schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष युद्धभूमीवर उतरले असल्याच्या दाव्याने एक फोटो व्हायरल झाला आहे. यात युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की हे लष्कराच्या गणवेशात मोहीमेवर जात असतानाचा दिसत आहेत.
फेसबुक पोस्ट इथे पहा.
फेसबुक पोस्ट इथे पहा.
44 वर्षीय वोलोडिमिर झेलेन्स्की 2019 मध्ये युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. त्याआधी ते एक लोकप्रिय टीव्ही कॉमेडियन आणि अभिनेता होते. 2018 मध्ये झेलेन्स्की यांनी “सर्व्हेंट ऑफ द पीपल” पक्षांतर्गत अध्यक्षपदासाठी आपली उमेदवारी जाहीर केल्याने आणि मोठ्या फरकाने विजयी झाल्यामुळे हे रील-लाइफ ड्रामा अखेरीस वास्तवात बदलला.
रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष युद्धभूमीवर उतरले असल्याच्या दाव्याने व्हायरल होत असलेल्या फोटोची पडताळणी करण्यास सुरूवात केली. गुगल रिव्हर्स इमेजचा आधार घेतला असता आम्हाला अल जजीरा या वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर व्हायरल फोटो आढळून आला. यात म्हटले आहे की युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी 9 एप्रिल, 2021 रोजी युक्रेनच्या डॉनबास प्रदेशात रशियन-समर्थित फुटीरतावाद्यांसह आघाडीवर असलेल्या सशस्त्र दलांच्या स्थानांना भेट दिली.
बातमीत म्हटले आहे की, युक्रेनने म्हटले आहे की ते पूर्वेकडील दोन प्रदेशांवर नियंत्रण ठेवणाऱ्या रशिया-समर्थित फुटीरतावाद्यांवर आक्रमण करणार नाही, कारण दीर्घकाळ चाललेल्या संघर्षात लक्षणीय वाढ होण्याची भीती आहे. अलिकडच्या आठवड्यात युक्रेनियन सैन्य आणि फुटीरतावादी यांच्यातील लढाई तीव्र झाल्यानंतर आणि रशियाने सीमेवर सैन्य जमा केल्यानंतर शुक्रवारी हे विधान आले.तीव्र होत असलेल्या लढाईच्या दरम्यान, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी गुरुवारी पूर्व फ्रंट लाइनला भेट दिली, जिथे त्यांनी रात्र काढली.
“आपल्या देशाचे भवितव्य येथेच ठरलेले आहे,” फेसबुकवर झेलेन्स्की यांनी सांगितले, तर त्यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या फोटोमध्ये ते हेल्मेट आणि बुलेटप्रूफ व्हेस्ट घातलेल्या खंदकांमध्ये सैनिकांशी हस्तांदोलन करताना दिसले. असे या बातमीत म्हटले आहे.
याशिवाय time.com वर देखील 9 एप्रिल 2021 रोजीच्या बातमीत हा फोटो आढळून आला.
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष युद्धभूमीवर उतरले असल्याचा फोटो जुना आहे त्याचा सध्याच्या परिस्थितीशी संबंध नाही.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Yash Kshirsagar
March 1, 2022
Yash Kshirsagar
March 2, 2022
Yash Kshirsagar
March 4, 2022
|