schema:text
| - Copyright © 2022 NC Media Pvt. Ltd. All Rights Reserved.
Marathi
योगी आदित्यनाथ यांनी राष्ट्रशुद्धीसाठी होम हवन केले ? व्हायरल झाला फोटो
Written By Yash Kshirsagar
Dec 31, 2019
Claim–
उत्तर प्रदेशचे मुख्यंत्री योगी आदित्यनाथ यांनी राष्ट्राच्या शुद्धी करता होम हवन केले.
राष्ट्र शुद्धि यज्ञ करते हुए हिन्दू राजा…… pic.twitter.com/Gjhe2kwcYF
— Shailen Pratap शैलेन्द्र (@shailen_pratap) December 31, 2019
Verification–
Shailen Pratap शैलेन्द्र नावाच्या ट्विटर हॅंडलवर योगी आदित्यनाथ यांचा होम हवन करतानाचा फोटो शेअर करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की योगी आदित्यनाथ यांनी राष्ट्रशुद्धीसाठी होम हवन केले.
आम्ही व्हायरल दाव्याचे सत्य पडताळून पाहण्याचे ठरविले. यासाठी गूगलमध्ये काही कीवर्ड्सचा आधार घेऊन शोध घेतला असता अशा प्रकारची कोणतीही बातमी आढळून आली नाही. त्यामुळे आम्ही गूगल रिव्हर्स इमेज आणि याडेंक्स इमेजच्या मदतीने व्हायरल फोटोचा शोध घेतला असता आम्हाला याबाबतच्या अनेक बातम्या आढळून आल्या.
याबाबत आम्हाला टाइम्स नाऊ या हिंदी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर बातमी आढळली ही बातमी एप्रिल महिन्यातील असून यात म्हटले आहे की योगी आदित्यनाथ यांनी रामनवमी दरम्यान अष्टमीच्या दिवशी विधीपूर्वक कन्यापूजन केले आणि होम हवनही केले. तसेच त्यांनी आपल्या हातांनी भोजन देखील वाढले.
इतर माध्यमांतही ही बातमी प्रसिद्ध झाली होती. यावरुन हेच स्पष्ट होते की एनआरसी आणि सीएए च्या चर्चा देशात चालू असताना योगी आदित्यनाथ यांनी राष्ट्रशुद्धीसाठी होम हवन केलेले नाही. त्यांच्या जुना फोटो खोट्या दाव्यानिशी व्हायरल करण्यात आला आहे.
Tools Used
Google Reverse Image Search
Twitter Advanced Search
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा 9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Related articles
Coronavirus
या शवपेट्या इटलीमध्ये कोरोना विषाणुच्या संक्रमणाने मृत्यू झालेल्या लोकांच्या नाहीत, वाचा सत्य
Newschecker Team
March 25, 2020
Marathi
हा फोटो इंडोनेशिया किंवा रवांडामधील लाॅकडाऊन दरम्यानचा नाही, जाणून घ्या सत्य
Newschecker Team
April 23, 2020
Fact Check
अहमदाबादमध्ये फळविक्रेत्यांच्या हातगाड्या जेसीबी मशीनने मोडण्यात आल्या नाहीत, व्हायरल झाला खोटा दावा
Newschecker Team
February 14, 2020
|