About: http://data.cimple.eu/claim-review/eca13dcb0026cef3047bc0cffd31ac01255881a6913e19b5a3e1fe2b     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Authors Claim केंद्राने वक्फ बोर्डावर बंधने आणू नयेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. Fact हा दावा खोटा आहे. उद्धव ठाकरे असे म्हणालेले नाहीत, शिवाय लोकमत ने असे क्रिएटिव्ह छापलेले नसून त्यांचा लोगो वापरून खोटा दावा करण्यात आला आहे. केंद्राने वक्फवर बंधने आणू नयेत असे उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचे सांगणारे लोकमतचा लोगो असलेले क्रिएटिव्ह सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल झाले आहे. याद्वारे दावा केला जात आहे की, “केंद्राने वक्फ बोर्डवर बंधने आणू नयेत, वक्फ बोर्डच्या जमिनी त्यांच्या हक्काच्या आहेत, मेहनतीने मिळवल्या आहेत, त्या मुसलमानांच्याच आहेत, मंदिरांसाठी वक्फ बोर्डचा बळी खपवून घेणार नाही.” असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. दाव्याचे संग्रहण इथे पाहता येईल. “कधी कधी यांच्या जन्मावरच शंका घेऊशी वाटते की ह्यांच्या धमण्यात नक्की ठाकरेंचंच रक्त वाहते का? उद्धव साहेब तुम्हाला इतकीच त्या लांडूळांची चाटूकारी करायची खाज आहे तर तुमची मातोश्री व महाराष्ट्रातील ठाकरे गट पक्षाच्या शाखा वक्फ बोर्डाच्या घशात घाला.” अशा कॅप्शनखाली व्हायरल क्रिएटिव्ह शेअर केले जात आहे. वक्फ बोर्डातील नियमांच्या बदलांची तरतूद असलेल्या वक्फ बोर्डाच्या दुरुस्ती विधेयकासंदर्भात मागील आठवड्यापासून चर्चा सुरु आहेत. याअनुषंगाने उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया असे सांगून सध्या हा दावा केला जात आहे. Fact Check/ Verification व्हायरल क्रिएटिव्हच्या तपासासाठी आम्ही ते काळजीपूर्वक पाहिले. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र आणि वरच्या भागात ‘लोकमत’ असे मराठी भाषेत आणि खालच्या बाजूला ‘Lokmat .com’ असे लिहिण्यात आले असल्याचे निदर्शनास आले. लोकमत या माध्यम समूहाने असे क्रिएटिव्ह नेमके कोठे अपलोड केले आहे, हे पाहण्याचा आपण निर्णय घेतला. सर्वप्रथम आम्ही व्हायरल क्रिएटिव्हवर Google वर रिव्हर्स इमेज सर्च केला. मात्र आम्हाला क्रिएटिव्हचा मुख्य सोर्स हा याप्रकारचे व्हायरल दावेच असल्याचे आणि लोकमतचे कुठलेही सोशल मीडिया पेज किंवा अकाउंट नसल्याचे दिसून आले. दरम्यान आम्ही लोकमत चे फेसबूक पेज, X हॅन्डल आणि अधिकृत वेबसाईटसुद्धा तपासून पाहिली. मात्र उद्धव ठाकरेंच्या नावे अशाप्रकारे कोणतेच क्रिएटिव्ह त्यांनी पोस्ट केल्याचे किंवा याविषयावर बातमी दिल्याचे निदर्शनास आले नाही. यानंतर आम्ही शिवसेना पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्याही फेसबूक पेज आणि X हँडल्सवर तपासून पाहिले मात्र, उद्धव ठाकरे यांनी अशाप्रकारे कोणतेही विधान केल्याचे किंवा तसे पोस्ट केल्याचे पाहावयास मिळाले नाही. शिवाय कोणत्याही इतर अधिकृत माध्यमावर याबद्दलची बातमी आम्हाला दिसली नाही. उद्धव ठाकरेंनी असे विधान केले असते तर त्याची मोठी बातमी झाली असती. आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्कप्रमुख हर्षल प्रधान यांच्याशी संपर्क साधला असता, “अशाप्रकारच्या पोस्टच्या माध्यमातून अकारण बनावट गोष्टी पसरविल्या जात आहेत. वक्फ बोर्डावर बंधने घालू नका असे उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचे धादांत खोटे पसरविले जात आहे. हा खोटारडेपणा आहे.” अशी त्यांनी माहिती दिली. याचबरोबरीने आम्ही लोकमत डॉट कॉम चे संपादक अमेय गोगटे यांच्याशी संपर्क साधला असता, याप्रकारचे क्रिएटिव्ह लोकमतने बनविले नाही आणि कोणत्याही सोशल मीडिया हँडलवर पोस्ट देखील केलेले नाही. बनावटरित्या लोकमतच्या लोगोचा वापर करून खोटी माहिती पसरविली जात आहे.” अशी माहिती त्यांनी दिली. या क्रिएटिव्ह मुळे होत असणारा गैरसमज दूर करण्यासाठी लोकमतने प्रसिद्ध केलेली दाव्याचे खंडन करणारी फॅक्टचेक स्वरूपातील बातमीही त्यांनी न्यूजचेकरला उपलब्ध करून दिली. Conclusion अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात केंद्राने वक्फ बोर्डावर बंधने आणू नयेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले, असे सांगणारे क्रिएटिव्ह बनावट आहे. हा दावा खोटा आहे. उद्धव ठाकरे असे म्हणालेले नाहीत, शिवाय लोकमत ने असे क्रिएटिव्ह छापलेले नसून त्यांचा लोगो वापरून खोडसाळपणा करण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे. Result: False Our Sources Google reverse image search Social media handles of Lokmat Social media handles of Shivsena(UBT) Conversation with Shivsena PRO Harshal Pradhan Conversation with Amey Gogte, Editor Lokmat.com कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • Hindi
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.115 as of Oct 09 2023


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data] Valid XHTML + RDFa
OpenLink Virtuoso version 07.20.3238 as of Jul 16 2024, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 2 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2025 OpenLink Software