About: http://data.cimple.eu/claim-review/24be7f092fbf09fae2016dfe550597cb4879bac35803d86d09c1ed48     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Authors Claim एका महिलेने आपल्या सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून खून करणाऱ्या व्यक्तीला कोर्टरूममध्ये गोळ्या घालून ठार मारले त्याचे व्हिडीओ फुटेज. Fact क्लिप 1981 च्या वास्तविक घटनेवर आधारित 1984 च्या जर्मन चित्रपटातील आहे. मारियान बाचमेयरने तिच्या सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्येचा खटला असलेल्या क्लाऊस ग्रॅबोव्स्कीला गोळ्या घालून ठार मारले होते. एक 22 सेकंदांचा व्हिडीओ व्हायरल आहे. एक महिला कोर्टरूमममध्ये शिरते आणि अनेकदा गोळीबार करते असे व्हिडिओत दिसते. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये दावा केला जात आहे की, जर्मन महिला मारियान बाचमीयर तिच्या मुलीचा बलात्कार करणाऱ्याला गोळ्या घालून ठार मारत आहे. 8 ऑगस्टच्या रात्री कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या भीषण बलात्कार-हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अनेक सोशल मीडिया युजर्सद्वारे व्हायरल व्हिडिओ शेअर केला जात आहे, ज्यामध्ये बलात्काराच्या प्रकरणातील दोषीचे असेच झाले पाहिजे, पीडितांना वेळेत न्याय मिळावा यासाठी कारवाई केली पाहिजे, असेही लिहिले जात आहे. Fact Check/ Verification न्यूजचेकरने व्हिडिओच्या कीफ्रेमची रिव्हर्स इमेज सर्च केला, ज्यामुळे आम्हाला 17 ऑक्टोबर 2014 रोजी यूट्यूबवर अपलोड केलेल्या या जर्मन चित्रपटाकडे नेले. ज्याचे शोर्षक “The Marianne Bachmeier Case: No Time For Tears” असे आहे. व्हिडिओच्या 01:19:30 वेळेपासून सुरू होणारा भाग व्हायरल क्लिपसारखाच आहे. पार्श्वभूमीतील पुरुष आणि बलात्कारकर्त्याला गोळी मारल्यानंतर महिलेला धरून ठेवलेले दोन पुरुष विचारात घेतल्यास, व्हायरल व्हिडिओ चित्रपटातील असल्याचे सिद्ध होते. आणखी एका शोधामुळे आम्हाला 27 डिसेंबर 2022 रोजी Youtube वर अपलोड करण्यात आलेल्या व्हायरल व्हिडिओकडे नेले. “द मारियान बॅचमियर केस: नो टाइम फॉर टीयर्स मूव्ही” या कीवर्डच्या शोधामुळे, यूट्यूब व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे, हार्क बोहम दिग्दर्शित “नो टाईम फॉर टीयर्स: द बॅचमियर केस” नावाच्या 1984 च्या चित्रपटासाठी या IMDb एंट्रीकडे नेले. व्हिडिओ शेअर करत असलेले ट्विट, 1980 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात पश्चिम जर्मनीतील मेरी बाचमेयर प्रकरणाविषयीच्या डॉक्यु-ड्रामामधील एक दृश्य असल्याची पुष्टी करते. मारियान बाचमियर केस आम्हाला कळले की मारियान बाचमीयर या पश्चिम जर्मन महिलेने 1981 मध्ये आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळवली होती जेव्हा तिने 35 वर्षीय कसाई आणि तिच्या सात वर्षांच्या मुलीच्या बलात्कार आणि हत्येसाठी खटला चालू असलेल्या क्लॉस ग्रॅबोव्स्की या दोषी लैंगिक गुन्हेगाराची गोळ्या घालून हत्या केली होती. कोर्टरूममध्ये तिच्या कृतीने व्यापक मीडिया कव्हरेज आणि सार्वजनिक चर्चेला सुरुवात केली. “6 मार्च 1981 रोजी, ग्रॅबोव्स्कीच्या खटल्याच्या तिसऱ्या दिवशी आणि सकाळी 10 च्या सुमारास, मारियाने ल्युबेक जिल्हा न्यायालयाच्या कोर्टरूममध्ये बेरेटा 70 पिस्तूलची तस्करी केली. त्यानंतर तिने आपल्या मुलीचा मारेकरी ग्रॅबोव्स्की याच्या पाठीत गोळ्या झाडल्या. बॅचमियरने ग्रॅबोव्स्कीच्या पाठीवर बंदूक रोखली आणि सात वेळा गोळीबार केला आणि तो जागीच मारला गेला. त्यानंतर तिने तिची बंदूक खाली केली आणि प्रतिकार केला नाही, त्यानंतर तिला पकडण्यात आले,” सनचा 17 ऑगस्ट 2023 रोजीचा रिपोर्ट सांगतो. Conclusion आईने आपल्या मुलीच्या बलात्कारकर्त्याला कोर्टात गोळ्या घालून ठार मारल्याचा दावा करणारा व्हायरल व्हिडिओ 1984 च्या जर्मन चित्रपटातील आहे, खरे फुटेज नाही. Result: Missing Context Sources Youtube video, October 17, 2014 IMDb page The Sun report, August 17, 2023 (हे आर्टिकल न्यूजचेकर इंग्रजीसाठी कुशल एच. एम. यांनी केले असून ते इथे वाचता येईल.) कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • Hindi
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.115 as of Oct 09 2023


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data] Valid XHTML + RDFa
OpenLink Virtuoso version 07.20.3238 as of Jul 16 2024, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 5 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2025 OpenLink Software