About: http://data.cimple.eu/claim-review/e2addab10a179fa4a46e8b0cb2f4270df3ec9ffbd918da85abd825c8     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Fact Check Fact Check: आंबा खाऊन कोल्डड्रिंक पिल्यास होतो मृत्यू? जाणून घ्या व्हायरल दाव्याचे सत्य काय आहे Claim आंबा खाऊन शीतपेये अथवा कोल्डड्रिंक पिल्यास मृत्यू होतो. Fact असे कोणतेही संशोधन झालेले नसून अशाप्रकारे मृत्यू झाल्याची घटनाही प्रत्यक्षात घडलेली नाही. हा दावा खोटा आहे. फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा आणि शीतपेयांच्या सध्या उन्हाळ्यात चलती आहे. याच दरम्यान एक दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आंबा खाऊन कोल्डड्रिंक पिल्याने काही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आपणही आंबा खाऊन कोल्डड्रिंक पिणे टाळावे अन्यथा मृत्यूचा सामना करावा लागेल असे हा दावा सांगतो आहे. समान आरोग्यविषयक सल्ला किंवा मृत्यूचा इशारा देणारा हा दावा फेसबुकवर अनेक युजर्सनी केला असल्याचे आमच्या निदर्शनास आले. न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे. “आंबा खाल्ल्यावर कोल्डड्रिंक पिऊ नका ! काही प्रवासी चंडीगढ़ येथे फिरावयास गेले होते. त्यांनी आंबा खाल्ल्यावर लगेच कोल्डड्रिंक प्याले. त्यांना अस्वस्थ वाटू लागले व ते सगळे बेशुद्ध होऊ लागले. उपचाराकरिता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता तिथे त्या सर्वांना मृत घोषित करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले, की आंबा खाल्ल्यानंतर कोणतेही कोल्डड्रिंक किंवा सॉफ्टड्रिंक पिऊ नये. आंब्यातील सायट्रिक अॅसिड आणि कोल्डड्रिंकमधील कार्बनिक अॅसिड एकत्र मिसळल्यामुळे शरीरात विष तयार झाले. कृपया हा मॅसेज आपल्या सर्व प्रियजनांपर्यंत पोचवा. सध्या आंब्याचा सिझन सुरू झाला आहे.” असे हा दावा सांगतो. Fact check/ Verification आंबा खाऊन कोल्डड्रिंक पिल्याने चंदिगढ येथे फिरावयास गेलेल्या प्रवाशांचा मृत्यू झाला असे व्हायरल पोस्ट मध्ये म्हटले आहे. यासंदर्भात आम्ही शोध घेतला. व्हायरल पोस्ट मध्ये कुठले प्रवासी चंदीगढला गेले होते. ते किती होते आणि त्यांचा कुठे मृत्यू झाला याबद्दल काहीही लिहिलेले नाही. शिवाय डॉक्टरांनी सांगितले असा उल्लेख असला तरी डॉक्टरांचे नाव नमूद करण्यात आलेले नाही. यासाठी आम्ही किवर्ड च्या माध्यमातून अशी कोणती घटना घडली आहे का? याचा शोध घेतला, मात्र काहीच हाती लागले नाही. चंदिगढ मध्ये अशी कोणतीही घटना घडल्याची माहिती देणारे कोणतेही मीडिया रिपोर्ट्स किंवा बातम्या आम्हाला सापडल्या नाहीत. आंबा आणि शीतपेयांच्या मिश्रणातून अथवा एकत्रित सेवनातून नेमके असे घडू शकते का? याचा आम्ही तपास केला. आम्हाला frontiers ने १७ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रकाशित केलेला एक लेख सापडला. यामध्ये आंब्याचे रासायनिक गुणधर्म आम्हाला वाचायला मिळाले. “आंब्यामध्ये मॅलिक आणि सायट्रिक ऍसिड सारखी सेंद्रिय ऍसिडस् असतात, जे आंब्याच्या फळांच्या आंबटपणाचे प्रमुख कारण आहेत. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन ने प्रसिद्ध केलेला एक संशोधनपर लेख आम्हाला मिळाला. आंबा हे फळ शरीराला कसे पोषक आहे आणि त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात याची माहिती आम्हाला त्यामध्ये मिळाली. आम्ही शीतपेयांचेही रासायनिक गुणधर्म शोधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला Britannica ने प्रसिद्ध केलेला एक लेख सापडला. “कार्बोनेटेड पेयांमध्ये कार्बोनिक ऍसिड असते (पाण्यात विरघळते, सीलबंद कंटेनरमध्ये हायड्रोजन आणि कार्बोनेटमध्ये मोडते) जे बाटली उघडल्यावर विघटित होते.” अशी माहिती आम्हाला