About: http://data.cimple.eu/claim-review/4ea345d9ce5ad09dbb50f24bf5addd97eb41f37de4a395dd8315df27     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Fact Check: या फोटोमध्ये RSS प्रमुख मोहन भागवत यांच्यासोबत उपस्थित असलेली व्यक्ती राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा नाही - By: Pallavi Mishra - Published: Dec 28, 2023 at 04:38 PM नवी दिल्ली (विश्वास टीम). सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये एक फोटो आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघा (आरएसएस)चे सरसंघचालक मोहन भागवत दिसत आहे. या फोटोमध्ये एक व्यक्ती त्यांच्या मागे चालताना दिसत आहे. फोटोसोबत असा दावा केला जात आहे की, फोटोमध्ये मोहन भागवत यांच्यासोबत फिरणारी व्यक्ती राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आहे. ‘विश्वास न्यूज’च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे. व्हायरल फोटोमध्ये मोहन भागवत यांच्यासोबत फिरणारी व्यक्ती राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा नाही. काय आहे व्हायरल पोस्टमध्ये? Rajveer Singh Rajput (राजवीर सिंह राजपूत) नावाच्या वापरकर्त्याने 13 डिसेंबर रोजी व्हायरल पोस्ट शेअर करताना लिहिले आहे की, “आदरणीय श्री भजनलाल शर्मा जी यांचे राजस्थानचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा,” आणि म्हटले आहे की, “हे ते लोक आहेत जे संघाला शिव्या देत आहेत, स्वयंसेवकांना बघा, ते चारी बाजूंनी आले आहेत, सर्वांच्या आधी तुमचाच नंबर लागणार आहे, झूम करून बघा, ते जगातील सर्वात मोठ्या शक्तीशी ताल धरत आहेत.” तपास आम्ही रिव्हर्स इमेज वापरून त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपासात आम्हाला बीबीसीने 5 नोव्हेंबर 20155 रोजी दाखल केलेली एक कहाणी आढळली, ज्यामधे हा फोटो वापरण्यात आला होता. आरएसएसने शॉर्ट्स काढून फुल पँट आणल्याची बातमी होती. या फोटोत उपस्थित असलेल्या इतर व्यक्तीबद्दल, फोटोमध्ये कुठेही माहिती नव्हती. आम्हाला हा फोटो रॉयटर्सच्या वेबसाइटवरील गॅलरीतही सापडला. 24 फेब्रुवारी 2015 रोजी अपलोड केलेल्या या फोटोसोबतच्या मथळ्यात लिहिले होते: अनुवादित ” भारताच्या हिंदू राष्ट्रवादी संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)चे प्रमुख मोहन भागवत (डावीकडे तिसरे ), 3 नोव्हेंबर 2014 रोजी उत्तर भारतीय शहर आग्रा येथे प्रशिक्षण शिबिरादरम्यान आरएसएस स्वयंसेवकांना संबोधित केल्यानंतर जाताना. 3 नोव्हेंबर 2014 रोजी घेतलेला फोटो. रॉयटर्स/ब्रिजेश सिंग (भारत – टॅग: सामाजिक राजकारण)” आम्ही फोटोमध्ये संघाच्या प्रमुखांच्या बाजूला उभ्या असलेल्या व्यक्तीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण ही माहिती कुठेच मिळाली नाही. त्यानंतर आम्ही राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या फोटोंची तुलना केली. या दोन व्यक्तींमध्ये खूप अंतर आहे. हा फरक खालील कोलाजमध्ये स्पष्टपणे दिसू शकतो. याबाबत आम्ही राजस्थानमधील दैनिक जागरणचे ब्युरो चीफ नरेंद्र शर्मा यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पुष्टी केली की, या फोटोत दिसणारी व्यक्ती राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा नाहीत. हा व्हायरल फोटो राजवीर सिंह राजपूत नावाच्या फेसबुक वापरकर्त्याने शेअर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो उदयपूरचा रहिवासी आहे. निष्कर्ष: आमच्या तपासात आम्हाला आढळले की, व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे, आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यासोबत नाहीत. - Claim Review : RSS प्रमुख मोहन भागवत यांच्यासोबतचा हा फोटो राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचा आहे. - Claimed By : Facebook user Rajveer Singh Rajput - Fact Check : False Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know! Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • English
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.123 as of May 22 2025


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data]
OpenLink Virtuoso version 07.20.3241 as of May 22 2025, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 8 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2026 OpenLink Software