schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
Claim
दिवाळीच्या पहिल्या दिवशी चितळे बंधू सैनिकांना मिठाई देतात.
Fact
पुणे येथील स्नेहसेवा संस्थेच्या सैनिक स्नेह या उपक्रमातून ही मिठाई दिली जाते. पुण्याचे चितळे बंधू मिठाईवाले या उपक्रमात सुरुवातीपासून सहभागी आहेत.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी चितळे बंधू सैनिकांना मिठाई देतात. मागील २८ वर्षांपासून हा उपक्रम सुरु आहे. असा दावा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पोस्ट मध्ये @AjitKDoval_NSA या X अकाउंटचा स्क्रीनग्रॅब जोडण्यात आला आहे. “मागील २८ वर्षांपासून दिवाळीच्या पहिल्या वर्षी देशभरात कुठेही नेमल्या गेलेल्या प्रत्येक मराठा इन्फन्ट्री रेजिमेंट मधील जवानांना पुणे येथील चितळे बंधू मिठाईवाले यांच्याकडून ही भेट मिळते. याबद्दल ते कोणताही गाजावाजा करीत नाहीत. त्यांचा अभिमान वाटतो.” असा मजकूर स्क्रीनग्रॅब मध्ये इंग्रजीमध्ये वाचायला मिळतो. त्याखाली “दुपारी १ ते ४ दुकान बंद ठेवण्यावर कितीही हसा, नावे ठेवा पण त्यांची ही बाजू पहा…. मग काय ते ठरवा.” असे वाचायला मिळते. दिवाळीच्या निमित्ताने व्हायरल होणाऱ्या या पोस्टने व्हाट्सअपवर मोठे शेयर मिळविले आहेत.
Newschecker ला आमची व्हाट्सअप टिपलाइन (9999499044) वर समान दावे प्राप्त झाले असून सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
Newschecker ने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नावे ट्विट असल्याचे सांगून व्हायरल केल्या जात असलेल्या पोस्टची सत्यता तपासण्यासाठी गुगलवर सर्च केले. तसेच X वर शोधले. दरम्यान आम्हाला @AjitKDoval_NSA नावाचे कोणतेही अधिकृत खाते आढळले नाही.
यादरम्यान आम्ही अजित डोवाल यांनी चितळे बंधू यांच्या कार्यासंदर्भात कोणते ट्विट केले आहे का? याचा शोध घेतला. आम्हाला परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते अरिंदम बागची यांनी केलेले एक ट्विट निदर्शनास आले.
“अजितकुमार डोवाल यांचे ट्विटर वर कोणतेही अधिकृत अकाउंट नाही. त्यांच्या नावे असलेल्या खोट्या अकाउंट्स बाबत ही सूचना आहे.” असे त्या ट्विट मध्ये लिहिण्यात आले आहे.
यावरून अजित डोवाल यांनी पुण्याच्या चितळे बंधू मिठाईवाले यांचे कौतुक केले असे सांगून केला जाणारा दावा खोटा असल्याचे आमच्या तपासात उघड झाले.
दरम्यान आम्ही काही किवर्डसच्या मदतीने गुगल वर शोध घेतला. आम्हाला mypunepulse ने ५ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध केलेली बातमी मिळाली. यामध्ये पुण्याच्या स्नेह सेवा आणि मैत्रेय चॅरिटेबल सोसायटी तर्फे चालविल्या जाणाऱ्या सैनिकांना दिवाळीच्या निमित्ताने मिठाईचे बॉक्स वाटप करण्याच्या उपक्रमाची माहिती मिळाली.
५ नोव्हेंबर २०२३ रोजी पुणे येथील निवारा वृद्धाश्रमात हा कार्यक्रम झाला. लष्कराच्या १० बटालियन ना येथे मिठाई वितरित करण्यात आली. या उपक्रमाचे हे २८ वे वर्ष आहे. चितळे बंधू मिठाईवाले चे प्रमुख श्रीकृष्ण चितळे हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. अशी माहिती आम्हाला वाचायला मिळाली.
