर समस्यांसाठी पाकिस्तानला जबाबदार धरले आहे. याच क्रमाने, सोशल मीडिया युजर्स एक व्हिडिओ शेअर करत आहेत. ज्यात बलुचिस्तानच्या मुख्यमंत्री पाकिस्तानबद्दल वाईट बोलल्याचा दावा करत आहेत. Fact Check/ Verification बलुचिस्तानच्या मुख्यमंत्र्यांनी पाकिस्तानवर टीका केल्याच्या नावाखाली शेअर होणाऱ्या या दाव्याचा तपास करताना आम्हाला आढळले की व्हिडिओवर ‘O News हिंदी’ चा लोगो लावण्यात आला आहे. वरील माहितीच्या मदतीने गुगलवर ‘O News हिंदी’ हा कीवर्ड सर्च केला. या प्रक्रियेत आम्हाला ‘O News हिंदी’ नावाचे YouTube चॅनल सापडले. तेथे पाहायला मिळाले की, चॅनलने व्हायरल व्हिडिओचे मोठे व्हर्जन दाखवले आहे. 27 जुलै 2023 रोजी प्रकाशित झालेल्या वरील YouTube व्हिडिओमध्ये महिलेचे वर्णन ‘बलुचिस्तानच्या पंतप्रधान नायला कादरी’ असे करण्यात आले आहे. वरील माहितीच्या आधारे कीवर्ड शोधावर, आम्हाला Naela Quadri Baloch चे X (पूर्वीचे ट्विटर) खाते सापडले, जिथे त्यांनी स्वतःचे बलुचिस्तानच्या निर्वासित पंतप्रधान म्हणून वर्णन केले आहे. याशिवाय आम्हाला दैनिक जागरण द्वारे 28 जुलै 2023 रोजी प्रकाशित केलेला एक लेख प्राप्त झाला, ज्यामध्ये नाइला कादरी बलोच यांनी संस्थेला सांगितले आहे की भारतासह इतर कोणत्याही देशाने बलुचिस्तानच्या सरकारला आणि त्यांच्या पंतप्रधानपदाला मान्यता दिलेली नाही. उल्लेखनीय आहे की बलुचिस्तान सरकारच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, प्रांताचे विद्यमान कार्यवाहक मुख्यमंत्री Mir Ali Mardan Khan Domki आहेत. Conclusion अशा प्रकारे, आमच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की बलुचिस्तानच्या मुख्यमंत्र्यांनी पाकिस्तानवर टीका केल्याच्या नावाखाली केलेला हा दावा दिशाभूल करणारा आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी महिला बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य लढ्याच्या नेत्या नायला कादरी बलोच आहेत, ज्यांनी बलुचिस्तानच्या निर्वासित पंतप्रधान असल्याचा दावा केला आहे, मात्र भारतासह इतर कोणत्याही देशाने त्यांना पंतप्रधान म्हणून मान्यता दिली नाही. Result: Partly False Our Sources YouTube video published by O News हिंदी on 27 July 2023 Article published by Dainik Jagran on 28 July 2023 कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • Hindi
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.115 as of Oct 09 2023


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data] Valid XHTML + RDFa
OpenLink Virtuoso version 07.20.3238 as of Jul 16 2024, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 3 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2025 OpenLink Software