schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Coronavirus
चीन आणि इतर देशातील कोरोना वाढीच्या बातम्या पसरत असतानाच आपल्या देशातही लॉकडाऊन सारखी परिस्थिती येणार असा दावा करणारा एक मेसेज व्हायरल होत आहे. व्हाट्सअप च्या माध्यमातून पाठविल्या जात असलेल्या या मेसेज मधून १५ जानेवारी पासून शाळा व कॉलेजीस २० दिवस बंद ठेवली जाणार असा दावा केला जात आहे.
“सावधान सावधान सावधान, कोविड चा विस्तार वाढतोय नवीन वर्षात लॉकडाऊन सारखी परिस्थिती येणार, १५ जानेवारी पासून २० दिवस शाळा कॉलेजीस बंद राहणार, सावध राहा आपल्या मुलांची काळजी घ्या, भारत सरकार तर्फे जनहितासाठी जारी” असा हा मेसेज सांगतो. अनेकजण हा मेसेज पुढे पाठवू लागले आहेत.
या मेसेजमध्ये भारत सरकारने जनहितासाठी हा संदेश जारी केला असल्याची माहिती वाचायला मिळाली. यासाठी आम्ही भारत सरकारने लॉकडाऊन किंवा शालेय सुट्टी संदर्भात कोणती अधिकृत घोषणा केली आहे का? हे शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला. कीवर्ड सर्च च्या माध्यमातून आम्ही ‘देशात लॉकडाऊन आणि शाळा कॉलेजना सुट्टी’ असे शब्द शोधले. मात्र आम्हाला कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अधिकृत संकेत स्थळावर आम्ही तपास केला असता अशी कोणतीही सूचना किंवा प्रकटन केले असल्याचे आम्हाला आढळले नाही.
हा मेसेज मराठीत असल्याने आम्ही याबद्दल महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण खात्याच्या संकेतस्थळावरही याबद्दल तपास केला. आम्हाला २० दिवस सुट्टी संदर्भात कोणतीच माहिती मिळाली नाही. केंद्रीय शिक्षण मंडळे किंवा पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण देणाऱ्या कोणत्याही संस्थेने अशी घोषणा केली असल्याचे आम्हाला दिसले नाही. अशी महत्वाची घोषणा झाली असल्यास त्याबद्दल विविध माध्यमात बातम्या प्रसिद्ध होणे गरजेचे होते, मात्र आम्हाला अशा संदर्भाचा एकही मीडिया रिपोर्ट आढळून आला नाही.
या संदर्भात सरकारी पातळीवर कोणती घोषणा झाली आहे का? याचा शोध घेताना आम्हाला पी आय बी फॅक्ट चेक ने ४ जानेवारी २०२३ रोजी केलेले एक ट्विट सापडले.
“कोविड मुळे देशात लॉकडाऊन होणार आणि शाळा व कॉलेजीस बंद केली जाणार” अशा आशयाचे दावे खोटे आहेत. कोविड संदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास तिचे तथ्य तपासा. असे या ट्विट मध्ये लिहिलेले आढळले. सरकारी अधिकृत प्रसिद्धी यंत्रणेनेच या दाव्याचे खंडन केले असल्याचे आमच्या तपासात दिसून आले आहे.
आमच्या तपासात कोविड मुळे लॉकडाऊन आणि शाळा कॉलेजांना सुट्टी देण्याबद्दलचा दावा पूर्णपणे निराधार, खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Our Sources
Official websites of Cental and State Education Departments
Tweet made by PIB Factcheck on January 4, 2023
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in
Komal Singh
January 10, 2025
Saurabh Pandey
September 23, 2023
Yash Kshirsagar
February 24, 2021
|