schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर इंग्रजी साठी वसुधा बेरी यांनी केले आहे.)
गायक उदित नारायण यांच्या निधनाच्या अफवेने इंटरनेटवर तुफान चर्चा केल्यानंतर सोशल मीडिया वापरकर्ते आश्चर्यचकित झाले, ज्यामुळे ‘सेलिब्रेटी डेथ होक्स’ला बळी पडणारे एक नवे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची प्रसिद्धी झाली आहे.
“प्रसिद्ध गायक उदित नारायण आता नाहीत”, “उदित नारायण यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, “RIP उदित नारायण” अशा मथळ्यांसह ही अफवा फेसबुकवर मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आली.
अशा पोस्ट्सच्या लिंक्स इथे पाहायला मिळू शकतात.
“उदित नारायण यांच्या मृत्यूची बातमी” YouTube वर देखील पोहोचली आहे.
अशा YouTube व्हिडिओंच्या लिंक्स इथे आणि इथे पाहायला मिळू शकतात.
‘ए अजनबी,’ ‘पहेला नशा’ पासून ‘ओ रे चोरी’ पर्यंत, उदित नारायण यांच्याकडे हिट गाण्यांची एक लांबलचक यादी आहे आणि त्यांनी विविध कलाकारांना आवाज दिला आहे. बॉलीवूडच्या हिट गाण्यांव्यतिरिक्त, उदित यांनी अनेक प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गायिली असून ते आपल्या गोड गळ्यासाठी ओळखले जातात . 2016 मध्ये, नारायण यांना संगीत जगतातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आम्ही Google वर “उदित नारायण,” “हृदयविकाराचा झटका,” आणि “मृत्यू” साठी कीवर्ड शोध घेतला, परंतु त्यांच्या निधनाची पुष्टी करणारे विश्वसनीय वृत्तसंस्थांकडून कोणतेही रिपोर्ट आले नाहीत. यानंतर, आम्ही गायकाची सोशल मीडिया खाती पाहिली ज्यात त्यांच्या आजाराची किंवा कथित मृत्यूबद्दल कोणतीही माहिती नव्हती. उल्लेखनीय म्हणजे, त्यांच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम खात्यावरील सर्वात अलीकडील पोस्ट 2 सप्टेंबर 2022 च्या होत्या.
पुढे, आम्ही उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण याच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून स्कॅन केले ज्याने त्याच्या वडिलांच्या संबंधातील अफवा फेटाळून लावणारी पोस्ट केली गेली आहे . उदित नारायणच्या कथित मृत्यूबद्दल दोन पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले, “LOL ते ठीक आहेत. मात्र काही पत्रकार नाहीत”
पुढे, आम्हाला 6 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध झालेले अनेक मीडिया रिपोर्ट्स आढळले.ज्यात गायकाच्या मृत्यूबद्दल पसरलेल्या अफवांवर नारायण यांच्याच व्यवस्थापकाचे विधान होते. नारायण यांना हृदयविकाराचा झटका आला नाही आणि त्यांची प्रकृती ठीक आहे, असेही व्यवस्थापकाने स्पष्ट केले. अहवाल येथे, येथे, येथे आणि येथे पाहिले जाऊ शकतात.
याव्यतिरिक्त, 6 ऑक्टोबर 2022 रोजीच्या आज तकच्या रिपोर्ट मध्ये , उदित नारायण यांनी स्वतःला हृदयविकाराचा झटका आल्याच्या अफवांचे स्वतः खंडन केले. गायकाने विचारले की त्याच्यासारख्या व्यक्तीला, जो खूप हसतो, त्याला हृदयविकाराचा झटका कसा येऊ शकतो.
स्वतः उदित नारायण, त्यांचा मुलगा आणि व्यवस्थापकाने स्पष्ट केल्याप्रमाणे, प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचा दावा करणाऱ्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्ट खोट्या आहेत.
Facebook Story By Aditya Narayan, Dated October 6, 2022
Report By Aaj Tak, Dated October 6, 2022
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
|