schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
Claim
2013 मध्ये राहुल गांधींनी खासदार, आमदार अपात्रता विरोधी विधेयक फाडले.
Fact
व्हायरल फोटो मेसेज खोटा आहे. 2012 मध्ये लखनौ येथील एका निवडणूक सभेत त्यांनी समाजवादी पक्षाची अपूरी आश्वासने फाडत असल्याचे सांगत एक पेपर फाडला होता.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षीय शिक्षा आणि खासदारकी रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर एक दावा व्हायरल झाला आहे. दोन वर्षांपर्यंत शिक्षा झालेल्या खासदार आणि आमदारांना अपात्र ठरविले जाऊ नये असे विधेयक 2013 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग हे मांडणार होते. मात्र राहुल गांधींनी हे विधेयक फाडून टाकले. आता त्याची फळे त्यांनाच भोगावी लागत आहेत. असा दावा केला जात आहे.
“जर खासदार किंवा आमदार कमीत कमी 2 year शिक्षा झाली तर त्याचे सदस्य पद रद्द होते..हे PRA act 1951 नुसार झालंय…. पण गंमत अशी की हे PRA 1951 कायद्याचे bill रद्द करायला मनमोहन सिंग यांना विरोध स्वतः राहुल गांधी यांनी केला आणि बिल फाडून टाकले… ते बिल फाडले नसते तर आज वाचले असते” असे हा दावा सांगतो.
खासदार आणि आमदारांना शिक्षा झाल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द करू नये याप्रकारच्या विधेयकाला स्वतः राहुल गांधी यांनी विरोध करून ते विधेयक फाडून टाकले होते का? यासंदर्भात आम्ही शोध घेतला. न्यूजचेकरला काँग्रेसच्या अधिकृत युट्युब चॅनेलवर एक व्हिडीओ सापडला.
२७ सप्टेंबर २०१३ रोजी अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडीओचे शीर्षक “Rahul Gandhi: Stop the ordinance that saves criminal politicians” असे आढळले. आम्ही या व्हिडीओचे अवलोकन केले.
“येथे मी अपात्रता विरोधी विधेयकावर माझे मत मांडत आहे. माझ्या दृष्टीने हे विधेयक अनावश्यक आहे; फाडून टाकण्यासारखे आहे. हे माझे वैयक्तिक मत आहे. मी पुनरावृत्ती करतो; हे फक्त माझे वैयक्तिक मत आहे.” असे या व्हिडिओत राहुल गांधी बोलताना दिसतात. हा व्हिडीओ पाहून विधेयक फाडण्यासंदर्भात त्यांनी तोंडी उद्गार काढले आहेत. हे स्पष्ट होते. विधेयक प्रत्यक्षात फाडताना ते या व्हिडिओत दिसत नाहीत. Times of India, CNN आणि Times Now सारख्या माध्यमांनीही यासंदर्भात बातम्या दिल्या आहेत. या बातम्यांमध्ये कोठेही राहुल गांधी यांनी विधेयक फाडले असे म्हटलेले नाही किंवा विधेयक फाडताना दाखविले नाही.
दरम्यान व्हायरल फोटोमध्ये राहुल गांधी काय फाडत आहेत हे पाहण्यासाठी आम्ही व्हायरल फोटोचा रिव्हर्स इमेज सर्च केला. तेंव्हा आम्हाला NDTV चा एक व्हिडीओ सापडला. १६ फेब्रुवारी २०१२ रोजी हा व्हिडीओ या चॅनेलने आपल्या युट्युब चॅनेलवर अपलोड केलेला आहे.
“In dramatic flourish, Rahul Gandhi rips up paper at rally” असे या व्हिडीओचे शीर्षक आहे. व्हायरल फोटोमध्ये एक कागद फाडताना जे दिसत आहे, त्याचेच प्रत्यक्ष व्हिज्युअल्स या व्हिडिओमध्ये पाहता येतात. २०१२ मध्ये लखनौ येथे झालेल्या राजकीय सभेत राहुल गांधी यांनी समाजवादी पक्षांच्या आश्वासन पत्रिकेचा कागद फाडत असल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला आणि ऐकायला मिळतात. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये याबद्दल माहिती देण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे आहे. “Accusing the Bahujan Samaj Party (BSP) and the Samajwadi Party (SP) of making “only promises”, Congress leader Rahul Gandhi today tore a piece of paper at an election meeting to drive home the point that “mere lists” of assurances were of no use.”
यासंदर्भातील बातम्याही त्यावेळी वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या आहेत. यापैकी एक बातमी India Today ने प्रसिद्ध केली असून या बातमीत छापलेले कागद फाडतानाचे छायाचित्र सध्या व्हायरल होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले.
हा स्पष्टपणे 2013 पूर्वी घडलेल्या एका घटनेचा फोटो आहे लक्षात येते. गुन्हेगारी प्रकरणात दोषी ठरलेल्या खासदार आणि आमदारांच्या अपात्रतेशी संबंधित लिली थॉमस प्रकरणावर Deccan Herald ने प्रकाशित केलेला लेख आपल्याला येथे पाहता येईल. त्यावरूनही महत्वाचे संदर्भ मिळू शकतात.
तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकार 2013 मध्ये संसदेत खासदार आणि आमदारांच्या अपात्रतेच्या विरोधात जे विधेयक मांडणार होते ते विधेयक राहुल गांधींनी फाडून टाकल्याचा करण्यात येत असलेला दावा आणि त्या संदर्भाने व्हायरल केला जात असलेला फोटो खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. हे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
Our Sources
YouTube Video From, Indian National Congress, Dated September 27, 2013
YouTube Video From, NDTV, Dated February 2012
News Report From, India Today, Dated February 15, 2012
News Report From, Deccan Herald, Dated March 24, 2023
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in
Prasad Prabhu
February 8, 2025
Ishwarachandra B G
February 8, 2025
Vasudha Beri
January 15, 2025
|