schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
“गावांत चपलांचा वर्षाव चालू आहे, पण टीव्हीवर 300 च्या वर गेले आहेत.” यूपी निवडणुकीच्या धामधुमीत, या कॅप्शनसह एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, काही सुरक्षा कर्मचारी भगवा गमचा परिधान केलेल्या एका व्यक्तीला संतप्त जमावापासून वाचवताना कारमध्ये घेऊन जाताना दिसत आहेत. व्यक्ती बसल्यानंतर गाडी पुढे सरकते, मात्र लाठ्या-काठ्या घेऊन काही लोक गाडीजवळ पोहोचतात आणि मागच्या काचा फोडतात.
हा व्हिडिओ यूपी निवडणुकीदरम्यान असल्याचा दावा केला जात आहे, जिथे भाजप नेत्यांना गावोगावी हाकलले जात आहे. माजी क्रिकेटपटू आणि तृणमूल काँग्रेसचे नेते कीर्ती आझाद यांनीही हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
वास्तविक, भाजप नेत्यांचे म्हणणे आहे की यूपी निवडणुकीत पक्षाला 300 पेक्षा जास्त जागा मिळतील. नुकतेच गृहमंत्री अमित शहा यांनीही सांगितले होते की, यावेळीही भाजप यूपीमध्ये 300 चा आकडा पार करेल.
उत्तर प्रदेशातील काही भागात भाजप उमेदवारांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागल्याच्या बातम्याही यापूर्वी आल्या होत्या. उत्तर प्रदेशातील काही गावांमध्ये भाजपच्या उमेदवारांना काळे झेंडे दाखविण्यात आले आणि त्यांच्यावर दगड आणि चिखलफेक करण्यात आल्याचे वृत्तात म्हटले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या व्हिडिओच्या माध्यमातून भाजपवर यूपी निवडणुकीदरम्याान निशाणा साधला जात आहे.
InVID टूल वापरून यूपी निवडणुकी संबंधति व्हिडिओ रिव्हर्स सर्च करताना, आम्हाला मे 2021 ची फेसबुक पोस्ट सापडली. या पोस्टमध्ये व्हायरल व्हिडिओत पश्चिम बंगालमधील एका गावात भाजप नेत्याचा पाठलाग करण्यात आल्याचे म्हटले आहे.
यानंतर, काही कीवर्डच्या मदतीने शोध घेतला असता, आम्हाला या व्हिडिओबद्दल 29 एप्रिल 2021 रोजी अनेक मीडिया रिपोर्ट्स मिळाले. त्या काळात पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू होत्या.
“न्यूज 18 बांग्ला” च्या रिपोर्टनुसार, हा व्हिडिओ बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील इलामबाजार भागातील आहे, जिथे भाजपचे उमेदवार अनिर्बन गांगुली यांच्यावर स्थानिक लोकांनी हल्ला केला होता. लाठ्या-काठ्या घेऊन लोक गांगुलींच्या मागे धावले, त्यामुळे त्यांना तेथून पळ काढावा लागला.
बंगाली वृत्तपत्र “संवाद प्रतिदिन” ने देखील हा व्हिडिओ 29 एप्रिल 2021 रोजी यूट्यूबवर शेअर केला आहे.
‘द इंडियन एक्स्प्रेस’ च्या बातमीनुसार, अनिर्बन गांगुलींनी या घटनेबद्दल सांगितले की, त्याच्यावर टीएमसीच्या लोकांनी हल्ला केला. अनिर्बनच्या म्हणण्यानुसार, लोक बाहेर येऊन मतदान करतील याची खात्री करण्यासाठीच ते या भागात गेले होते.
त्याचवेळी अनिर्बन गांगुली मतदारांवर प्रभाव टाकत असून त्यांना चिथावणी देऊन शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असल्याचे टीएमसीने म्हटले आहे. अनिर्बन गांगुली हे बीरभूमच्या बोलपूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार होते. इलामबाजार हा बोलपूर प्रदेशाचा एक भाग आहे.
एकंदरीत व्हायरल व्हिडीओसोबत दिलेली माहिती दिशाभूल करणारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. पश्चिम बंगालचा जवळपास एक वर्ष जुना व्हिडिओ यूपी निवडणुकीशी जोडून शेअर केला जात आहे.
The Indian Express News Report
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Komal Singh
January 6, 2025
Prasad Prabhu
December 23, 2024
Komal Singh
December 20, 2024
|