About: http://data.cimple.eu/claim-review/e29ec7480677bbc900068f3f0c8907d314e827c6713dfadcd29a8fbb     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Fact Check: बेकिंग सोडा ने कॅन्सर ठीक होतो असा दावा करणारी पोस्ट खोटी व्हायरल दावा ज्यात म्हंटले आहे कि बेकिंग सोडा ने कॅन्सर बरा होतो तो खोटा आहे. व्हायरल मेसेज मध्ये ज्या डॉक्टरांचा उल्लेख करण्यात आला आहे त्यांनी देखील हे नाकारले. बेकिंग सोडा ऍसिडिटी ला रिव्हर्स करतो, ह्या बद्दल विविध संशोधन देखील होत आहेत. - By: Ankita Deshkar - Published: Jul 29, 2022 at 06:20 PM विश्वास न्यूज (नवी दिल्ली): विश्वास न्यूजला विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हिंदीमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असलेला एक संदेश समोर आला ज्यामध्ये असे म्हटले आहे की अनेक वर्षांच्या संशोधनानंतर वैज्ञानिकांनी असा निष्कर्ष काढला आहे की स्वयंपाकघरात वापरण्यात येणारा बेकिंग सोडा कर्करोग बरा करतो. मात्र, विश्वास न्यूजला हा व्हायरल मेसेज खोटा असल्याचे आढळले. ज्या डॉक्टरांना या मेसेजचे श्रेय देण्यात आले आहे, त्यांनीही हा व्हायरल मेसेज खोटा असल्याचे सांगितले. काय होत आहे व्हायरल? फेसबुक यूजर BR Shahu ह्यांनी एक मोठा मेसेज त्यांच्या फेसबुक प्रोफाइल वर पोस्ट केला. तसेच विश्वास न्यूज ला आपल्या व्हाट्सअँप चॅट-बोट (+91 9599299372) वर देखील हा व्हायरल मेसेज मिळाला. मेसेज होता: वैज्ञानिकों ने ढूंढ निकाला कैंसर का सबसे सस्ता इलाज 2 ₹ की बेकिंग सोडा जड़ से खत्म कर देगी कैंसर खानें वाले सोडे से कैंसर ख़त्म New Delhi : कैंसर के मरीजों के लिए एक बड़ी राहत वाली खबर! दुनियांभर के वैज्ञानिक जिस बीमारी के लिए सालों से इलाज ढूंढ रहे थे! उसका आखिरकार तोड़ मिल चुका हैं! दुनियां भर में कैंसर के इलाज अरबों रुपए पानी की तरह बहा दिए गए हैं! कोई भी दवा पूरी तरह से कैंसर को जड़ से खत्म करने में नाकाम साबित अमेरिका के लडविंग इंस्टीट्यूट फॉर कैंसर रिसर्च में अमेरिकी वैज्ञानिकों के दल ने हाल ही में कुछ नए शोध किए! इस टीम की अगुवाई मशहूर कैंसर वैज्ञानिक जॉन हॉप्किंग यूनिवर्सिटी के ऑनकोलॉजिस्ट कैंसर विशेषज्ञ डॉ. ची वान डैंग ने की उन्होंने कहाँ कि हम सालों तक रिसर्च कर चुके हैं! अब तक कैंसर के जो भी इलाज मौजूद हैं वो काफी महंगे हैं! हमने जो शोध किया उसमें चौंकाने वाले नतीजे सामने आए हैं! आपके किचन में रखा बेकिंग सोड़ा कैंसर के लिए रामबाण औषधि हैं! डॉ. डैंग ने बेकिंग सोडा पर लंबी रिसर्च की और जो परिणाम हमने अब तक सिर्फ सुने थे वो प्रमाणित हो गए! बताये कि कैंसर का मरीज बेकिंग सोडा पानी के साथ मिलाकर पी ले तो कुछ ही दिनों में इसका असर दिखने लगेगा! उन्होंने बताया कि कीमोथेरेपी और महंगी दवाओं से भी तेजी से बेकिंग सोडा ट्यूमर सेल्स को न सिर्फ बढ़ने से रोकता हैं! बल्कि उसे खत्म भी कर देता हैं! डॉ. डैंग ने पूरी जानकारी देते हुए बताया कि हमारे शरीर में हर सेकेंड लाखों सेल्स खत्म होते हैं! और नए सेल्स उनकी जगह ले लेते हैं! लेकिन कई बार नए सेल्स के अंदर खून का संचार रुक जाता हैं! और ऐसे ही सेल्स एक साथ इकट्ठा हो जाते हैं! जो धीरे-धीरे बढ़ता हैं! इसी को ट्यूमर कहाँ जाता हैं! उन्होंने बताया कि हमने ब्रेस्ट और कोलोन