schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
इराणच्या राष्ट्राध्यक्षांवरील सोशल मीडिया पोस्टसाठी एका व्यक्तीस फाशी देण्यात आली. यावेळी आपल्या मुलीला दुःख होऊ नये म्हणून तो हसत होता.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
“हृदय पिळवटून टाकणार दृश्य. सोशल मिडीयावर इराणच्या राष्ट्रपतींविरोधात कमेंट केल्याच्या अपराधाबद्दल या तरुणाला तेथे जाहीर रित्या फाशीवर लटकविण्यात आले.आणी हे दृष्य लांबुन पहाणा-या आपल्या निरागस लेकीच्या चेह-यावर कोणत्याही प्रकारचे औदासीन्य दिसु नये यासाठी हा बाप आपल्या लेकीला हसुन प्रोत्साहित करत होता.काल त्याच इराणी राष्ट्रपतीला हेलीकॉप्टर अपघातामध्ये मृत्युने कवटाळले. सोशल मिडीयातुन आणि जाहीर सभांतुन देशाच्या लोकनियुक्त पंतप्रधानांना शिव्यांची लाखोली वाहणा-या आपल्या देशातील हितचिंतक जेव्हा भारतामधे लोकशाही शिल्लक राहीली नाही,अशा बोंबा मारतात,तेव्हा त्यांनी इतर देशांमधे काय परिस्थिती आहे ,याचा विचार केला पाहीजे.” असे हा दावा सांगतो.
दाव्याची लिंक आणि संग्रहण येथे पाहता येईल.
या दाव्याच्या पडताळणीसाठी व्हायरल फोटोवर आम्ही रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला 16 फेब्रुवारी 2014 रोजी Remember Majid Kavousifar या फेसबुक पेजद्वारे केलेली एक पोस्ट सापडली. या पेजवर व्हायरल चित्रे अनेकदा पोस्ट करण्यात आली असल्याचेही आम्हाला आढळले.
आम्ही संबंधित फेसबुकची माहिती शोधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला Intro सेक्शनमध्ये “Masjid Kavousifar smiling before the iranian regime execute him He was accused for killing one of the regime must brutal judges Masjid Kavousifar was executed in public in Tehran in august 2007” अशी माहिती आढळली. संबंधित Masjid Kavousifar याला 2007 मध्ये एका न्यायाधीशाला ठार केल्याबद्दल तेहरान मध्ये फाशी देण्यात आली असल्याचे आम्हाला यातून समजले.
यातून सुगावा घेऊन शोध केला असता, आम्हाला reuters.com ने 10 ऑगस्ट 2007 रोजी प्रसिद्ध केलेली एक बातमी पाहायला मिळाली. “इराणने गुरुवारी शेकडो लोकांच्या जमावासमोर अनेक सुधारणावादी असंतुष्टांना तुरुंगात टाकलेल्या न्यायाधीशाच्या मारेकऱ्यांना फाशी दिली. माजिद कावौसिफर आणि त्याचा पुतण्या होसेन कावौसिफर यांना तेहरानच्या इरशाद न्यायिक संकुलासमोर फाशी देण्यात आली होती, जिथे त्यांनी 2005 मध्ये न्यायाधीश हसन मोगद्दास यांची त्यांच्या कारमध्ये गोळ्या झाडून हत्या केली होती.” अशी माहिती आम्हाला त्या बातमीने दिली.
यापैकी एकाही बातमीत त्याला त्याच्या पाच वर्षांच्या मुलीसमोर फाशी देण्यात आल्याचा उल्लेख नाही. तथापि, काही रिपोर्ट्समध्ये असे सूचित केले गेले आहे की शेअर केलेल्या फोटोतील मुलगी फाशीच्या वेळी उपस्थित होती. तरीही, ही मुलगी माजिद कावौसिफरची मुलगी आहे याची पुष्टी देणारी माहिती उपलब्ध नाही. Reuters Pictures वेबसाईटने संबंधित मुलीचा फोटो वापरताना कावौसिफरच्या फाशीच्या वेळी तिचा फोटो काढण्यात आला होता याची पुष्टी केली आहे.
अशाप्रकारे आमच्या तपासात व्हायरल चित्रातील व्यक्तीला इराणच्या राष्ट्राध्यक्षांवरील सोशल मीडिया पोस्टसाठी नव्हे तर 2007 मध्ये न्यायाधीशाच्या हत्येसाठी फाशी देण्यात आली होती. हे स्पष्ट झाले असून छायाचित्रात उपलब्ध मुलगी फाशीवेळी उपस्थित होती हे सत्य असून ती संबंधिताची मुलगी होती याला कुठेही पुष्टी मिळत नाही.
Our Sources
Facebook post by Remember Majid Kavousifar on February 16, 2014
News published by reuters.com on August 10, 2007
Photo posted by pictures.reuters.com on August 2, 2007
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad Prabhu
February 12, 2025
Runjay Kumar
February 11, 2025
Ishwarachandra B G
February 8, 2025
|