schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
Claim
उद्योगपती रतन टाटा यांनी अफगाणिस्तानचा क्रिकेटर राशिद खानला झालेला दंड भरण्याची घोषणा केली.
Fact
हा व्हायरल दावा खोटा आहे, स्वतः रतन टाटा यांनी ट्विट करून त्याचा इन्कार केला आहे.
अफगाणिस्तानचा क्रिकेटर राशिद खानबद्दलचा एक दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय झेंडा घेऊन फिरल्याबद्दल आयसीसीने राशिद खानला ५५ लाख रुपयांचा दंड ठोठावला असल्याचे या व्हायरल दाव्यात म्हटले जात आहे. यानंतर उद्योगपती रतन टाटा यांनी राशिद खानचा दंड स्वतः भरणार असल्याचे जाहीर केले आणि १० कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले.
तथापि, आमच्या तपासणीत आम्हाला आढळले की व्हायरल दावा खोटा आहे, रतन टाटा यांनी स्वतः ट्विटमध्ये त्याचा इन्कार केला आहे.
२३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील विश्वचषक क्रिकेट सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला. पाकिस्तानने ५० षटकात ७ गडी गमावून २८२ धावा केल्या. त्याचवेळी अफगाणिस्तानने २८३ धावांचे लक्ष्य दोन गडी गमावून पूर्ण केले.
व्हायरल दाव्याशी संबंधित फेसबुकवर अनेक पोस्ट्स आहेत. पोस्टमध्ये उपस्थित असलेल्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे, “अफगानिस्तान की पाकिस्तान पर ऐतिहासिक जीत के बाद राशिद खान सुर्खियों मे है. जिन्होंने जीत के बाद ग्राउंड पर तिरंगा लहराया था. अब कहा जा रहा है कि पाकिस्तान द्वारा शिकायत करने पर icc ने राशिद पर 55लाख का जुर्माना लगाया है. इस मामले को लेकर मशहूर बिजनेस मैन रत्न टाटा ने उदारता दिखाते हुए जुर्माने की राशि खुद भरने का एलान कर दिया है”.
व्हायरल दाव्याची चौकशी करण्यासाठी, आम्ही प्रथम संबंधित कीवर्डसाठी Google वर शोधले. यावेळी, आम्हाला व्हायरल दाव्याचा उल्लेख असलेला कोणताही विश्वासार्ह रिपोर्ट सापडला नाही.
यानंतर आम्ही उद्योजक रतन टाटा यांच्या अधिकृत X खात्यावर शोधले. आम्हाला ३० ऑक्टोबर २०२३ रोजी केलेले एक ट्विट सापडले. या ट्विट मध्ये रतन टाटा यांनी राशिद खान च्या नावाचा उल्लेख केलेला नाही, मात्र अशा बातम्या खोट्या असल्याचे म्हटले आहे.
इंग्लिशमध्ये केलेल्या ट्विटमध्ये रतन टाटा यांनी लिहिले होते की, “मी कधीही आयसीसी किंवा कोणत्याही क्रिकेट फॅकल्टीला कोणत्याही खेळाडूला दंड किंवा बक्षीस लावण्याची सूचना दिलेली नाही. माझा क्रिकेटशी संबंध नाही. कृपया असे व्हॉट्सअप फॉरवर्ड आणि व्हिडिओ माझ्या अधिकृत प्लॅटफॉर्मवरून असल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका.”
यानंतर, आम्ही तिरंगा घेऊन फिरण्याच्या दाव्याचीही चौकशी केली, परंतु आम्हाला असा कोणताही विश्वासार्ह रिपोर्ट सापडला नाही, अशा बातम्या मीडियामध्ये न येणे सहसा घडत नाही.
आमच्या तपासात सापडलेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की व्हायरल दावा खोटा आहे, रतन टाटा यांनी अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.
Our Sources
Ratan Tata X account: Tweet on 30th Oct 2023
(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदीसाठी सर्वप्रथम रुंजय कुमार यांनी केले आहे.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in
फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad Prabhu
December 9, 2024
Prasad Prabhu
October 19, 2024
Prasad Prabhu
October 15, 2024
|