Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
भूतानने 67 वर्षांत पहिल्यांदाच आसामात येणारे पाणी रोखले आहे.
सोशल मीडियात भूतानने 67 वर्षांच्या काळात पहिल्यांदाच आसामात येणारे पाणी रोखले असल्याचा दावा करणा-या पोस्ट व्हायरल झाली. यात म्हटलेले आहे की हे पहिल्यांदाच घडलेले आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांत संघर्ष उभा राहिल्यानंतर सोशल मीडियात भूतानने देखील भारतविरोधी भूमिका घेतल्याच्या आशयाच्या पोस्ट सोशल मीडियात आढळत आहेत.
पडताळणी
आम्ही याबाबत पडताळणी सुरु केली असता याच दाव्याच्या अनेक पोस्ट फेसुबकवर आढळून आल्या.
या दरम्यान अधिक शोध घेतला असता पोलीसनामा या वेबसाईटवर भूतानने आसाममध्ये येणारे पाणी रोखल्यामुळे तेथील शेतकरी अडचणीत सापडल्याचे म्हटले आहे. शिवाय शेतक-यांनी आंदोलन केले आहे. बक्सा आणि अन्य जिल्ह्यातील शेतकरी भूतानमधून येणा-या पाण्यावर शेती करतात मात्र आता 25 गावांतील शेतक-यांना पाण्याची समस्या निर्माण झाली असल्याचे बातमीत म्हटले आहे.
पुढे शोध सुरुच ठेवला असता भूतानने पाणी रोखल्याचा इन्कार केल्याची माहिती देणारे एएनआय या वृत्तसंस्थेचे ट्विट आढळून आले.
भूतान सरकारने यावर नेमके काय म्हटले आहे याबाबत शोध घेतला असता, भूतानने आसाममध्ये येणारे पाणी रोखल्याच्या वृत्ताचे खंडन केल्याचे आढळून आले. यासंदर्भात भूतानच्या परराष्ट्र विभागाची फेसबुक पोस्ट आम्हाला मिळाली.
आसामचे मुख्य सचिव कुमार कृ्ष्णा संजीव यांनी देखील ट्विट करुन माहिती दिलेली आहे की, पाण्यात काही नैसर्गिक अडथळे आल्याने भूतानने प्रवाह पूर्ववत करण्यास भारताची मदत केली.
यावरुन हेच स्पष्ट होते की, भूतानने आसाममध्ये येणारे पाणी अडविलेले नाही. सोशल मीडियात चुकीचा दावा व्हायरल झाला आहे.
Source
Result – False
Vasudha Beri
August 29, 2024
Runjay Kumar
July 23, 2024
Yash Kshirsagar
May 22, 2021