About: http://data.cimple.eu/claim-review/27445a6390b893254f7bff5683024bdccfebf6ee926fb31c89f9560b     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Fact Check: अमित शाह आणि ओवैसी चे हे छायाचित्र खोटे, आधी देखील व्हायरल झाले होते एडिटेड छायाचित्र विश्वास न्यूज च्या तपासात गृह मंत्री अमित शाह आणि ओवैसी यांचे व्हायरल चित्र खोटे असल्याचे समोर आले. दोन वेग वेगळ्या चित्रांना एडिट करू व्हायरल छायाचित्र बनवण्यात आले आहे. - By: Ashish Maharishi - Published: Jul 20, 2021 at 09:50 PM विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर एक छायाचित्र परत एकदा व्हायरल होत आहे, ज्यात गृह मंत्री अमित शाह आणि असदुद्दीन ओवैसी दिसतात. असे सांगण्यात येत आहे कि हा त्यांच्या भेटीही फोटो आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हे कळले कि व्हायरल छायाचित्र एडिटेड आहे. दोन चित्र मिळवून हे बनवले गेले आहे. आमच्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समोर आले. हेच एडिटेड चित्र बंगाल निवडणुकांच्या वेळी देखील व्हायरल झाले होते. काय होत आहे व्हायरल? फेसबुक यूजर शानू खान ने १६ जुलै रोजी ‘M.Abdullah Azam khan Youth Brigade (Lucknow)’ नावाच्या एका ग्रुप मध्ये हे छायाचित्र शेअर केले आणि लिहले: उत्तर प्रदेश चुनाव पर रणनीति बनाते हुए असदुद्दीन ओवैसी साहब और गृह मंत्री अमित शाह जी लेकिन अब जनता सब समझ चुकी है साहब हम हिंदू मुस्लिम की राजनीति नहीं अब विकास के मुद्दे पर बात होगी! या फेसबुक पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा. तपास; विश्वास न्यूज च्या तपासात आधी देखील आम्ही या छायाचित्राचा तपास केला होता. तरी आम्ही सगळ्यात आधी गूगल सर्च ची मदत घेतली. आम्ही गृह मंत्री आणि ओवैसी यांच्या भेटीची कुठली बातमी मिळते का हे शोधण्यास सुरु केले. आम्हाला अशी कुठलीच बातमी आणि छायाचित्र मिळाले नाही जे व्हायरल छायाचित्र खरे असल्याचे सिद्ध करेल. त्यानंतर आम्ही गूगल रिव्हर्स इमेज टूल ची मदत घेतली. सुरुवातीला आम्हाला तपासादरम्यान, अमित शाह आणि पंजाब चे मुख्यमंत्री कैप्टन अमरिंदर सिंह यांचे एक छायाचित्र मिळाले. हे तेच छायाचित्र होते ज्याला एडिट करून, ओविसी च्या चित्रासोबत जोडण्यात आले होते. आम्हाला कैप्टन अमरिंदर सिंह यांच्या वेरिफाइड ट्विटर अकाउंट वर ओरिजिनल छायाचित्र ३ सप्टेंबर २०१९ रोजी शेअर केले असल्याचे दिसले. तपासादरम्यान आम्हाला ओवैसी यांचे देखील खरे छायाचित्र मिळाले. याला ट्विटर यूजर सैय्यद सुलेमान ने 27 फरवरी 2018 पोस्ट केले होते. सोबतच लिहले होते, कि AIMIM प्रेसिडेंट असदुद्दीन ओवैसी आणि अकबरुद्दीन ओवैसी यांनी अरविंद कुमार (IAS) आणि जीएचएमसी चे कमिश्नर यांना नवीन ब्रिज च्या बांधकामासंदर्भात भेटून एक मेमोरँडम सोपवले. यात ओवैसी ने तेच कपडे घातले आहेत जे व्हायरल छायाचित्रात दिसतात. तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने युपी चे भाजपा प्रवक्ता राकेश त्रिपाठी यांना संपर्क केला आणि त्यांच्यासोबत व्हायरल चित्र शेअर केले. त्यांनी आम्हाला सांगितले कि काही लोकं युपी मध्ये निवडणुकांच्या आधीच, खोटे चित्र आणि व्हिडिओ शेअर करत आहेत, आणि लोकांची दिशाभूल करत आहेत. हे काही पॉलिटिकेलल्य मोतीवाटेड लोकं आहेत जे यु[पी च्या नावे अश्या खोट्या घटना पसरवत आहेत. विश्वास न्यूज ने बंगाल निवडणुकांच्या वेळी देखील या छायाचित्राचा तपास केला होता. हा तपास इथे वाचा. विश्वास न्यूज ने हे चित्र शेअर करणाऱ्या फेसबुक यूजर चा तपास केला. त्यात आम्हाला कळले कि फेसबुक यूजर शानू खान चे 125 फॉलोअर आहे आणि यूजर युपी च्या रामपूर चा रहिवासी आहे. निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात गृह मंत्री अमित शाह आणि ओवैसी यांचे व्हायरल चित्र खोटे असल्याचे समोर आले. दोन वेग वेगळ्या चित्रांना एडिट करू व्हायरल छायाचित्र बनवण्यात आले आहे. - Claim Review : अमित शाह आणि ओवैसी चे छायाचित्र - Claimed By : फेसबुक यूजर शानू खान - Fact Check : False Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know! Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • English
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.123 as of May 22 2025


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data]
OpenLink Virtuoso version 07.20.3241 as of May 22 2025, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 8 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2026 OpenLink Software