कैंसर के ट्यूमर सेल्स पर बेकिंग सोडा के प्रभाव की जांच की और हमने पाया कि बेकिंग सोडा वाला पानी पीने के बाद जो ट्यूमर सेल्स बढ़ रहे तो वो काफी हद तक रुक गए! उन्होंने बताया ट्यूमर सेल्स में आक्सिजन पूरी तरह खत्म हो जाती हैं! तो उसे मेडिकल भाषा में हिपोक्सिया कहते हैं! हिपोक्सिया की वजह से तेजी से उस हिस्से का पीएच लेवल गिरने लगता हैं! और ट्यूमर के ये सेल एसिड बनाने लगते हैं! इस एसिड की वजह से पूरे शरीर में भयंकर दर्द शुरू हो जाता हैं! अगर इन सेल्स का तुरंत इलाज न किया जाए तो ये कैंसर सेल्स में तब्दील हो जाते हैं! डॉ. डैंग के मुताबिक बेकिंग सोडा मिला पानी पीने से शरीर का पीएच लेवल भी मेंटेन रहता हैं! और एसिड वाली समस्या न के बराबर होती हैं! डॉ. डैंग ने बताया कि कई बार कीमोथेरेपी के बावजूद भी ऐसे कैंसर सेल्स शरीर में रह जाते हैं! जो बाद में दोबारा से शरीर में कैंसर सेल्स बनाने लगते हैं! इन्हें T सेल्स कहते हैं! इन टी सेल्स को नाकाम सिर्फ बेकिंग सोडा से ही किया जा सकता हैं! डॉ. वॉन डैंग ने कहाँ बेकिंग सोडा कैंसर समेत कई बीमारियों का इलाज हैं! अब हम प्रमाणिक तौर पर कह सकते हैं कि कैंसर का सबसे सस्ता और अच्छा इलाज बेकिंग सोडा से मिला पानी हैं! उन्होंने बताया कि जिन लोगों पर हमने प्रयोग किए उन्हें दो हफ्तों पर पानी में बेकिंग सोडा मिलाकर दिया और सिर्फ 2 हफ्ते में उन लोगों के ट्यूमर सेल्स लगभग खत्म हो गए ! टाटा मेमोरियल हॉस्पिटल के डॉ. राजेन्द्र ए. बडवे ने जोर देकर कहाँ कि यदि हर कोई इस समाचार पत्र को प्राप्त कर दूसरों को अग्रेषित कर सकता हैं! तो निश्चित रूप से हज़ारों जीवन की रक्षा कर उन्हें बचा सकते हैं! जय श्री राम जय हिंद जय भारत कहकर आप सभी माननीय श्रीमान् मेरा सादर प्रणाम स्वीकार करें! भाषांतर: शास्त्रज्ञांनी कर्करोगावर सर्वात स्वस्त उपचार शोधला आहे, ₹ 2 चा बेकिंग सोडा कॅन्सरला मुळापासून दूर करेल सोडा खाल्ल्याने कर्करोग बरा होतो नवी दिल्ली : कॅन्सरग्रस्तांसाठी मोठी दिलासादायक बातमी! ज्या आजारावर जगभरातील शास्त्रज्ञ वर्षानुवर्षे इलाज शोधत होते! शेवटी त्याला ब्रेक मिळाला आहे! जगभरात कर्करोगाच्या उपचारासाठी कोट्यवधी रुपये पाण्यासारखे वाहून गेले! कोणतेही औषध कर्करोग पूर्णपणे नष्ट करण्यास असमर्थ असल्याचे सिद्ध झाले आहे. अमेरिकेतील लुडविंग इन्स्टिट्यूट फॉर कॅन्सर रिसर्चच्या अमेरिकन शास्त्रज्ञांच्या चमूने नुकतेच काही नवीन संशोधन केले! या टीमचे नेतृत्व प्रसिद्ध कर्करोग शास्त्रज्ञ करत आहेत. जॉन हॉपकिंग युनिव्हर्सिटीचे ची व्हॅन डांग कर्करोगतज्ज्ञ डॉ त्यांनी कोठे केले की आम्ही वर्षानुवर्षे संशोधन केले आहे! आजवर उपलब्ध असलेले सर्व कॅन्सरचे उपचार खूप महाग आहेत! आम्ही केलेल्या संशोधनाचे आश्चर्यकारक परिणाम मिळाले आहेत! तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेला बेकिंग सोडा कर्करोगावर रामबाण उपाय आहे! डॉ. डांग यांनी बेकिंग सोडा वर दीर्घ संशोधन केले आणि आम्ही आतापर्यंत फक्त ऐकलेले परिणाम सिद्ध झाले आहेत! सांगा की कॅन्सरच्या रुग्णाने बेकिंग सोडा पाण्यात मिसळून प्यायल्यास त्याचा परिणाम काही दिवसातच दिसून येईल! त्यांनी सांगितले की केमोथेरपी आणि महागड्या औषधांपेक्षाही जलद, बेकिंग सोडा केवळ ट्यूमर पेशी वाढण्यापासून थांबवत नाही! पण तोही संपतो! संपूर्ण माहिती देताना डॉ.