Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
Claim
उत्तराखंडच्या खाणीत अडकलेल्या कामगारांची सुटका केल्याचे फुटेज.
Fact
व्हायरल होत असलेला व्हिडिओ अडकलेल्या मजुरांची खाणीतून कशी सुटका केली जाईल याचे प्रात्यक्षिक दर्शविणारा आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये दावा केला जात आहे की हे उत्तराखंड खाणीत अडकलेल्या कामगारांची सुटका करण्यात आली तेंव्हाचे फुटेज आहे.
“जगातील आघाडीच्या खाण तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे… USA मधून ड्रिलिंग मशिन मागवल्या आहेत… मुख्यमंत्र्यांना रोज फोन करून काय घडले याची चौकशी सुरु आहे. पंतप्रधान कार्यालयाचे थेट निरीक्षण… केंद्रीय मंत्री, लष्कराच्या अभियंत्यांना मैदानात उतरवले. सर्व ४१ कामगारांची सुटका केली… #मौनसी, तारणहार….भारतपिता….आम्ही काय तपश्चर्या केली…नेता मिळवण्यासाठी…मला दिल्याबद्दल देवाचे आभार.” अशी कॅप्शन वाचायला मिळाली.
या पोस्टचे संग्रहण येथे पाहता येईल.
उत्तराखंड खाणीत अडकलेल्या कामगारांची सुटका करतानाचे फुटेज दाखवणाऱ्या या व्हिडिओ संदेशाबाबत सत्यता पडताळून पाहण्यासाठी आम्ही तपास केला.
व्हायरल व्हिडीओचे किफ्रेम्स काढून आम्ही त्यावर रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला हा व्हिडिओ NDTV च्या युट्युब चॅनेलवर 24 नोव्हेंबर रोजी रिलीज करण्यात आला होता हे लक्षात आले. “बोगद्यात अडकलेल्या कामगारांची अशा प्रकारे सुटका केली जाईल” असे व्हिडिओची कॅप्शन सांगते.
पुढील शोधात इंडियन एक्सप्रेसच्या यूट्यूब चॅनेलवरही हा समान व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला असल्याचे निदर्शनास आले. “NDRF ने अडकलेल्या कामगारांसाठी पाइपलाइन स्ट्रेचर बचावाचे प्रात्यक्षिक केले” या कॅप्शनखाली हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता.
यावरून हा व्हिडीओ कामगारांची सुटका करतानाचा नव्हे तर अडकलेल्या कामगारांची सुटका कशी केली जाईल याच्या प्रात्यक्षिकाचा असल्याचे स्पष्ट होते.
उत्तराखंडच्या खाणीत अडकलेल्या कामगारांची सुटका केल्याचे फुटेज असे सांगत व्हायरल होत असलेला व्हिडिओ अडकलेल्या मजुरांची खाणीतून कशी सुटका केली जाईल याचे प्रात्यक्षिक दर्शविणारा आहे. हे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
Our Sources
Video uploaded by NDTV on November 24, 2023
Video uploaded by The Indian Express on November 24, 2023
(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर तमिळसाठी विजयालक्ष्मी बालसुब्रमण्यम यांनी केले आहे. ते येथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा