schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
Claim
‘स्टार’ चिन्ह असलेल्या ₹500 च्या नोटा बनावट आहेत.
Fact
RBI ने 2016 पासूनच ₹500 च्या ‘स्टार’ चिन्ह असलेल्या नोटा सुरु केल्या आहेत. त्या पूर्णपणे लीगल टेंडर असून बनावट नाहीत.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून * ‘स्टार’ चिन्ह असलेल्या ₹500 च्या नोटा बाजारात चलनात येऊ लागल्या आहेत. या नोटा बनावट असून काळजी घ्या असे आवाहन करणारा दावा सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात फिरू लागला आहे. फेसबुकच्या माध्यमातून हा दावा केला जात असून व्हाट्सअपवरही व्हायरल झाला आहे.
न्यूजचेकरला तथ्य तपासण्यासाठी आमच्या WhatsApp टिपलाइनवर (+91-9999499044) समान दावा प्राप्त झाला.
या व्हायरल दाव्याची सत्यता शोधण्यासाठी आम्ही सर्वप्रथम ‘स्टार चिन्ह असलेल्या 500 च्या नोटा’ असा किवर्ड सर्च करून पाहिला. मात्र आम्हाला या नोटांसंदर्भात कोणतीच अधिकृत माहिती मिळाली नाही.
नोटा आणि नाण्यांसंदर्भात सर्व प्रकारची कार्यवाही RBI म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेकडून होते. दरम्यान याअनुषंगाने शोध घेत असताना @RBI ने 16 डिसेंबर 2016 रोजी केलेले एक ट्विट सापडले.
यामध्ये आम्हाला RBI ने स्टार चिन्ह असलेल्या नव्या नोटांची माहिती देतानाच आपल्या अधिकृत संकेतस्थळाची एक लिंक दिल्याचे आमच्या पाहण्यात आले.
संबंधित लिंकवर जाऊन पाहणी केली असता, आम्हाला RBI चे असिस्टंट डायरेक्टर अजित प्रसाद यांनी 16 डिसेंबर 2016 रोजी जारी केलेले एक प्रेस रिलीज आम्हाला मिळाले. यामध्ये “रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच महात्मा गांधी (नवीन) मालिकेतील ₹ 500 मूल्याच्या नोटा जारी करेल ज्यामध्ये दोन्ही नंबर पॅनलमध्ये इनसेट अक्षर ‘E’ असेल, ज्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर डॉ. उर्जित आर. पटेल यांची स्वाक्षरी असेल, प्रिंटिंगचे वर्ष 2016 आणि बँकेच्या रिव्हर्सवर स्वच्छ भारत लोगो छापला जाईल.” अशी माहिती मिळाली.
“कॅप्शन दिलेल्या काही बँक नोट्समध्ये उपसर्ग आणि संख्या यांच्यामधील जागेत नंबर पॅनेलमध्ये अतिरिक्त वर्ण ‘*’ (तारा) असेल. या नोटा असलेल्या पॅकेटमध्ये नेहमीप्रमाणे 100 मग असतील, परंतु क्रमाने नाहीत. ‘स्टार’ नोट्स असलेल्या नोटांच्या पॅकेटची सहज ओळख होण्यासाठी अशा पॅकेट्सवरील बँड या नोटांची पॅकेटमध्ये उपस्थिती स्पष्टपणे सूचित करतील. ₹ 500 च्या ‘स्टार’ नोटा प्रथमच जारी केल्या जात आहेत. ₹ 10, 20, 50 आणि 100 च्या मूल्याच्या ‘स्टार’ नोटा आधीपासूनच चलनात आहेत.” असे पुढे लिहिलेले आहे.
सदर प्रेस रिलीज मध्ये “₹ 10, 20, 50 आणि 100 च्या मूल्याच्या ‘स्टार’ नोटा आधीपासूनच चलनात आहेत.” असा उल्लेख करून त्यासंदर्भातील माहितीसाठी 19 एप्रिल 2006 च्या प्रेस रिलीज चा हवाला देण्यात आला आहे. आम्ही त्यासंदर्भातही माहिती घेतली.
2006 पासून ₹ 10, 20, 50 आणि 100 या ‘स्टार’ नोटा चलनात आहेत. ‘स्टार’ नोटा चलनात आणण्याचे कारण आणि योजना RBI ने 19 एप्रिल 2006 रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात तपशीलवार दिली आहे. यावरून या सर्व नोटा कायदेशीर असल्याचा निष्कर्ष निघाला आहे.
अशाप्रकारे आमच्या तपासात ‘स्टार’ चिन्ह असलेल्या ₹500 च्या नोटा बनावट आहेत, हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Our Sources
Tweet made by RBI on December 16, 2016
Press Release by RBI on December 16, 2016
Press Release by RBI on April 19, 2006
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in
Prasad Prabhu
January 18, 2025
Kushel HM
January 17, 2025
Saurabh Pandey
December 29, 2023
|