डांग म्हणाले की, आपल्या शरीरातील लाखो पेशी दर सेकंदाला संपतात! आणि नवीन पेशी त्यांची जागा घेतात! परंतु काहीवेळा नवीन पेशींच्या आत रक्ताभिसरण थांबते. आणि अशा प्रकारे पेशी एकत्र होतात! ते हळूहळू वाढते! तिथेच ट्यूमर जातात! त्यांनी सांगितले की आम्ही स्तन आणि कोलन कर्करोगाच्या ट्यूमर पेशींवर बेकिंग सोडाच्या प्रभावाची तपासणी केली आणि आम्हाला आढळले की बेकिंग सोडा टाकून पाणी प्यायल्यावर ज्या गाठी पेशी वाढल्या, त्या बऱ्याच प्रमाणात थांबल्या! त्याने सांगितले की ट्यूमर पेशींमधील ऑक्सिजन पूर्णपणे नष्ट होतो! म्हणून त्याला वैद्यकीय भाषेत हायपोक्सिया म्हणतात. हायपोक्सियामुळे त्या भागाची पीएच पातळी झपाट्याने कमी होऊ लागते. आणि या ट्यूमर पेशी ऍसिड बनवू लागतात! या ऍसिडमुळे संपूर्ण शरीरात तीव्र वेदना सुरू होतात. या पेशींवर त्वरित उपचार न केल्यास त्यांचे कर्करोगाच्या पेशींमध्ये रूपांतर होते. डॉ.डांग यांच्या मते, बेकिंग सोडा मिसळलेले पाणी प्यायल्याने शरीराची पीएच पातळीही कायम राहते! आणि ऍसिड समस्या नगण्य आहेत! डॉ.डांग यांनी सांगितले की, अनेक वेळा केमोथेरपीनंतरही अशा कर्करोगाच्या पेशी शरीरात राहतात! जे नंतर पुन्हा शरीरात कर्करोगाच्या पेशी बनवण्यास सुरुवात करतात! त्यांना टी पेशी म्हणतात! या चहाच्या पेशी फक्त बेकिंग सोड्यानेच आवरल्या जाऊ शकतात! डॉ वॉन डांग जिथे बेकिंग सोडा हा कर्करोगासह अनेक आजारांवर बरा आहे! आता आपण हे निश्चितपणे म्हणू शकतो कॅन्सरवर सर्वात स्वस्त आणि उत्तम उपाय म्हणजे बेकिंग सोडा मिसळलेले पाणी! त्यांनी सांगितले की आम्ही ज्या लोकांवर वापरतो त्यांना दोन आठवडे पाण्यात मिसळलेला बेकिंग सोडा दिला आणि फक्त 2 आठवड्यांत, त्या लोकांच्या ट्यूमर पेशी जवळजवळ संपल्या! टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे डॉ राजेंद्र ए बुडवे यांनी आग्रह धरला की जर प्रत्येकाला हे वृत्तपत्र मिळेल इतरांना फॉरवर्ड करू शकता! त्यामुळे हजारो जीव वाचवल्याने त्यांना नक्कीच वाचवता येईल! जय श्री राम जय हिंद जय भारत सांगून आपण सर्व आदरणीय सर कृपया माझ्या शुभेच्छा स्वीकारा! हि पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा. तपास: तपासाची सुरुवात विश्वास न्यूज ने किवर्ड सर्च ने केली. आम्ही हे शोधून पहिले कि खरंच बेकिंग सोडा ने कॅन्सर बरा होतो का. आम्हाला इंटरनेटवर विविध संशोधन अभ्यास आढळले. एका लेखात नमूद केले आहे: बेकिंग सोडा आम्ल निष्प्रभ करू शकतो, संशोधकांचा असा विश्वास आहे की ते प्यायल्याने ट्यूमरची आम्लता कमी होऊ शकते आणि निष्क्रिय पेशी पुन्हा जिवंत होऊ शकतात, ज्यामुळे त्यांना केमोथेरपीसाठी सोपे लक्ष्य बनते. काही दुसऱ्या आर्टिकल मध्ये देखील हेच म्हंटले गेले होते. पण आम्हाला कुठेच असा लेख सापडला नाही ज्यात लिहले असेल कि बेकिंग सोडा ने कॅन्सर ठीक होतो. या व्हायरल मेसेजचे श्रेय दोन जणांना देण्यात आले होते. एक होते डॉ ची व्हॅन डांग जे प्रख्यात ऑन्कोलॉजिस्ट आहेत. विश्वास न्यूजने ईमेलद्वारे डॉ ची डांग यांच्याशी संपर्क साधला आणि व्हायरल संदेश त्यांच्याशी शेअर केला. प्रत्युत्तरात डॉ डांग म्हणाले, “हे दुर्दैवाने चुकीचे आहे. बेकिंग सोडा कर्करोग बरा करतो, असा दावा आम्ही कधीच केला नाही.” तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही