Claim–
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मिझोरममधील भाजी बाजारात सामाजिक अंतर राखले जातेय त्याचा हा फोटो आहे.
सोशल मीडियामध्ये भाजी बाजाराचा एक फोटो व्हायरल होत आहे. यात लाॅकडाऊन दरम्यान लोक भाजी बाजारात सामाजिक अंतर राखत भाजी खऱेदी विक्री करत असल्याचे दिसत आहे. पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की हा फोटो मिझोरममधील लोक जबाबदारीने सामाजिक अंतराचे पालन करत आहेत.
Verification–
आम्ही या संदर्भात पडताळणी सुरु केली. गूगलमध्ये काही किवर्ड्सच्या साहाय्याने शोध सुरु केली असता आम्हाला दैनिक भास्करच्या एका बातमीत ( अर्काईव्ह
) हा फोटो मिझोरम असल्याचे आढळून आले. फोटो कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, मिझोरममधील लोकांनी मंगळवारी सामाजिक अंतराचे पालन करत आदर्श निर्माण केला.
याबाबत अधिक शोध घेतला असता आम्हाला हा मोदीनामा या फेसबुक
पेज वर हा फोटो मणिपुर मधील असल्याचा उल्लेख केल्याचे आढळून आले.
त्यामुळे या फोटो
बाबतची उत्सुकता वाढली आम्ही पुढे शोध शुरुच ठेवला असता हा फोटो मिझोरम मधील लाॅकडाऊन दरम्यान सामाजिक अंतराचा असल्याच्या अनेक पोस्ट आढळून आल्या.
हा फोटो नेमका कुठला आहे याबद्दल माहिती मिळवण्यासाठी गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध शुरु केला असता nationthailand.com
नावाच्या वेबसाईटवर हा फोटो आढळून आला. यात म्हटले आहे की, हा फोटो म्यानमारमधील आहे.
theworldnews.net
या वेबसाईटवर देखील हा फोटो म्यानमार मधील असल्याचे म्हटले आहे. याशिवाय आम्हाला म्यानमारचे अर्थविषयक परराष्ट्रमंत्री Thaung Tun यांचे ट्विट आढळून आले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये हे फोटो शेअर करत कलाव शहरातील सामान्य नागरिक आणि प्रशासनाचे आभार मानले आहेत.
याबाबत अधिक शोध घेतला असता कलाव शहर हे म्यानमार मधील शान राज्यात असल्याचे आढळून आले. आम्ही व्हायरल फोटोमधील दुकानांवर लिहिलेला मजकूर बारकाईने तपासला असता तो देखील बर्मा भाषेतील असल्याचे दिसून आले.
यावरुन हेच स्पष्ट होते की लाॅकडाऊन दरम्यान भाजी
बाजारात सामाजिक अंतर राखल्याचा फोटो हा भारतातील मणिपूर किंवा मिझोरम राज्यातील नाही तर शेजारी देश म्यानमार मधील शान राज्यातील कलाव या शहरातील आहे. हा फोटो चुकीच्या दाव्याने सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
Source
Facebook
Google Search
Google Reverse Image
Twitter Advanced Search
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)