About: http://data.cimple.eu/claim-review/442ad121f579c455a6a1ecf5b6966be201d864f70a5e6f82fdf9086e     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Fact Check: शाहरुख खान चा हा व्हिडिओ महाकुंभाशी संबंधित नाही विश्वास न्यूज ने केलेल्या पडताळणीमध्ये आढळले की व्हायरल केलेला दावा चुकीचा आहे. व्हायरल व्हिडिओ महा कुंभाचा नसून तिरुपतीचा आहे. बॉलीवूड स्टार शाहरुख खान ने 5 सप्टेंबर 2023 रोजी आंध्र प्रदेशच्या तिरुमाला व्यंकटेश्वर मंदिराचा दौरा केला होता. रिपोर्टनुसार, त्यांनी आपला चित्रपट जवानच्या यशासाठी प्रार्थना करताना आपल्या परिवारासहित आणि सहकलाकार नयनतारा सोबत मंदिराचा भेट दिली होती. By: Pallavi Mishra - Published: Feb 20, 2025 at 06:01 PM - नवी दिल्ली (विश्वास न्यूज). सोशल मीडियावर शाहरुख खानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांना एका मंदिरातून बाहेर पडताना दाखवले आहे. व्हिडिओला शेअर करून दावा केला जात आहे की हा व्हिडिओ महाकुंभाचा आहे. विश्वास न्यूज ने केलेल्या पडताळणीमध्ये आढळले की व्हायरल केलेला दावा चुकीचा आहे. व्हायरल व्हिडिओ महा कुंभाचा नसून तिरुपतीचा आहे. बॉलीवूड स्टार शाहरुख खान ने 5 सप्टेंबर 2023 रोजी आंध्र प्रदेशच्या तिरुमाला व्यंकटेश्वर मंदिराचा दौरा केला होता. रिपोर्टनुसार, त्यांनी आपला चित्रपट जवानच्या यशासाठी प्रार्थना करताना आपल्या परिवारासहित आणि सहकलाकार नयनतारा सोबत मंदिराचा भेट दिली होती. का होत आहे व्हायरल? इंस्टाग्राम यूजर ‘ayodhyaa_2024’ ने 13 फेब्रुवारी 2025 ला एक व्हिडिओ व्हायरल करत शेअर करताना म्हटले होते की ” महाकुंभात पोहोचला शाहरुख खान.” पोस्ट ची आर्काइव लिंक ला येथे पहा. सत्यता पडताळणी व्हायरल दाव्यामधील सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही गुगल वरील संबंधित किंवा च्या मदतीने सर्च केला. आम्हाला कोठेही शाहरुख खानच्या महा कुंभ मध्ये जाण्याची कोणतीही बातमी मिळाली नाही. यानंतर आम्ही व्हायरल व्हिडिओ च्या की फ्रेम्स तुला गुगल रिव्हर्स इमेज वर सर्च केले. आम्हाला NDTV च्या यूट्यूब चैनल वर 5 सप्टेंबर 2023 ला अपलोड केलेला एक व्हिडिओ मिळाला, ज्यामध्ये एका मिनिटांनंतर व्हायरलक्लिप चा भाग पहिला जाऊ शकतो. व्हिडिओमध्ये लिहिलेल्या डिस्क्रिप्शन नुसार, “सुपरस्टार शाहरुख खान ने आपल्या आगामी फिल्म च्या रिलीज च्या आधी तिरुपतीच्या श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात पूजा अर्चना केली. अभिनेत्याला मंदिरात फोटो काढते वेळी आपल्या पारंपारिक सणांच्या विषयांमध्ये पाहिले गेले होते. त्यांची सहकलाकार नयनतारा सुद्धा आपले पती विग्नेश शिवन यांचे समवेत मंदिरात पाहिली गेली होती.” शाहरुख खानचा तिरुपती मंदिरात जाण्याचा हा व्हिडिओ आम्हाला सुद्धा पाच सप्टेंबर 2023 इंडियन एक्सप्रेस च्या यूट्यूब चैनल ला अपलोड केलेला आढळला. यासोबत टायटल लिहिले होते, ” शाहरुख खान आणि नयनतारा ने जवांच्या दिल्लीच्या आधी तिरुमाला मध्ये प्रार्थना केली” कीवर्ड ने सर्च केले असता आम्हाला सप्टेंबर 2023 मध्ये शाहरुख खान ने तिरुपती मंदिरात जाण्यासंदर्भात अनेक बातम्या मिळाल्या. आम्ही या विषयासंदर्भात मुंबईमध्ये बॉलीवूडच्या बातम्या कव्हर करणाऱ्या दैनिक जागरण च्या वरिष्ठ पत्रकार स्मिता श्रीवास्तव यांचेसोबत संपर्क केला होता. त्यांनी सांगितले, ” हा व्हिडिओ सप्टेंबर 2023 चा आहे, जेव्हा शाहरुख खान आणि नयनताराने जवान चित्रपट रिलीज होण्याआधी तिरुमाला येते प्रार्थना केली होती.” शाहरुख खान चा या जुन्या व्हिडिओला आधी सुद्धा खोट्यादाव्यांसहित शेअर केले गेले होते. कधी याला ईद सोबत जोडून व्हायरलकेले गेले होते तर कधी राम मंदिर प्राण प्रतिष्ठा ला जोडून व्हायरलकेले गेले होते. त्यावेळी केल्या गेलेल्या फॅक्ट चेक्स ला येथे वाचले येथे वाचले जाऊ शकते. शेवटी आम्ही व्हिडिओला चुकीच्या दाव्यासहित शेअर करणाऱ्या इंस्टाग्राम यूजर ayodhyaa_2024 च्या अकाउंटला स्कॅन केले. आम्हाला आढळले की या युजरचे तीन लाखांपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. निष्कर्ष: विश्वास न्यूज ला आपल्या पडताळणीमध्ये आढळले की हा व्हायरल दावा चुकीचा आहे. व्हायरल व्हिडिओ महाकुंभाचा नसून, तिरुपतीचा आहे. बॉलीवूड स्टार शाहरुख खान ने 5 सप्टेंबर 2023 ला आंध्र प्रदेशच्या तिरुमाला व्यंकटेश्वर मंदिर चा दौरा केला होता. रिपोर्टनुसार त्यांनी आपला चित्रपट देवांच्या यशासाठी प्रार्थना करताना आपला परिवार आणि सहकलाकार नयनतारा यांचे सोबत मंदिराला भेट दिली होती. Claim Review : शाहरुख खानचा हा व्हिडिओ महाकुंभाचा आहे - Claimed By : Instagram User ayodhyaa_2024 - Fact Check : False - Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know! Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • English
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.123 as of May 22 2025


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data]
OpenLink Virtuoso version 07.20.3241 as of May 22 2025, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 8 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2026 OpenLink Software