schema:text
| - Fact Check: नमाजचे पठण करणाऱ्या लोकांचा हा व्हिडिओ, महाराष्ट्रातील नसून तेलंगणातील आहे
विश्वास न्यूजला त्यांच्या तपासणीत असे आढळले की, व्हायरल दावा हा दिशाभूल करणारा आहे. वास्तविक हा व्हिडिओ महाराष्ट्रातील नसून तेलंगणातील शंकरपल्ली येथील आहे. खरे पाहता, शंकरपल्लीच्या अतिथी ग्राउंडवर इज्तेमाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा व्हिडिओ आता महाराष्ट्रातील असल्याचे सांगून शेअर केला जात आहे.
- By: Pragya Shukla
- Published: Jan 16, 2025 at 06:35 PM
- Updated: Jan 16, 2025 at 06:59 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज). सोशल मीडियावर लोक एका ठिकाणी जमून नमाज पठण करतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, महाराष्ट्रात अनेक लोकांनी एकत्र येऊन उघड्यावर नमाजचे पठण केले.
विश्वास न्यूजला त्यांच्या तपासणीत असे आढळले की, व्हायरल दावा हा दिशाभूल करणारा आहे. वास्तविक हा व्हिडिओ महाराष्ट्रातील नसून तेलंगणातील शंकरपल्ली येथील आहे. खरे पाहता, शंकरपल्लीच्या अतिथी ग्राउंडवर इज्तेमाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा व्हिडिओ आता महाराष्ट्रातील असल्याचे सांगून शेअर केला जात आहे.
काय होत आहे व्हायरल?
‘हिंदू युवा वाहिनी’ या फेसबुक वापरकर्त्याने 5 जानेवारी 2025 रोजी व्हायरल व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘हे दृश्य महाराष्ट्रातील आहे.’
या पोस्टची संग्रहित लिंक येथे पहा.
व्हायरल व्हिडिओ शेअर करताना, एक्स वापरकर्त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “हे दृश्य महाराष्ट्रातील आहे. एका षड्यंत्राचा भाग म्हणून हळूहळू शिवरायांची भूमी अफझलखानाच्या बलिदानाची भूमी बनवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. जातीच्या नावाखाली हिंदूंना लढायला लावून, हे नेते आम्हाला गोंधळात टाकून, संपूर्ण देशला जिहादींच्या हाती सोपवत आहेत.”
तपास
व्हायरल व्हिडिओची पोस्ट जाणून घेण्यासाठी, आम्ही इनव्हिड (InVid) टूलच्या मदतीने व्हिडिओच्या अनेक प्रमुख फ्रेम्स काढल्या आणि त्यांचा गुगल रिव्हर्स इमेजच्या मदतीने शोध घेतला. आम्हाला Stylish Gudu नावाच्या फेसबुक अकाउंटवर दाव्याशी संबंधित पोस्ट आढळली. ही पोस्ट 5 जानेवारी 2025 रोजी शेअर करण्यात आली होती. उपलब्ध माहितीनुसार, व्हायरल झालेला व्हिडिओ तेलंगणातील शंकरपल्ली शहरातील आहे.
आम्हाला तेलंगणाच्या डेक्कन न्यूज डेलीच्या अधिकृत पेजवरही व्हायरल व्हिडिओ सापडला. हा व्हिडिओ 4 जानेवारी 2025 रोजी शेअर करताना, त्यास शंकरपल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमाचा असल्याचे सांगण्यात आले आहे. या कार्यक्रमाशी संबंधित इतर व्हिडिओ देखील पृष्ठावर उपलब्ध आहेत.
मिळालेल्या माहितीच्या आधारे, आम्ही संबंधित कीवर्डच्या मदतीने गुगलवर शोध घेतला. आम्हाला एएचएन न्यूजच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर व्हायरल व्हिडिओ सापडला. हा व्हिडिओ 4 जानेवारी 2025 रोजी अपलोड करण्यात आला होता. उपलब्ध माहितीनुसार, शंकरपल्लीच्या अतिथी ग्राउंडवर इज्तेमा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या तबलिगी इज्तेमा कार्यक्रमात लाखो मुस्लिम सहभागी झाले होते.
इतर व्हिडिओ येथे पाहता येतील.
2 जानेवारी 2025 रोजी हैदराबाद मेल वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, इज्तेमा कार्यक्रम 3 जानेवारी ते 5 जानेवारी दरम्यान शंकरपल्ली येथील अतिथी ग्राउंडवर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी चेवेल्ला पोलिस स्टेशनला देण्यात आली होती. त्यांनी याबाबत एक अधिकृत चेतावणीपत्र देखील जारी केले होते.
अधिक माहितीसाठी आम्ही हैदराबाद येथील स्थानिक पत्रकार, श्री. हर्ष यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले की, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.
शेवटी, आम्ही दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह पोस्ट शेअर करणाऱ्या वापरकर्त्याचे खाते स्कॅन केले. आम्हाला आढळले की, वापरकर्ता एका विशिष्ट विचारसरणीशी संबंधित पोस्ट शेअर करतो. या वापरकर्त्याला 21 हजार लोक फॉलो करतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात असे आढळून आले की, नमाज पठण करणाऱ्या लोकांचा व्हिडिओ हा, महाराष्ट्रातील नसून तेलंगणातील शंकरपल्ली येथील आहे. खरे पाहता, इज्तेमाचा कार्यक्रम शंकरपल्लीच्या अतिथि ग्राउंडवर आयोजित करण्यात आला होता. या व्हिडिओला आता महाराष्ट्रातील असल्याचा दावा करत शेअर केला जात आहे.
- Claim Review : महाराष्ट्रात नमाज पठण करणाऱ्या लोकांचा व्हिडिओ.
- Claimed By : FB User हिंदू युवा वाहिनी
- Fact Check : Misleading
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.
|