मिळाली. ” कोल्डड्रींक्स पिताना चव निर्माण करण्यासाठी याचा उपयोग होतो.” अशीही माहिती आम्हाला यातून मिळाली. आंबा आणि शीतपेयांमधील रासायनिक घटकांचा संयोग होऊन विपरीत परिणाम होतो का? याचा शोध आम्ही घेतला. दरम्यान वीक किंवा कमकुवत ऍसिड संदर्भात आम्हाला ThoughtCo ने २९ जानेवारी २०२० रोजी प्रसिद्ध केलेला एक लेख सापडला. यामध्ये “कमकुवत ऍसिड हे ऍसिड आहे जे अंशतः पाण्यात किंवा जलीय द्रावणातील आयनमध्ये विरघळते. सायट्रिक आणि कार्बोनिक ऍसिड ही अशी दोन कमकुवत ऍसिडस् आहेत. साधारणपणे, समान पृथक्करण स्थिरांक असलेली दोन कमकुवत ऍसिडस् सोल्युशनमध्ये जास्त परस्परसंवादाशिवाय सह-अस्तित्वात असतात. त्यांच्यात पाण्यामध्ये समान पृथक्करण स्थिरांक असतात.” अशी माहिती मिळाली. आम्ही यासंदर्भात के एल ई इस्पितळाचे डॉ. माधव प्रभू यांच्याशी संपर्क साधला, ” याप्रकारे कोणतीही घटना आजवर घडल्याचे आपल्या ऐकिवात नाही. आंबा खाऊन शीतपेये पिल्याने अशा कोणत्याही घटना घडण्याचा संबंध येत नाही. दोन्ही पदार्थांचा आणि त्यातील घटकांचा संयोग घडून मृत्यू होत नाही. दरम्यान अशा पद्धतीचा दावा हा पूर्णपणे दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. असे त्यांनी सांगितले.” न्यूजचेकरने यापूर्वीही यासंदर्भात केलेल्या फॅक्ट चेक मध्ये मेसेजमधील सत्यता जाणून घेण्यासाठी यशोदा रुग्णालयाच्या डॉ. श्रुतिका शिनगारे यांच्याशी आम्ही संपर्क साधला होता. या व्हायरल मेसेजबाबत डॉ. श्रुतिका यांनी सांगितले, ”पिकलेल्या आंब्यामध्ये सिट्रिक अॅसिड खूपच कमी प्रमाणात असते. सॉफ्ट ड्रिंक बनवण्यासाठी कार्बोनिक अॅसिडचा वापर केला जातो. सिट्रिक अॅसिड आणि कार्बोनिक अॅसिड दोन्ही विक अॅसिड आहे. त्यांचा शरीरावर हानिकारक प्रभाव पडत नाही. पण जर कार्बोनिक अॅसिड ड्रिंक्सचे रोज सेवन केले तर त्यामुळे गॅस्ट्रिकचा त्रास होऊ शकतो. कार्बोनिक अॅसिडमुळे पोटात बुडबुडे निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे पोट भरल्यासारखे वाटू शकते.” त्याचबरोबर आम्ही आहारतज्ञ राजेश्वरी शेळके यांच्याशीही संपर्क साधला होता. त्यांनी सांगितले,”सिट्रिक अॅसिड आणि कार्बोनिक अॅसिड यामुळे शरीराला नुकसान पोहोचते. या गोष्टीला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही. असं केल्यावर काही लोकांना अपचन किंवा अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. पण लगेच त्यामुळे कोणाचा मृत्यू होणार नाही.” आंबा खाल्ल्यानंतर लगेच शीतपेयांचे सेवन शरीरासाठी घातक आहे हे दाखविणारा कोणताही पुरावा नसल्याचे आम्हाला दिसून आले. Conclusion अशाप्रकारे आमच्या तपासात आंबा खाऊन शीतपेये पिल्यास मृत्यू होतो असे सांगणारा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आढळला आहे. Result: False Our Sources Article published by Frontire on October 17, 2019 Article published by National Library of Medicine on October 17, 2019 Article published by Britannica on February 14, 2023 Article published by ThoughtCo on January 29, 2020 Conversation with Dr. Madhav Prabhu, KLE Hospital Conversation with Dr. Shrutika Shingaare, Yashoda Hospital Conversation with Rajeshwari Shelake, Dietitian कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • Hindi
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.115 as of Oct 09 2023


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data] Valid XHTML + RDFa
OpenLink Virtuoso version 07.20.3238 as of Jul 16 2024, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 5 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2025 OpenLink Software