About: http://data.cimple.eu/claim-review/29a7febec616e7d78ed3adb52551786c2bd5f15e8d62ff17a2170673     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Authors Claim ‘जय श्री राम’ वर बंदी घालण्याचे आवाहन मुस्लिम धर्मगुरू करीत आहे. Fact राजकीय भाष्य करणाऱ्या चॅनेलने उपहासात्मकरीत्या बनविलेला व्हिडीओ खरा म्हणून शेयर केला जात आहे. ‘जय श्री राम’ वर बंदी घालण्याचे आवाहन मुस्लिम धर्मगुरू करीत आहे असा दावा करणारा एक मुलाखतवजा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे. दावा केला जात आहे की, “हा धक्कादायक व्हिडीओ दोनदा पहा, कृपया तुमच्या सर्व संपर्कांशी शेअर करा, जेणेकरून उशीर होण्यापूर्वी लोकांना सत्य कळेल. कृपया आमच्या सर्व हिंदू मित्रांना शेअर करा.” दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल. न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, एक महिला एका व्यक्तीची मुलाखत घेत आहे. त्यामध्ये उपस्थित व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये गुंड-राजकारणी अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांच्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या हत्येनंतर राजीनामा देण्यास सांगत आहे. तो पुढे “जय श्री राम” या घोषणेवर बंदी घालण्यास सांगतो. Fact Check/ Verification व्हायरल दाव्याच्या पडताळणीसाठी आम्ही सर्वप्रथम ‘जय श्रीराम बंदीची मागणी मुस्लिम धर्मगुरू’ या कीवर्डच्या माध्यमातुन Google वर शोध घेतला. मात्र आम्हाला अशी मागणी कोणी केली असल्याची अधिकृत माहिती किंवा मीडिया रिपोर्ट मिळाले नाहीत. पुढील शोधासाठी आम्ही व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स काढून त्यावर रिव्हर्स इमेज सर्च घेतला. आम्हाला FACE TO FACE या युट्युब चॅनेलने 21 एप्रिल 2023 रोजी प्रीमियर केलेल्या या व्हिडिओची दीर्घ आवृत्ती सापडली. यामध्ये व्हायरल व्हिडिओचा भागही पाहायला मिळतो. “Exclusive : Interview with Kambakht-tuddin Nuowaisi | Face to Face” असे या व्हिडीओचे शीर्षक आम्हाला वाचायला मिळाले. असदुद्दीन ओवेसी असे नाव आम्ही ऐकले आहे त्याचा ‘कम्बख्त उद्दीन नोवैसी’ असा करण्यात आलेला उल्लेख. मोदींच्या राजीनाम्याची मागणी आणि इतर सर्वप्रकार नेमका काय आहे? हे पाहण्यासाठी आम्ही संबंधित चॅनेलची माहिती शोधली. चॅनेलचे नाव FACE TO FACE असे असले तरी त्याचा मूळ अड्रेस @RizwanAhmedAdv असा असल्याचे आमच्या निदर्शनास आले. आम्ही चॅनेलची माहिती शोधली. “फेस टू फेस हा वकील डॉ. सय्यद रिजवान अहमद आणि स्नॅप वेव्ह प्रॉडक्शन यांचा देशाभोवती घडणाऱ्या घटनांचे निष्पक्ष विश्लेषण करण्यासाठी फ्रीलान्स पत्रकारिता आणि बातम्यांचे विश्लेषण करण्यासाठी युट्युब चॅनेल आणण्याचा प्रयत्न आहे. डॉ. सय्यद रिजवान अहमद हे एक सामाजिक-धार्मिक-कायदेशीर-राजकीय_समालोचक आहेत जे त्यांच्या स्पष्ट, धाडसी, राष्ट्रवादी विचारांसाठी ओळखले जातात.” अशी माहिती आम्हाला मिळाली. तसेच या चॅनेलवर राष्ट्रवादावर आधारित असे अनेक व्हिडीओ घालण्यात आले असल्याचेही आम्हाला दिसून आले. व्हिडिओच्या हेडिंगवरून असे दिसून येते की यात ओवेसीची नक्कल करण्यात आली आहे. हा उपहासात्मक व्हिडिओ आहे आणि प्रत्यक्ष मुलाखत नाही. व्हिडिओचा फक्त एक मिनिटाचा भाग क्लिप केला गेला आहे आणि खोट्या दाव्यासह शेअर केला गेला आहे. डॉ. सय्यद रिजवान अहमद यांनी याच चॅनेलवर 28 नोव्हेंबर 2021 रोजी अपलोड केलेला असदुद्दीन यांची माफी मागण्याचा उपहासात्मक व्हिडीओ आम्हाला पाहता येईल. यावरून व्हायरल व्हिडिओतील व्यक्ती डॉ. सय्यद रिजवान अहमद असल्याचे स्पष्ट होते. AIMIM अध्यक्ष ओवेसी यांनी 16 एप्रिल 2023 रोजी उत्तर प्रदेशातील सत्ताधारी भाजपवर अतिक अहमद आणि त्यांचा भाऊ अश्रफ यांच्या हत्येवरून हल्ला चढवला होता आणि या घटनेबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची आणि या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी होण्याची मागणी केली होती. यासंदर्भातील मीडिया रिपोर्ट्स येथे , येथे आणि येथे पाहता येतील. यानंतर अपलोड करण्यात आलेला मुलाखतवजा व्हिडिओ हा यावर एक फिरकी आहे आणि व्हायरल व्हिडिओमध्ये ओवेसीची तोतयागिरी करणाऱ्या डॉ. सय्यद रिजवान अहमद यांच्या प्रक्षोभक विधानांसह उपहासात्मक आहे. Conclusion अशाप्रकारे आमच्या तपासात ‘जय श्री राम’ वर बंदी घालण्याचे आवाहन मुस्लिम धर्मगुरू करीत आहे, असा दावा उपहासात्मक असल्याचे स्पष्ट झाले आहे. Result: Satire Our Sources Google Search Video uploaded by You tube channel Face to Face on April 21, 2023 Video uploaded by You tube channel Face to Face on November 18, 2021 News published by NDTV on April 16, 2023 कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • Hindi
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.115 as of Oct 09 2023


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data] Valid XHTML + RDFa
OpenLink Virtuoso version 07.20.3238 as of Jul 16 2024, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 5 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2025 OpenLink Software