About: http://data.cimple.eu/claim-review/240d58194b0209c2dd3e7281745fc7d47f8f104fb3cf75cdbf08ffa1     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Fact Check Fact Check: फोटोत सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत गजानन महाराज आहेत? जाणून घ्या सत्य काय आहे Claim सुभाषचंद्र बोस आणि गजानन महाराज यांची भेट दर्शविणारा हा फोटो आहे. Fact व्हायरल दावा खोटा आहे. फोटोत सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत पुरीचे शंकराचार्य आहेत. गजानन महाराज नाहीत. सुभाषचंद्र बोस आणि शेगावचे गजानन महाराज एका फोटोमध्ये दिसत आहेत. असा दावा एक फोटो शेयर करून केला जात आहे. श्री संत गजाजन महाराज सोबत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे शेगाव येथील अतिशय दुर्मिळ फोटो, हा फोटो अकोला येथे महाराज येत असत तेंव्हा त्यांचे परमभक्त रामदासपेठ येथील पसारकर स्टुडिओ यांचे घरी काढला आहे … अजूनही त्याची Negative त्यांनी जपून ठेवली आहे. गजानन माऊलींचा ओरिजनल फोटो जमेल तेवढा शेयर करा..”गण गण गणात बोते” असे हा दावा सांगतो. फोटोमध्ये तीन व्यक्ती दिसतात. सुभाषचंद्र बोस हे बसलेले असून काहीतरी लिहीत आहेत. त्यांच्या बाजुला एक व्यक्ती उभी आहे, तर आणखी एक व्यक्ती बसलेली असून तिने अंगावर कोणताही पेहराव घातलेला नाही. फेसबुकच्या बरोबरीने X (पूर्वीचे ट्विटर) वर देखील अनेक युजर्सनी समान दावे केल्याचे आमच्या निदर्शनास आले. Newschecker ला आमची व्हाट्सअप टिपलाइन (9999499044) वर समान दावे प्राप्त झाले असून सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे. Fact Check/Verification Newschecker ने व्हायरल दाव्याची सत्यता तपासण्याचा निर्णय घेतला. आम्ही व्हायरल फोटोवर Google रिव्हर्स इमेज सर्च केला असता, आम्हाला @RareHistorical या X (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर ५ एप्रिल २०१६ रोजी पोस्ट केलेला समान फोटो पाहायला मिळाला. मात्र त्याची कॅप्शन वेगळी होती. “Netaji Subhas Chandra Bose with Shankaracharya of Puri-Orissa.” अर्थात “नेताजी सुभाषचंद्र बोस पुरी- ओरिसाच्या शंकराचार्यांसोबत” अशी कॅप्शन आम्ही वाचली. इतिहासाशी संबंधित पोस्ट घालणाऱ्या या अकाऊंटच्या आपल्या बायोमध्ये “Tweets on #IndianHistory #IndianMap #IndusValleyCivilization #IndianCurrency #NetaJiFiles #IndoPakWar1971 #HinduismAbroad.” अशी ओळख लिहिली असून अशा अनेक पोस्ट आम्हाला तेथे पाहायला मिळाल्या. हाच सुगावा घेऊन आम्ही आणखी शोध घेतला असता, आम्हाला याच विषयावरील काँग्रेस पक्षाच्या X (पूर्वीचे ट्विटर) अधिकृत खात्यावरून २२ जानेवारी २०१७ रोजी केलेल्या ट्विटकडे नेले. या ट्विटमध्येही “नेताजी सुभाषचंद्र बोस पुरी- ओरिसाच्या शंकराचार्यांसोबत” अशीच कॅप्शन आम्हाला वाचायला मिळाली. यावरून छायाचित्रात दिसणारी व्यक्ती शेगावचे गजानन महाराज नाहीत. ही माहिती आम्हाला समजली. आम्ही गजानन महाराज यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांच्या सुभाषचंद्र बोस यांच्या भेटीसंदर्भात काही तपशील मिळतात का? हे पाहण्याचा प्रयत्न केला. आम्हाला www.gajananmaharaj.org या श्री गजानन महाराज संस्थानच्या वेबसाइटवर बरीच माहिती मिळाली. या माहितीत आम्हाला सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या भेटीचा उल्लेख आढळला नाही. शिवाय महाराजांनी ८ सप्टेंबर १९१० रोजी शेगावातच समाधी घेतल्याचे वाचायला मिळाले. आम्ही गुगलवर सुभाषचंद्र बोस यांची जन्मतारीख शोधली, ती २३ जानेवारी १८९७ असल्याचे आम्हाला समजले. २३ जानेवारी १८९७ ही सुभाषचंद्र बोस यांची जन्मतारीख असून ८ सप्टेंबर १९१० रोजी गजानन महाराजांनी समाधी घेतली तेंव्हा सुभाषचंद्र बोस हे केवळ १३ वर्षांचे होते. हे आमच्या तपासात स्पष्ट झाले. व्हायरल फोटोत सुभाषचंद्र बोस यांचे वय जास्त आहे. त्यामुळे व्हायरल फोटोतील दावा खोटा असल्याचे स्पष्ट होते. Conclusion अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात व्हायरल फोटोमध्ये सुभाषचंद्र बोस आणि शेगावचे गजानन महाराज यांच्या भेटीचा पुरावा म्हणून केला जाणारा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे. Result: False Our Sources Tweet made by @RareHistorical on April 5, 2016 Tweet made by @INCIndia on January 22, 2017 Analysis of www.gajananmaharaj.org Google Search कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • Hindi
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.115 as of Oct 09 2023


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data] Valid XHTML + RDFa
OpenLink Virtuoso version 07.20.3238 as of Jul 16 2024, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 5 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2025 OpenLink Software