schema:text
| - Fact Check: प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला नव्हता, बनावट पोस्ट व्हायरल
विश्वास न्यूजने या व्हायरल पोस्टची चौकशी केली. ती बनावट असल्याचे सिद्ध झाले. व्हायरल व्हिडिओमध्ये वापरलेला पहिला भाग महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगरचा आहे. सजावटीचा भाग प्रयागराजचा आहे. प्रयागराजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याचा दावा खोटा आहे.
- By: Ashish Maharishi
- Published: Jan 24, 2025 at 05:02 PM
नवी दिल्ली (Vishvas News). उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याच्या तयारीच्या दरम्यान एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या 23 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मोठा पुतळा आणि रस्त्याच्या कडेला सजावट दिसून येत आहे. सोशल मीडियावरील काही वापरकर्ते या व्हिडिओद्वारे दावा करत आहेत की, प्रयागराजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मोठा पुतळा बसवण्यात आला आहे.
विश्वास न्यूजने या व्हायरल पोस्टची चौकशी केली. ती बनावट असल्याचे सिद्ध झाले. व्हायरल व्हिडिओमध्ये वापरलेला पहिला भाग महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगरचा आहे. सजावटीचा भाग प्रयागराजचा आहे. प्रयागराजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याचा दावा खोटा आहे.
काय होत आहे व्हायरल
फेसबुक यूजर अवधेश त्यागीने 31 डिसेंबरला एक मेसेज पोस्ट केला व्हिडिओ अपलोड करताना दावा केला होता की, “प्रयागराजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाकाय पुतळ्यासह कुंभाची तयारी सुरू आहे. ते पाहून मन प्रसन्न जाले.”
व्हायरल पोस्टमधील मजकूर येथे जसाच्या तसा लिहिला आहे. दुसरे वापरकर्तेही त्यास खरा समजून शेअर करत आहेत. व्हायरल पोस्टची संग्रहित आवृत्ती येथे पहा.
तपास
व्हायरल व्हिडिओबद्दल जाणून घेण्यासाठी विश्वास न्यूजने प्रथम गुगल लेन्स टूलचा वापर केला. व्हिडिओच्या पहिल्या भागातून अनेक प्रमुख फ्रेम काढण्यात आल्या. त्यानंतर त्यांचा गुगल लेन्स टूलद्वारे शोध घेण्यात आला. आम्हाला हा व्हिडिओ इंस्टाग्रामच्या अनेक हँडलवर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगरच्या नावाने सापडला. विकास पाटील नावाच्या एका इन्स्टाग्राम हँडलने 20 डिसेंबर 2024 रोजी मूळ व्हिडिओ अपलोड केला आणि तो छत्रपती संभाजी नगरमधील असल्याचे सांगितले.
विश्वास न्यूजने तपास पुढे नेण्यासाठी गुगल मॅप्सचा वापर केला. येथे, संबंधित कीवर्ड वापरून शोध घेतल्यावर आम्हाला छत्रपती संभाजी नगरातील क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा सापडली. खाली स्पष्टपणे दिसत आहे की, व्हायरल व्हिडिओ आणि गुगल मॅपमध्ये दिसणारा रस्ता, प्रतिमा आणि दिवे एकसारखेच आहेत. यावरून हे स्पष्ट झाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा व्हिडिओ छत्रपती संभाजी नगरमधील आहे.
तपासाच्या पुढच्या भागाला पुढे नेताना, व्हिडिओच्या दुसऱ्या भागाबद्दलचे सत्य समोर आले. रस्त्याच्या कडेला करण्यात आलेल्या सजावटीच्या क्लिपबद्दल सत्य जाणून घेण्यासाठी, आम्ही त्यातून अनेक प्रमुख फ्रेम काढल्या. नंतर गुगल लेन्स टूलद्वारे त्यांचा शोध घेतला. आम्हाला ही क्लिप अनेक यूट्यूब चॅनलवर सापडली, जिथे ती प्रयागराजमधील बालसन चौकाची असल्याचे सांगितले गेले.
या शोधाच्या दरम्यान, आम्हाला streets.of.prayagra नावाच्या इंस्टाग्राम हँडलवर सजावटीचा एक व्हिडिओ सापडला. तो, 6 ऑगस्ट 2024 रोजी अपलोड केल्याचे आढळले. तो येथे पाहता येईल.
तपासाच्या शेवटी, आम्ही प्रयागराज येथील दैनिक जागरणचे संपादकीय प्रभारी, राकेश पांडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, प्रयागराजमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नावाने व्हायरल झालेली पोस्ट बनावट आहे.
तपासाच्या शेवटी, आम्ही बनावट पोस्टला शेअर करणाऱ्या वापरकर्त्याची पडताळणी केली. त्यात उघड झाले की, अवधेश त्यागीला पाच हजारांहून अधिक लोक फॉलो करतात. वापरकर्ता दिल्लीत राहतो.
निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात असे आढळून आले की, प्रयागराजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा दावा खोटा आहे. छत्रपती संभाजी नगरच्या क्रांती चौकातील एका व्हिडिओला प्रयागराजमधील कुंभमेळ्याच्या तयारीचा असल्याचा दावा करून गोंधळ निर्माण करण्यात आला.
- Claim Review : प्रयागराजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मोठा पुतळा बसवण्यात आला.
- Claimed By : FB User Avdhesh Tyagi
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.
|