टाटा मेमोरियल सेंटरमधील सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. राजेंद्र बडवे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला. डॉ राजेंद्र बडवे यांनीही या दाव्याला पाठिंबा दिला आहे, असे त्या मेसेज मध्ये म्हंटले आहे. विश्वास न्यूज ने डॉ. बडवे यांच्या कार्यालयात संपर्क केला जिथे त्यांचे सचिव आमच्याशी बोलले. डॉ बडवे यांनी असे कोणतेही विधान केलेले नाही किंवा बेकिंग सोडा कॅन्सर बरा करतो या दाव्याचे समर्थन करत नाही यावरही त्यांनी भर दिला. पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने डॉ मनीष कुमार, वरिष्ठ सल्लागार मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, अमेरिकन ऑन्कोलॉजी इन्स्टिट्यूट, गुरुग्राम ह्यांना संपर्क केला. दाव्यावर ते म्हणाले, “ट्यूमर पेशींमध्ये हायपोक्सिया (कमी ऑक्सिजनचे क्षेत्र) असते ज्यामुळे लॅक्टिक ऍसिडोसिस होतो. या पेशी संपूर्ण ट्यूमर लोडचा भाग बनतात ज्यांना पारंपारिक केमोद्वारे लक्ष्य करणे कठीण आहे. या सुप्त भागांना लक्ष्य कसे करायचे हा बराच काळ संशोधनाचा विषय आहे. लैक्टिक ऍसिडोसिस उलट करणे सोपे नाही. त्या भागाचे ऑक्सिजन वाढवणे हा एकमेव विश्वसनीय मार्ग आहे. लुडविग कॅन्सर रिसर्चच्या अभ्यासात बेकिंग सोडा वापरून आम्लता कमी करण्यासाठी नवीन यंत्रणा वापरली गेली आहे. तो एक मनोरंजक विचार आहे; तथापि, कोणत्याही वेगळ्या अभ्यासातून मिळालेल्या प्राथमिक डेटावर आधारित या धोरणांचा स्वीकार करणे फार लवकर आहे. हा एक स्वागतार्ह दृष्टीकोन आहे आणि कर्करोगाच्या व्यवस्थापनामध्ये या गृहितकाची चाचणी घेण्यासाठी मोठ्या अभ्यासाची आवश्यकता आहे, जिथे दररोज काही नवीन संशोधन समोर येत आहेत. कोणत्याही इनपुटकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही आणि त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. ” त्यामुळे बेकिंग सोडा कॅन्सर बरा करतो असा व्हायरल दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले. हे फक्त आंबटपणा उलट करते. तपासाच्या शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने BR Shahu ज्यांनी हा दावा फेसबुक वर शेअर केला त्यांचे सोशल बॅकग्राउंड चेक केले. त्यात लिहले होते कि ते मुंबई चे रहिवासी आहेत आणि त्यांचे फेसबुक वर 4.5K मित्र आहेत. निष्कर्ष: व्हायरल दावा ज्यात म्हंटले आहे कि बेकिंग सोडा ने कॅन्सर बरा होतो तो खोटा आहे. व्हायरल मेसेज मध्ये ज्या डॉक्टरांचा उल्लेख करण्यात आला आहे त्यांनी देखील हे नाकारले. बेकिंग सोडा ऍसिडिटी ला रिव्हर्स करतो, ह्या बद्दल विविध संशोधन देखील होत आहेत. - Claim Review : बेकिंग सोडा ने कॅन्सर ठीक होतो - Claimed By : BR Shahu - Fact Check : False Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know! Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • English
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.115 as of Oct 09 2023


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data] Valid XHTML + RDFa
OpenLink Virtuoso version 07.20.3238 as of Jul 16 2024, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 3 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2025 OpenLink Software