शोध घेताना आम्हाला याच कार्यक्रमाची The Indian Express ने ६ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध केलेली समान मजकूर असलेली बातमी वाचायला मिळाली.
या दोन्ही बातम्यांमध्ये सैनिकांना देण्यासाठीची संपूर्ण मिठाई चितळे बंधू मिठाईवाले यांनी दिल्याचे आम्हाला वाचायला मिळाले नाही.
यामुळे आम्ही बातम्यात नमूद करण्यात आलेल्या पुण्याच्या स्नेह सेवा आणि मैत्रेय चॅरिटेबल सोसायटी संदर्भात शोधले. आम्हाला snehsevamaitreya.org ही वेबसाईट मिळाली. यामध्ये संस्थेतर्फे सैनिकांना मिठाई वाटप करण्यासंदर्भातील उपक्रमाची संपूर्ण माहिती आम्हाला मिळाली.
“स्नेह सेवाने सैनिक स्नेह हा उपक्रम २८ वर्षांपूर्वी सुरु केला. दिवंगत सदस्य कर्नल डॅडी चांदवलकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरु करण्यात आला. सुरुवातीला मेसर्स चितळे बंधू मिठाईवाले, पुणे यांनी स्वेच्छेने मिठाईच्या बॉक्समध्ये दर्जेदार आणि टिकाऊ मिठाई बनविण्याच्या खर्चाच्या 50% योगदान दिले आणि उर्वरित रक्कम स्नेहसेवा सदस्यांनी दिली.” अशी माहिती यामध्ये आम्ही वाचली. यामुळे आम्हाला समजले की या उपक्रमात सुरुवातीपासून चितळे बंधू मिठाईवाले यांचे योगदान आहे. मात्र उपक्रमाचा खर्च चितळे बंधू यांच्या सहकार्याने, स्नेह सदस्यांच्या वर्गणीतून आणि इतर मदतीतून केला जात आहे.
शेवटी आम्ही यासंदर्भात स्नेह सेवाच्या अध्यक्षा डॉ. नीलिमा भडभडे यांच्याशी संपर्क साधला. “त्यांनी चितळे बंधू मिठाईवाले या उपक्रमात २८ वर्षांपासून जोडलेले आहेत. हा उपक्रम स्नेहसेवा चा आहे. मैत्रेय चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहयोगाने हा उपक्रम राबविला जातो. यासंदर्भात अजित डोवाल यांनी ट्विट केले हे खोटे आहे. स्नेहसेवाचे सदस्य देणग्या जमविणे, सर्व संपर्क आणि नियोजनाच्या जबाबदाऱ्या पार पाडतात. शाळेच्या मुलांनी बनविलेली ग्रीटिंग कार्ड्स सुद्धा जमा करून या मिठाईसोबत पाठविल्या जातात. चितळे बंधू मिठाईवाले यांची गणना अधिकृतरीत्या सह प्रायोजक म्हणून आम्ही केलेली आहे.” असे त्यांनी सांगितले.
मिठाईच्या बॉक्ससाठी वापरले जाणारे पॅकेट वरील फोटोप्रमाणे असते. अशी माहितीही त्यांनी दिली.
अशाप्रकारे आमच्या तपासात हा दावा चुकीचा संदर्भ देऊन केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे येथील स्नेहसेवा संस्थेच्या सैनिक स्नेह या उपक्रमातून ही मिठाई दिली जाते. पुण्याचे चितळे बंधू मिठाईवाले या उपक्रमात सुरुवातीपासून सहभागी आहेत. तसेच राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोवाल यांनी ट्विट केल्याचा दावा खोटा आहे.
Our Sources
Tweet published by Arindam Bagachi on November 8, 2021
News published by My Pune Pulse on November 5, 2023
News published by The Indian Express on November 6, 2023
Official website of snehsevamaitreya.org
Conversation with Dr. Nilima Bhadbhade, President Sneh Seva
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in
फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad Prabhu
January 31, 2025
Komal Singh
September 6, 2024
Vasudha Beri
May 28, 2024
|