About: http://data.cimple.eu/claim-review/ca4f1ca3630af71837dd4953f8e379c59e5db88ee00f25af2dcf49ea     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Fact Check: हे काँग्रेस कार्यकर्ते नाहीत जे एका महिलेला मारहाण करत आहेत, आसाम चे जुने चित्र परत व्हायरल २००७ साली आसाम येथे झालेल्या घटनेचे चित्र चुकीच्या दाव्यासह बंगाल चे सांगून होत आहे व्हायरल. - By: Ankita Deshkar - Published: Nov 22, 2022 at 05:14 PM नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला एक पोस्ट फेसबुक वर व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. संवेदनशील चित्रांमध्ये पुरुषांच्या गटाकडून एका महिलेला रस्त्यावर मारहाण होत असल्याचे दिसून येते. असा दावा करण्यात आला की हे चित्र पश्चिम बंगालमधील आहेत जिथे “काँग्रेस कार्यकर्त्यांनी एका हिंदू महिलेला मारहाण केली कारण तिने काँग्रेसच्या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.” विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळले. व्हायरल झालेली छायाचित्रे 2007 मध्ये आसाममध्ये घडलेल्या एका घटनेतील आहेत. काय होत आहे व्हायरल? फेसबुक यूजर, राष्ट्रवादी धीरज कुमार राठौड़ ह्यांनी हे संवेदनशील चित्र पोस्ट करून लिहले: ममता बनर्जी सरकार में कोई कानून नाम का चीज नहीं है है तो सिर्फ जेहाद भाषांतर: ममता बॅनर्जींच्या बंगालमध्ये कायदा नाही, फक्त जिहाद आहे. ह्या चित्रातील मजकुरात लिहले होते: बंगाल में कांग्रेस कार्यकर्ताओं ने हिंदु महिला को दौड़ा दौड़ा कर पिटा,,,, महिला की गलती बस इतनी थी की कांग्रेस रैली में भाजपा और मोदी जिंदाबाद कह दिया,,, शेयर करके कांग्रेस का चेहरा दुनिया के सामने लाईये भाषांतर: बंगालमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाठलाग करून एका हिंदू महिलेला बेदम मारहाण केली. तिची एकच चूक: तिने काँग्रेसच्या रॅलीत भाजप आणि मोदी जिंदाबादच्या घोषणा दिल्या. पोस्ट शेअर करा आणि काँग्रेसचा खरा चेहरा जगासमोर आणा. हि पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा. तपास: विश्वास न्यूज ने Google Lens चा वापर करून ह्या तपासाची सुरुवात केली. आम्हाला नॉर्थईस्ट नाऊ वर 2 सप्टेंबर 2018 रोजी प्रकाशित झालेली एक रिपोर्ट सापडली, शीर्षक होते: Pics of mob striping Adivasi girl in Guwahati resurface after a decade in Social Media रिपोर्ट मध्ये दिले होते: It was a photograph taken on December 24, 2007, at Guwahati. The incident took place on the Beltola-Survey road in Guwahati. The young Adivasi girl, had to run for her life on the streets when she was stripped by some rioters. While she was running on the street to save her life and dignity, some people took pictures of the incident. भाषांतर: 24 डिसेंबर 2007 रोजी गुवाहाटी येथे काढलेले ते छायाचित्र होते. गुवाहाटीतील बेलटोला-सर्वे रोडवर ही घटना घडली. काही दंगलखोरांनी हिसकावून घेतल्याने या तरुण आदिवासी मुलीला जीव मुठीत घेऊन रस्त्यावर धावावे लागले. आपला जीव आणि प्रतिष्ठा वाचवण्यासाठी ती रस्त्यावर धावत असताना काही लोकांनी या घटनेचे फोटो काढले. आम्हाला 27 नोव्हेंबर 2007 रोजी सामायिक केलेल्या टाईम्स ऑफ इंडियामध्ये समान घटनेबद्दलची एक रिपोर्ट सापडली. आम्हाला Newsclick वर एक बातमी सापडली, ज्याचे शीर्षक होते: Remembering Laxmi Orang: The Predicament of the Gender Question in Assam आम्हाला हे चित्र Headlines Today च्या एका व्हिडिओ रिपोर्ट मध्ये देखील सापडले, शीर्षक होते: Victim seeks justice in Assam molestation case. 2021 मध्ये पश्चिम बंगालमध्ये अशीच एक घटना घडली होती. इंडियन एक्सप्रेस मध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्ट प्रमाणे: : अलीपुरद्वार जिल्ह्यात एका 35 वर्षीय आदिवासी महिलेला गावकऱ्यांनी नग्नावस्थेत परेड केली आणि तिला “आपल्या पतीला दुसऱ्या पुरुषासाठी सोडले” म्हणून मारहाण केली. अहवाल प्रकाशित झाला त्यावेळी तीन जणांना अटक करण्यात आली होती तर एफआयआरमध्ये नाव असलेले आठ जण फरार होते. तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने सौरभ गुप्ता, ब्युरो चीफ, NDTV कलकत्ता, ह्यांना संपर्क केला. गुप्ता म्हणाले, “अशी कुठलीच घटना बंगाल मध्ये घडलेली नाही. हि खोटी बातमी आहे.” राष्ट्रवादी धीरज कुमार राठौड़ ह्यांचे आम्ही पुढच्या टप्प्यात सोशल बॅकग्राउंड चेक केले. आम्हाला कळले कि ते रतलाम चे रहिवासी आहेत आणि एका पोलिटिकल पार्टी सोबत संबंधित आहेत. निष्कर्ष: २००७ साली आसाम येथे झालेल्या घटनेचे चित्र चुकीच्या दाव्यासह बंगाल चे सांगून होत आहे व्हायरल. - Claim Review : पश्चिम बंगाल चे चित्र - Claimed By : राष्ट्रवादी धीरज कुमार राठौड़ - Fact Check : False Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know! Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • English
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.115 as of Oct 09 2023


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data] Valid XHTML + RDFa
OpenLink Virtuoso version 07.20.3238 as of Jul 16 2024, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 5 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2025 OpenLink Software