About: http://data.cimple.eu/claim-review/5892addcfcf5b249416cebab653fa01f6554220a8172d09ac94ce63b     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Authors Claim लाडकी बहीण योजनेतून महिलांना मिळणार मोबाईल गिफ्ट. Fact हा दावा खोटा आहे. महाराष्ट्र सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. व्हायरल बातमी आणि लिंक हा स्कॅमचा भाग आहे. लाडकी बहीण योजनेतून महिलांना मिळणार मोबाईल गिफ्ट असे सांगणारा दावा सध्या व्हायरल झाला आहे. मोफत मोबाईल मिळवण्यासाठी पात्र लाभार्थी होण्यासाठी व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा आणि लिंकवर क्लिक करा असे आवाहन केले जात आहे. दाव्याचे संग्रहण इथे पाहता येईल. आम्हाला हा दावा फेसबुकवरही (संग्रहण) आढळला. न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे. अनेक युजर्सनी विविध माध्यमांवरून हा दावा केला आहे. असे दावे इथे, इथे, इथे पाहता येतील. Fact Check/ Verification व्हायरल दाव्यामध्ये लाडकी बहीण योजनेतून आता महिलांना मोबाईल गिफ्ट स्वरूपात मिळणार असे म्हटले आहे. याची सत्यता तपासण्यासाठी आम्ही सर्वप्रथम गुगलवर संबंधित कीवर्डसच्या माध्यमातून शोध घेतला. मात्र महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा सरकारी पातळीवर कुणीही यासंदर्भात अधिकृत घोषणा केली असल्याचे आमच्या निदर्शनास आले नाही. सरकारी पातळीवर अशी घोषणा झाली असती तर अधिकृत माध्यमांनी त्याबद्दल बातमी प्रसिद्ध केली असती, मात्र तसे आढळले नाही. मात्र आम्हाला दावा करणाऱ्या ladkibahiniyojana.com या वेबसाईटने बातमी स्वरूपात याची माहिती दिली असून अर्ज करण्यासाठी लिंक आणि सहभागी होण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप दिल्याचे पाहण्यात आले. संबंधित बातमी देणारी वेबसाईट महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट आहे का? हे शोधण्यासाठीं आम्ही ती वेबसाईट धुंडाळली असता, सर्वप्रथम इंग्रजी स्पेलिंग मधील चुका आमच्या लक्षात आल्या. या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या अनेक बातम्या आम्हाला पाहायला मिळाल्या. शिवाय अर्ज करा असे सांगणाऱ्या लिंकही उघडत नसल्याचे किंवा क्लिक केल्यास याच वेबसाईटवरील दुसऱ्या बातम्यांच्या लिंक उघडत असल्याचे आमच्या निदर्शनास आले. यातून आम्हाला संशय आल्याने आम्ही Scam Detector या वेबसाईट आणि लिंकची सत्यता पटविणाऱ्या माध्यमावर संशयास्पद वेबसाईट लिंक घालून पाहिली. आम्हाला Scam Detector ने संबंधित वेबसाईटच्या विश्वासाचा अंक 15 म्हणजेच अतिशय कमी असल्याचे सांगितले. “Controversial, High-Risk, Unsafe” अर्थात अति जोखीमीची आणि असुरक्षित असे वर्णन आढळल्याने संबंधित वेबसाईट आणि त्यावरील बातमीचा उद्देश सरकारी योजनेच्या नावाखाली नागरिकांना आकर्षित करून त्यांचा डेटा इतर कारणासाठी वापरण्याचा हा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले. सायबर सिक्युरिटी तज्ञ हितेश धरमदासानी यांच्याशीही यासंदर्भात संपर्क साधला असता त्यांनी, “अशाप्रकारे सरकारी योजनेच्या नावाखाली वेबसाईट तयार करून आणि त्यावर फसव्या योजना घालून नागरिकांना आकर्षित केले जाते आणि त्यांचे मोबाईल क्रमांक, ईमेल अड्रेस मिळविले जातात. याचा वापर अनेक फसवणुकीसाठी वापरला जातो किंवा हा डेटा इतर कंपन्यांना विकून पैसेही मिळविले जातात. विशेष म्हणजे आकर्षित क्राउड दाखवून ऑनलाईन जाहिराती सुद्धा मिळविल्या जातात.” असे त्यांनी सांगितले. पुढील तपासात महाराष्ट्र सरकारने महिलांना लाडकी बहीण योजनेतून मोबाईल देण्याची घोषणा केली आहे हे का हे शोधताना आम्हाला या योजनेसाठी वापरली जाणारी सरकारची अधिकृत वेबसाईट सापडली. या वेबसाईटवर जाऊन आम्ही शोध घेतला असता, योजनेची माहिती या सदरात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी मोबाईल गिफ्ट संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. मोबाईल गिफ्ट द्यायचे असेल तर सरकारने किंवा महिला व बालविकास विभागाने तसे याठिकाणी जाहीर केले असते. दरम्यान आम्ही आणखी खात्री करून घेण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला. दरम्यान त्यांचे जनसंपर्क प्रमुख पात्रोडकर यांनी फोनवरून झालेल्या संभाषणात सांगितले की, “हा दावा खोटा आहे. अशाप्रकारची कोणतीच घोषणा मुख्यमंत्री किंवा सरकारने केलेली नाही.” आणखी तपास करताना कोकणात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत 2400 महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. अशी माहिती आम्हाला मिळाली. यासंदर्भात जाणून घेण्यासाठी आम्ही रत्नागिरी जिल्हा बालविकास अधिकारी श्रीकांत हवाले यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी ” मंत्री उदय सामंत यांनी केलेली घोषणा केवळ रत्नागिरी जिल्ह्यातील बचत गटांच्या माध्यमातून कार्यरत ठराविक महिलांसाठी आहे. या घोषणेचा लाडकी बहीण योजनतेशी काडीमात्र संबंध नाही.” असे आमच्याशी बोलताना सांगितले. अशाप्रकारे आमच्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले. Conclusion लाडकी बहीण योजनेतून महिलांना मोफत मोबाईल गिफ्ट योजना हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असून स्कॅमचा एक भाग आहे. महाराष्ट्र सरकारने अशी कोणतीच घोषणा केलेली नाही. हे स्पष्ट झाले आहे. Result: False Our Sources Analysis on Scam Detector Official Website of Ladaki Bahin Scheme Conversation with PRO to CM Maharashtra Conversation with District Women and Child Development Officer, Ratnagiri कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • Hindi
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.115 as of Oct 09 2023


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data] Valid XHTML + RDFa
OpenLink Virtuoso version 07.20.3238 as of Jul 16 2024, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 5 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2025 OpenLink Software