About: http://data.cimple.eu/claim-review/1ec0adade045b708ab03b64c9f25564d1ad5a2982b3d5993688765ed     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Authors Claim सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना आलेली पहिल्या इन्स्टोलमेंटची पुण्यात जप्त केलेली रक्कम. Fact संबंधित व्हिडीओ इंटरनेटवर 2021 पासून उपलब्ध असून पुण्यात जप्त करण्यात आलेल्या रक्कमेशी संबंधित नाही. महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी पुण्यात कोट्यवधींची रक्कम जप्त करण्यात आल्याच्या घटनेला जोडून एक व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. फेसबुकवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत पेजवरून हा व्हिडीओ पोस्ट केला. त्यांच्याबरोबरीनेच असंख्य फेसबुक युजर्सनी हा व्हिडीओ पोस्ट केल्याचे पाहावयास मिळाले. रोहित पवार यांनी आपल्या व्हेरीफाईड X खात्यावरून हा व्हिडीओ शेअर केला असून कॅप्शनमध्ये पुढीलप्रमाणे म्हटले आहे. “सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून 25- 25 कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून काल यातलीच एक गाडी खेड-शिवापूर च्या #डोंगार_झाडीमध्ये पकडली गेली. एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत? लोकसभेलाही सत्ताधाऱ्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून महाराष्ट्राच्या जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु इथल्या स्वाभिमानी जनतेने महायुतीला कात्रजचा घाट दाखवला. विधानसभेलाही #दलालीतून आलेल्या पैशाच्या जोरावर रात्रीस खेळ करण्याचा महायुतीचा कानमंत्र असला तरी, महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्या खोकेबाजांना इथली जनता ok करुन डोंगर दऱ्या बघण्यासाठी पर्मनंट घरी पाठवणार, हे नक्की आहे. कारण ‘महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं!” दाव्यांचे संग्रहण येथे आणि येथे पाहता येईल. संबंधित घटनेला जोडून इतर भाषांमध्येही असेच दावे झाल्याचे येथे, येथे आणि येथे पाहता येईल. Fact Check/ Verification गुगलवर “5 कोटी” आणि “शिवसेना” या कीवर्डच्या शोधात टाइम्स ऑफ इंडियाचा 23 ऑक्टोबर 2024 रोजीचा रिपोर्ट सापडला, ज्यामध्ये पुणे ग्रामीण पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी पुणे-बेंगळुरू महामार्गावरील खेड-शिवापूर टोलनाक्यावर कारमधून ₹5 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. अशी माहिती मिळाली. शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पाटील यांनी हे पैसे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे सांगोलाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्याकडे निवडणूक निधीच्या उद्देशाने नेले जात असल्याचा आरोप केला आहे. पाटील यांनी मात्र असे आरोप फेटाळले आहेत. “हे वाहन त्यांच्या हजारो “कार्यकर्त्यां”पैकी एकाचे असल्याचे सांगितले आहे. “…त्याचे काही व्यवसाय आहेत, तरीही मला माहित नाही की रोख रक्कम का आणि कुठे नेली जात होती,” असे आमदार पाटील यांनी सांगितल्याचे रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. पण तो व्हिडीओ 2024 च्या महाराष्ट्र निवडणुकांपूर्वी जप्त केलेले पैसे दाखवतो का? आम्ही गुगल लेन्सवर व्हायरल फुटेजच्या मुख्य फ्रेम्स पाहिल्या, ज्यात @haryana.zone ची 9 ऑक्टोबर 2024 रोजीची एक Instagram पोस्ट मिळाली. त्यात तोच व्हिडिओ आहे, ज्यामुळे सिद्ध होते की तो व्हिडीओ 21 ऑक्टोबरच्या पोलिस कारवाईच्या अगोदरचा आहे. अर्थात खेड-शिवापूर टोलनाक्यावरील गाडीतून जप्त केलेली रक्कम दाखवत नाही. डिसेंबर 2023 मधील आणखी एका इंस्टाग्राम पोस्टमध्येही हाच व्हिडिओ आहे. 10 जून 2021 रोजी @ghanshyamponderarussian8596 या दुसऱ्या हँडलने YouTube वर देखील हा व्हिडिओ शेअर केला होता. जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेचा आमदार शहाजी बापू पाटील यांच्याशी संबंध आहे की नाही याची पडताळणी न्यूजचेकर स्वतंत्रपणे करू शकले नाही. तथापि, व्हायरल फुटेज किमान 2021 पासून ऑनलाइन उपलब्ध आहे, आणि मतदानाला सामोरे जात असलेल्या महाराष्ट्रात एका कारमधून जप्त केलेली रक्कम दाखवीत नाही. हे स्पष्ट झाले आहे. Conclusion अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात व्हायरल व्हिडीओ महाराष्ट्रात जप्त करण्यात आलेल्या रक्कमेशी चुकीच्या पद्धतीने जोडून शेयर केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. Result: Partly False Sources Instagram Post By @haryana.zone, Dated October 9, 2024 Instagram Post By @all_colour_prediction, Dated December 7, 2023 YouTube Video By @ghanshyamponderarussian8596, Dated June 10, 2021 (हे आर्टिकल न्यूजचेकर इंग्रजीसाठी वसुधा बेरी यांनीही केले असून ते इथे वाचता येईल.) कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • Hindi
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.115 as of Oct 09 2023


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data] Valid XHTML + RDFa
OpenLink Virtuoso version 07.20.3238 as of Jul 16 2024, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 2 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2025 OpenLink Software