About: http://data.cimple.eu/claim-review/315bfa011ea36263d61bcac8940f7a71214eeec0aa19dbb5f1b1ed1c     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Fact Check: संघ मुख्यालयाबाहेर शेतकऱ्यांनी नाही, यूथ काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी प्रदर्शन केले विश्वास न्यूज च्या तपासात, शेतकऱयांच्या नावावर व्हायरल होत असलेली पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे समजले. व्हिडिओ मध्ये ज्यांना शेतकरी सांगण्यात येत आहे, ते यूथ काँग्रेस चे कार्यकर्ते आहेत. - By: Ashish Maharishi - Published: Jan 23, 2021 at 12:13 AM नवी दिल्ली (विश्वास न्यूज): दिल्ली मध्ये सध्या शेतकरी आंदोलन सुरूच आहे, या मध्ये सोशल मीडिया वर बरेच व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अश्याच एका व्हिडिओ मध्ये काही लोकांनी बाईक वर रॅली काढल्याचे दिसते, त्यात ते थाळ्या वाजवताना दिसतात. यूजर्स दावा करत आहेत कि हे शेतकरी आहे, ज्यांनी संघ मुख्यालयाबाहेर निदर्शने केली. आणि हा व्हिडिओ त्या घटनेचा आहे. विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला. त्यात आम्हाला कळले कि व्हायरल व्हिडिओ मध्ये दिसत असलेले लोकं हे शेतकरी नसून, यूथ काँग्रेस चे कार्यकर्ते आहेत. त्यांनी १२ जानेवारी देशभरात अश्या प्रकार च्या रॅली चे आयोजन केले होते. व्हायरल व्हिडिओ नागपूर चा असल्याचे आम्हाला कळले. आमच्या तपासात व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे समजले. काय होत आहे व्हायरल? फेसबुक यूजर बैजू यादव ने १८ जानेवारी रोजी एक व्हिडिओ अपलोड केला आणि लिहले, “अचानक RSS मुख्यालय पर किसानों ने धावा बोल दिया फिर हो गया बवाल !!“ या फेसबुक पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा. तपास: विश्वास न्यूज ने व्हायरल व्हिडिओ चे निरीक्षण केले. त्यात आम्हाला बऱ्याच ठिकाणी युवा काँग्रेस चे झेंडे दिसले. या शिवाय आम्हाला व्हिडिओ मध्ये एक माणूस दिसला जो म्हणत होता कि हे प्रदर्शन युवा काँग्रेस तर्फे केले गेले आहे. तसेच आम्हाला व्हिडिओ मध्ये एका ठिकाणी एक बोर्ड दिसला ज्यावर, ‘नागपूर शहर युवक काँग्रेस द्वारा संघ मुख्यालय चा घेराव’ लिहलेले दिसले. तपासादरम्यान आम्हाला बऱ्याच वेबसाईट वर एक बातमी देखील मिळाली. यात सांगितले गेले होते कि संघ मुख्याला बाहेर प्रदर्शन करताना यूथ काँग्रेस च्या कारकर्त्यांविरुद्ध केस दर्ज केला गेला. हि रिपोर्ट तुम्ही आउटलुक इंडिया डॉट कॉम वर इथे वाचू शकता. आता आम्हाला हे जाणून घ्यायचे होते कि युथ काँग्रेस चे प्रदर्शन हे शेतकऱ्यांचे सांगून व्हायरल करण्यात आले होते का. व्हायरल व्हिडिओ मध्ये आम्हाला ऑनलाइन न्यूज इंडिया चा लोगो दिसला. जेव्हा आम्ही हा व्हिडिओ त्यांच्या युट्युब चॅनेल वर सर्च केला तेव्हा आम्हाला तो १८ जानेवारी रोजी अपलोड केल्याचे समजले. व्हिडिओ आणि हेडिंग तीच होती जी आता व्हायरल होत होती. याचा अर्थ यूथ काँग्रेस च्या कार्यकर्त्यांचा व्हिडिओ शेतकरी आंदोलनाचा सांगून व्हायरल करण्याची सुरुवात ऑनलाइन न्यूज इंडिया ने केली. तपास पुढे नेत विश्वास न्यूज ने नागपूर चे कॉर्पोरेटर आणि यूथ काँग्रेस चे नेशनल सेक्रेटरी बंटी शेळके यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि स्वामी विवेकानंद जी यांच्या जयंती निमित्त यूथ काँग्रेस ने संपूर्ण देशात थाळ्या वाजवत प्रदर्शन केले. याच क्रमात आम्ही नागपूर च्या संघ मुख्यालयाच्या समोर देखील प्रदर्शन केले. हे सगळे कार्यकर्ते आहेत, यात कोणीच शेतकरी नव्हते. शेवटी आम्ही खोटी पोस्ट करणारा यूजर बैजू यादव यांच्या प्रोफाइल चा तपास केला, त्यात आम्हाला कळले कि यूजर समस्तीपूर चे रहिवासी आहेत, सध्या ते मुंबई ला स्थायिक आहेत. त्यांच्या अकाउंट ला १४ हजार पेक्षा अधिक लोकं फोल्लो करतात. निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात, शेतकऱयांच्या नावावर व्हायरल होत असलेली पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे समजले. व्हिडिओ मध्ये ज्यांना शेतकरी सांगण्यात येत आहे, ते यूथ काँग्रेस चे कार्यकर्ते आहेत. - Claim Review : संघ मुख्यालय पर किसानों का प्रदर्शन - Claimed By : Baiju Yadav - Fact Check : Misleading Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know! Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • English
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.123 as of May 22 2025


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data]
OpenLink Virtuoso version 07.20.3241 as of May 22 2025, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 8 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2026 OpenLink Software