Claim–
बर्मिंघममध्ये आपल्या चीनी मैत्रिणीला वर्णद्वेषी हल्ल्लातून वाचवणा-या भारतीय युवतीला एका पाकिस्तानी मुस्लिम व्यक्तीने मारहाण केली.
Verification–
Katie Hopkins नावाच्या ट्विटर हॅंडलवरुन एक ट्विट करण्यात आले आहे यात म्हटले आहे की बर्मिंघम मध्ये एक सुंदऱ भारतीय युवतीवर एका जातियवादी मुस्लिम युवतीने हल्ला केला. तिथे आशियातील पुरुषांचा एक ग्रुप होता. त्यातील एकाने मला त्रास देण्यास सुरुवात केली, सगळ्या मित्रांच्या गटामध्ये मी एकटीच भारतीय मुलगी असल्याचे त्याला कदाचित खटकले असावे. ते शहराला छोटा पाकिस्तान म्हणतात.
आम्ही याबाबतीत पडताळणी सुरु केली असता या संदर्भात काही बातम्या आढळून आल्या.
birminghammail
या वेबसाईटवर याबाबत बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की कोरोनाव्हायरसच्या वर्णद्वेषातून केलेल्या हल्ल्यातून एका चीनी मैत्रिणीला वाचवणा-या मीरा सोळंकी या युवतीला एका व्यक्तीने बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला आहे.
बातमीनुसार मीरा सोलंकी या ट्रेनी वकील असून 9 फेब्रुवारी रोजी त्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी आपल्या मित्रमैत्रिणीसोबत गेली होती. त्यांच्यासोबत चीनमधील Mandy Huang, 28 नावाची मैत्रीण देखील होती. तिथेच एक आशियातील पुरुषांचा गट होता त्यातील एका पुरुष आमच्याकडे आला आमि चीनी मैत्रिणीला ती घाण असल्याचे कोरोना व्हायरस घेऊन परत आपल्या घरी जाण्यास सांगितले. मीरा ने आपल्या मैत्रिणीला त्याच्या हल्ल्यापासून वाचवले तेव्हा त्याने मीराच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. यामुळे ती बेशुद्ध पडली. त्यानंतर तो व्यक्ती तिथून निघून गेला. यानंतर तिला हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. वेस्ट मिडलॅंस पोलिसांनी सांगितले की या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
याशिवाय आम्हाला dailymail
च्या बातमीत या पुरुषाच्या वर्णनानुसार तो एक आशियन पुरुष असून त्याची उंची 5.8 आहे. त्याने हे कृत्य करताना फ्लॅट कॅप आणि हुडी परिधान केली होती असे म्हटले आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की, मीरी सोलंकी या युवतीवर हल्ला करणारा व्यक्ती नक्की कोण आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही. सोशल मीडियात चुकीच्या दाव्याचे मॅसेच व्हायरल केले आहेत.
Source
Twitter Advanced Search
Google Search
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)